Skip to content

वाईट याचंच वाटतं, कीतीही मनापासून चांगले वागा कोणी चांगलं का म्हणत नाही..

वाईट याचंच वाटतं, कीतीही मनापासून चांगले वागा कोणी चांगलं का म्हणत नाही..


मयुरी महेंद्र महाजन


आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्मग्रंथांपासून ते कुरणा पासून ते अगदी गीता, रामायण यांच्यापासून ते अगदी आत्ताच्या घडीला ज्या गोष्टीला तुम्ही गुरुस्थानी ठेवता, त्या सर्व व्यक्तींनी आपल्या शिकवणीतून आपल्याला चांगले वागण्याची व चांगले बोलण्याची हीच शिकवण ते नेहमी देत असतात, त्यामुळे घरातल्या छोट्या बाळगोपाळांनी पासून आपण सुजाण पालक त्यांना चांगले वागण्याचे धडे देत असतो ,आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगले वागण्यासाठी बर्‍याचदा शिक्षा केलेली असेल, पण आपल्याला चांगलं वळण लागावे, यासाठीचं आता याचा अर्थ चांगलं वागणं बोलणं आपल्या आयुष्यात असायलाच पाहिजे,

परंतु गंमत बघा म्हणजे कधीकधी मलाही असा प्रश्न पडतो ,जर छोट्या मुलांनी काही चूक केली असेल, खोडी केली असेल, तर त्यांना दिली जाणारी प्रत्येकाची प्रतिक्रीया खूप वेगाने आणि महत्त्वाचं म्हणजे नकारार्थीपणे देण्यात येते, म्हणजेच काय चुकीच आहे ,व यामुळे आपल्याला आई-वडील ओरडतात, हे त्या बालमनाला समजते ,थोडक्यात चुकीच्या वागणुकी साठी जर त्याला शिक्षा दिली जात असेल, तर त्याचं ठिकाणी कधीतरी तर त्या कोवळ्या पडणाऱ्या पाऊलवाटे पैकी एक तरी पाऊल योग्य पडत असेल, तेव्हा त्या त्याला ती दाद का नको?? काही ठिकाणी पालक चांगल्या गोष्टीसाठी, वागणुकी साठी प्रलोभने देतानाही दिसतात ,प्रलोभनांच्या माध्यमातून का होईना परंतु त्या वाटेने मुलं वळतात, परंतु फक्त प्रलोभने देत बसणे सुद्धा योग्य नाही, कारण मुले चांगले वागतात कारण आपल्याला काहीतरी वस्तू भेटणार यासाठी, त्यामुळे प्रलोभन देताना त्याचा अतिरेकी वापर होत नाही ना, याची काळजी घ्या,

लहान मुलांच्या बाबतीत असतं तसंच आपल्या सारखीच जाणती मंडळी सुद्धा आपल्या चांगुलपणाचं कुठेतरी ,कधीतरी कौतुक व्हावं, असं वाटणं स्वाभाविक असतं ,परंतु चांगल्याला चांगलन म्हणणारे तसे कमीचं, वाईट याचंच वाटतं कीतीही मनापासून चांगलं वागा, कुणी चांगलं का म्हणतं नाही, आपणही आपल्या ते बदल करूया कोणामध्येही काहीही गोष्ट सुंदर असो, मग कोणाचा स्वभाव असेल, कुणाचा वागणं चांगल असेल, कोणी बोलायला छान असेल, त्या त्या गोष्टीला आपण सुंदर म्हणूया, आणि आपलंही जीवन सुंदर करूया ,

आणि एक मनापासून सांगावस वाटतं, जर या जगात आपल्या चांगले वागण्याची कुणी दखल घेत नसेल, चांगल्या गोष्टीला विरोधक जास्त असतात, त्यामुळे कधीही आपल्या चांगुलपणा सोडू नका, काही गोष्टी आपल्या बाजूने घडतील, काही आपल्या विरोधात जातील ,पण विश्वास ठेवा, आपल्या चांगुलपणाला कोणी कितीही नाकारलं ,तरी शेवटी विजय सत्याचाच होतो ,इतकं लक्षात ठेवा, जगाच्या बाजारात लोक खोटे बोलून जिंकताना दिसत असले, तरी त्यांचा तो विजय चिरकाल टिकणारा नसतो, त्यामुळे स्वतःतील चांगुलपणा हरवू देऊ नका,

लोक चांगल्याला चांगलं यासाठी पण म्हणत नाही, कारण चांगल्याला चांगलं म्हणण्याआधी त्यांच्या मनात शंका असतात, संशय असतात, त्यामुळे आपण लोकांची काळजी करायची नाही, कारण कसोटी खऱ्या वागणार्‍यांचीचं लागते, खर्‍याला परीक्षा असते, पण चांगले वागण्याचा एक फायदा असतो, मनात कुणाविषयी काहीही कपट भाव नसतो, आपल्या चांगले वागण्याला दोनच गोष्टी साक्षीदार असतात ,एक म्हणजे आपली अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा, कोणी कितीही डोळे झाकून ठेवले, तरी त्याचे डोळे मात्र सदैव उघडे असतात,

आपण हाडामांसाची माणसे आहोत, भावनांचा आपल्यामध्ये संचार असतो, जर आपणच नेहमी चांगला वागत गेलो, तर आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो, त्यामुळे माणसाने चांगलं असावं ,पण अती चांगलं ही असू नये, कारण योग्य तेथे राग येणाही महत्त्वाचा आहे, नाहीतर लोक फायदा घेतात,

आणि विशेषत आपण हे लक्षात घ्यायला हवं ,प्रत्येकात काहीतरी चांगलं नक्कीच असतं, जर आपल्याला ते शोधता आलं तरं आपणं नक्की घ्यावं, परंतु आपण सर्वच जण नऊ चांगल्या असणाऱ्या गोष्टीं डावलून एका चुकी वरती लक्ष देत बसतो, चांगले वागण्याला अजून तरी कुठे पारितोषिक दिले जात नाही, शाळा-कॉलेजमध्ये असताना आदर्श विद्यार्थी म्हणून एक बक्षीस नक्की असायचं, परंतु खऱ्या जीवनात अशी पारितोषिके अजून तरी कोणी देत नाही, त्यासाठी मनात ती गोष्ट असते की आपण मनापासून चांगले वागूनही आपल्याला कोणी चांगलं का म्हणत नाही,

असे वाटणे, मानवी स्वभावाला सुसंगत आहे, त्यात गैर काहीच नाही, परंतु फक्त कुणीतरी चांगलं म्हणावं, म्हणून चांगले वागू नका, आपल्याला व आपल्या मनाला पटले पाहिजे ,खरंच आपण चांगले वागतोय, लोकांनी देवांमध्ये चुका काढायला कमी केले नाही, तर तुम्ही आपण कोण??? आपण फक्त आपल्या चांगुलपणावरती एकनिष्ठ राहायला हवं ,बाकी आपल्या चांगुलपणाला देवाची साथ कायम असते, हा परीक्षा असतात, अडथळे, संकटे असतात, परंतु चांगुलपणा असल्यावर तो सिद्ध करण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतात,”
एक दिन बिक जायेगा, माती के मोल,
जग मेरे रेहँ जायेंगे प्यारे तेरे बोल “……..

चांगलं वागण्याचा बोलण्याचा आपण मनापासून प्रयत्न करूया किमान स्वतःसाठी तरी….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “वाईट याचंच वाटतं, कीतीही मनापासून चांगले वागा कोणी चांगलं का म्हणत नाही..”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!