Skip to content

वाईट परिस्थितीतून बाहेर पडायच्या काही प्रॅक्टिकल टिप्स!!

वाईट परिस्थितीतून बाहेर पडायच्या काही प्रॅक्टिकल टिप्स!!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आयुष्यात जगायला शिकवते ती वाईट परिस्थिती…! अगदी कुणावरही ही वाईट परिस्थिती ओढावते.वाईट परिस्थिती ही वेगवेगळ्या प्रकारची असु शकते.जसं की आपण अनेकदा म्हणतो की , “त्यांची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे , फार बिकट आहे” , “तिचे वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत पण काही सांगता येत नाही परिस्थिती खूप वाईट आहे”

अशी अनेक उदाहरणं आपण या रोजच्या जीवनात पाहतो आणि अनुभवतोही.प्रत्येकजण हा वाईट परिस्थीतीतून जात असतो.कुणी यात खूप खोलात जाऊन गुंतत जातो तर कुणी त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो.कुणालाही असं वाटत नाही की आपली ही वाईट परिस्थिती अशी कायमस्वरूपी रहावी.ती लवकरात लवकर बदलावी असच प्रत्येकाला वाटतं.आणि परिस्थिती मुळात बदलतेही पण ते बदलवणं केवळ आपल्या हातात असतं.

आपण काहीच केलं नाही तर परिस्थिती आहे तशीच किंवा त्याहूनही बिकट होण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणतीही वाईट परिस्थिती येईल तेव्हा तेव्हा खचून न जाता त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आता खूप जणांना अशा वेळी काय करावं हेच समजत नाही. यातून बाहेर कसं यायच काही एक कळत नाही.आणि अनेकदा अशा वेळी प्रॅक्टिकली कसा विचार करायचा हेच आपण विसरून जातो.

सगळ्या गोष्टींचा गुंता झाल्यावर तो सोडवायचा कसा याचा विचार करण्यापेक्षा अनेकदा आता काय होणार…? नीट होईल नं…?असं कसं झालं…वगैरे वगैरे असा विचार करत बसतो.तर मित्रांनो असा विचार केल्यावर आयुष्यातील वाईट परिस्थिती ही बदलणार नसते.त्यामुळे कधी प्रॅक्टिकली विचार करून बघा…..वाईट परिस्थिती बदलायला फार वेळ लागणार नाही. तर चला अशा काही प्रॅक्टिकल टिप्स पाहूयात की ज्या आपल्याला वाईट परिस्थीतीतून बाहेर पडायला मदत करतील…..

१)सर्वप्रथम ओढवलेल्या परिस्थितीचा संपूर्ण बाजूने विचार करा.

२)विचार केल्यानंतर परिस्थीशी निगडीत काही प्रश्न एका कागदावर लिहून काढा.

३)प्रश्न लिहील्यावर त्या प्रश्नांची उत्तरं लिहायला सुरुवात करा.तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर अर्धे प्रॉब्लेम्स सहज सुटतील. तुमच्या अनेक शंकाचं निरसन होईल.

४)आत्ता या क्षणाला काय महत्त्वाच आहे त्या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्यायला विसरू नका.

५)आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर पैसे मिळवण्याचे/कमविण्याचे चांगले मार्ग शोधायला सुरुवात करा.

६)बचत करण्यापेक्षा गुंतवणूकीवर जास्त भर द्या.जेणेकरून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

७)प्रेमात अपयश आल्याने खचून न जाता तो विषय शक्य होईल तितका लवकर सोडून द्या. त्याला तिथेच पूर्णविराम द्या.आणि करिअर करण्यात किंवा इतर गोष्टी करण्याला महत्त्व द्या. कारण आयुष्यात पुन्हा एखादी व्यक्ती ही येऊ शकते हे लक्षात ठेवा.

८) वाईट परिस्थिती ही कायमस्वरूपी राहत नाही हे लक्षात ठेवा.

९)काय चुकलय याकडे लक्ष देऊन त्या चुका सुधारण्यावर भर द्या.

१०)जे समोर आहे ते स्विकारून पुढे जा.

११)परिस्थिती बदलण्यासाठी किंवा त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः प्रयत्न करा.

१२)घर आणि ऑफीस दोन्हींचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे ठेवा.नाहीतर परिस्थिती जास्त बिघडेल.

१३)परिस्थिती सापेक्ष वागायला शिका.

गरज ओळखून पैशाचा वापर करा.

*हे येत नाही ,ते येत नाही त्यामुळे सगळं अडलय अस बोलण्यापेक्षा जे येत नाही ते शिकून घ्या.

*एखाद्या घरात एक व्यक्ती कमावती असते पण अचानक तीच व्यक्ती अकाली मृत्यू पावते अशावेळी जी परिस्थिती ओढावते ती वाईटच असते परंतु त्या परिस्थितीत जास्तीत जास्त वेळ न घालवता पुढे कितीतरी गोष्टी मांडून ठेवल्या आहेत हा विचार करून त्यातून बाहेर पडलं पाहिजे.

या खूप थोड्या थोडक्या टिप्स आहेत.पण खरच माणसाला वाईट परिस्थीतीतून बाहेर यायच असेल तर त्याने भावनिक दृष्ट्या जास्त गुंतून न पडता प्रॅक्टिकली विचार करणं गरजेच आहे. “First preference/priority” कशाला द्यायची हे लक्षात घेणं आवश्यक आहे. अनेकदा या गोष्टी कळत नाही म्हणून परिस्थितीतून बाहेर पडणच माणसाला अशक्य होतं.

खरतर वाईट परिस्थीतीतून बाहेर पडणं सहजासहजी कुणालाही शक्य नसतं परंतु ते अवघडही नसतं.कारण माणसाला परिस्थिती बदलायची असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती बदलतोच.त्यामुळेच…प्रयत्न करा…नुसताच विचार करण्यापेक्षा कृती करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!