Skip to content

वाईट काळात मनाला शांत ठेवण्याचे ९ मार्ग !!

वाईट काळात मनाला शांत ठेवण्याचे ९ मार्ग !!


गीतांजली जगदाळे


वाईट काळात मन अशांत असते. काय करावे, काय नाही काहीच कळत नाही. मनाला शांत करण्यासाठी काही वेळ कसलाच विचार करू नये असं ठरवून पण ते जमत नाही. मन अशांत असताना तर अतिविचारांचं प्रमाण देखील वाढत. आणि बऱ्याचदा ते विचार नकारात्मक स्वरूपाचे म्हणजेच चिंता, दुःख, राग, चीड अशा प्रकारचे असतात.

कधी कधी त्या वाईट काळात आपण अशा ही कृती करून बसतो ज्याचा आपल्याला नंतर पच्छाताप होतो. जस की एक तर स्वतःच नुकसान तरी करवून घेतो नाहीतर कोणाचं मन आपल्याकडून दुखावलं जात..

गरजे पेक्षा जास्त खाणे किंवा कमी खाणे, गरजे पेक्षा जास्त झोपणे किंवा कमी झोपणे, मनाची अशांतता कमी करण्यासाठी स्वतःला कशात तरी गुंतवून घेण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टी आपल्या चालू असतात पण आपण नक्की शांत व्हायला कशाचा वापर करतोय आणि ते आपल्यासाठी खरच हानिकारक नसेल ना याचा विचार नक्की करावा. मन अशांत असताना झोप ही शांत लागत नाही आणि जेवणावर ही त्याचा बराचसा परिणाम झालेला दिसतो.

पण ही अशांतता कमी करून मन शांत करण्यासाठी काही उपाय आपण नक्कीच अजमावू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वेळ आज ना उद्या बदलणार आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट वाईट असो किंवा चांगली नेहमीच्या मुक्कामासाठी नसते. जशी रात्र मग दिवस परत रात्र परत दिवस हे चक्र चालू असत त्याच प्रमाणे चांगला काळ आणि वाईट काळ ही अपरिहार्यच आहे.

त्यामुळे त्या वाईट काळाला खचून किंवा कोलमडून न जाता त्यावेळी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की ही वेळ तात्पुरतीच आहे. दुसरा उपाय, आपण वाईट काळातले त्रासदायक विचार बदलण्यासाठी करू शकतो. breathing exercise , म्हणजेच आपले प्राणायाम, आपण करू शकतो.

याने मेंदू पर्यंत रक्ताभिसरण चांगलं होऊन आपले विचार नियंत्रित करायला किंवा बदलायला सुद्धा मदत होते.मन त्या वेळा पुरत शांत होऊन आपला त्रास कमी होतो. पण हे प्राणायाम नियमित केल्यास त्याचा तात्पुरता फरक न पडता त्याचा खोलवर परिणाम पाहावयास मिळतो.

काही वेळा काय घडलं कशामुळे घडलं आणि त्यामुळे काय समस्या निर्माण झाल्यात असे विचार डोक्यात असतात. मन अशांत असल्याने निर्णय घेणं किंवा नीट विचार करणं सुद्धा अवगघङ होत. विचार तर सतत चालू असतात पण त्यांच्यातून निष्पन्न मात्र काहीच होत नाही.

अशावेळी एका कागदावर आपल्या समस्या लिहून काढाव्यात आणि ते झालं की आपला एखादा मित्र त्या समस्या आपल्याकडे घेऊन आला आहे आणि त्याला त्यावर आपल्याकडून काहीतरी उपाय सांगावा अशी अपेक्षा आहे. अशा वेळी त्या समस्या त्या मित्राच्याच आहेत आणि आपल्याला त्याला मदत करायची आहे असं समजून मग विचार करावा, असं समजावं.

समस्या आपल्या नसल्या की बऱ्याच वेळा आपण उपाय चांगले सुचवतो त्याच हेच कारण असत की त्या समस्या आपल्या नसून इतर कोणाच्या तरी असतात आणि त्यांच्या तणावाखाली आपण नसल्यामुळे, नीट विचार करून एका निर्णयावर पोहचू शकतो.

घडून गेलेल्या गोष्टींचा त्रास करून घेण्यापेक्षा भविष्यात कोणत्या चुका परत करायच्या नाहीत याची एकदा मनात नोंद करून त्या गोष्टी सोडून द्याव्यात. घडून गेलेल्या गोष्टी बदलणं आपल्या हातात नसत पण त्यात अडकून राहून मात्र आपल्याला आपला वर्तमान ही नीट जगता येत नाही आणि त्याचा परिणाम मग भविष्यावर ही होतो.

आयुष्यात येणारी संकटे, माणसे किंवा वाईट काळ यावर आपल नियंत्रण नसत या सगळ्या गोष्टी आपण कधीच नियंत्रित करू शकत नाही. पण आपले विचार आणि आपली कृती याच नियंत्रण मात्र नेहमी आपल्याकडे असत. त्यामुळे घडलेल्या गोष्टींना स्वीकारून पुढच्या दिशेने वाटचाल करणं फायद्याचं ठरत.

गोष्टी जेव्हा नियंत्रणाबाहेर असतात त्यावेळी मन अशांत च असत. खूप सारे प्रश्न पडलेले असतात. मीच का? माझ्याच बाबतीत असं का? मी कोणाचं काय वाकड केलं होत? इत्यादी. पण या प्रश्नांची उत्तर शोधण्यापेक्षा त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण जेव्हा बदलतो तेव्हा बऱ्याच वेळा तीच परिस्थिती आपल्याला त्रासदायक न वाटता ते एक आव्हान म्हणून स्वीकारावस वाटत. म्हणजेच दृष्टिकोन बदलला की वाईट काळात ही एक आशा वाटू लागते.

आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण वाईट काळात च नव्हे तर आयुष्यभर लक्षात ठेवली तर आयुष्यातली आणि मनातली अशांती नक्कीच कमी व्हायला मदत होईल. लोक काय म्हणतील हा रोग आपल्या सर्वाना कमी अधिक प्रमाणात असतो. हे जे लोक असतात ना ज्यांचा आपण इतका विचार करतो की आपली मनाची शांती त्याने भंगते. त्याच लोकांचं स्वतःच असं एक आयुष्य असत आणि त्यांच्या ही त्यांना समस्या असतात ज्यात ते स्वतः अडकलेले असतात.

त्यामुळे तुम्ही जितका त्यांचा विचार करता की हे काय म्हणेल ते काय म्हणेल त्यापेक्षा खूपच कमी ते तुमच्या त्या परिस्थितीचा विचार करत असतात. आणि खरं सांगा, का बरं या लोकांचं आपण इतकं टेन्शन घेत असतो, जे व्हायचं ते घडून गेलेलं असत त्याला सामोरं जाऊन आयुष्यात पुढे सर्कन हे जास्त महत्वाचं की त्याचा त्रास करून घेत बसत लोकांचा विचार करणं जास्त महत्वाचं? choice is yours ..!

आयुष्यात पुढे जण तर अटळ च असत. पण लोक काय म्हणतील याचा विचार आपण आपलं मन अजून अशांत बनवत असतो. आणि त्या विचारांनी आपल्याला बराच काळ ती अशांती सहन करत बसावी लागते आणि गरज नसताना आपण खूप काळ त्यात अडकून पडतो.

लोकांना जो विचार करायचा तो त्यांना करुद्या कारण ते त्यांचं काम आहे, आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं. आयुष्य खूपच गांभीर्याने घेणं ही कधी कधी अशांतीच कारण असत. आयुष्य गांभीर्याने तर घेतलंच पाहिजे पण ते अति तर होत नाहीए ना हे ही बघणं गरजेचं आहे. काही गोष्टी थोड्या हलक्या फुलक्या पद्धतीने घेतल्याने सुद्धा मनाला एक निवांतपणा मिळतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “वाईट काळात मनाला शांत ठेवण्याचे ९ मार्ग !!”

  1. Khup chan sangitley aapan mazya sobat ase barech weyla ghadle aahe v mi neyhmi ashaant asto v tya mule mi depression madhe sudha geyleylo aahe karan ki mala mazya bayko ne mazya kadun jabardastiney 12 varsh sawnsaar karun divorce gheyla v mazi mazi mulga v mulgi sudha sobat gheyun geyli aahe ya goshticha yewdha mazya jiwnwar parinaam zala ki Mich mala gnheygar samjto v pachataap karun radat asto ki aapya mulech hey sarv ghadle mhanun please mala margdarshan kara

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!