Skip to content

वाईट आहे, दुष्ट आहे याहूनही आधी तो एक माणूस आहे म्हणून त्याला एक संधी मिळू शकत नाही का?

वाईट आहे, दुष्ट आहे याहूनही आधी तो एक माणूस आहे म्हणून त्याला एक संधी मिळू शकत नाही का?


काव्या धनंजय गगनग्रास


आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात. एकट अस कोण असत नाही. आता माणसं आली म्हणजे अनुभव आले आणि अनुभव हे काही फक्त चांगले असतातच अस नाही. ते दोन्ही स्वरूपाचे असतात. कधी चांगले तर कधी वाईट आणि हे अनुभव ज्या लोकांकडून आपल्याला मिळतात ती लोक कधी जवळची असतात, कधी नुसत्या ओळखीची तर कधी वर वर भेटलेली. आता या सर्वांशी आपली नाती तयार झालेली असतात. कोणत्या आधारावर? तर विश्वासावर, मैत्रीवर, प्रेमावर. नातेसंबंध मग ते वैयक्तिक असुदे किंवा सामाजिक असेच विकसित होत जातात.

पण तेच जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून वाईट अनुभव येतो तेव्हा आपण त्याला काहीतरी नाव ठेवायला सुरू करतो. तो माणूस वाईटच आहे, विश्वास ठेवण्यालायक नाही. अश्या प्रकारे आपण काहीतरी लेबल लावतो. ना त्याची ती चूक पडताळून पाहत ना त्याला पुन्हा संधी द्यायचा प्रयत्न करत.

एकदमच आपण त्या माणसाला कैद्याच्या कठड्यात उभ करतो. खरोखर नसल तरी मनातल्या मनात अस अनेकदा होत. छोट्या छोट्या गोष्टीवरून विकोपाला जाणारे वाद त्यामागची मानसिकता अशीच असते. कारण कुठेतरी आपला असा अट्टाहास असतो की आपण नीट वागतोय ना, मग समोरच्याने पण आपल्याशी अगदी तसच वागावं, त्याने चुकुच नये. पण अस खरच शक्य आहे का?

समोरच्या व्यक्तीकडून कधी चूकाच होऊ नयेत अस म्हणणं पटण्यासारखं आहे का? आणि तस झालं तर समोरची व्यक्ती पूर्णपणे चुकीचं होण हे पटण्यासारखं आहे का? जरी आपण मानलं की हा टी व्यक्ती दुष्ट आहे, वाईट आहे. पण काहीही झालं तरी ती शेवटी एक माणूस आहे ही गोष्ट लक्षात घेऊन आपण तिला सुधारण्याची संधी देऊ शकत नाही का? नक्कीच देऊ शकतो आणि दिली पण पाहिजे.

अगदी अट्टल गुन्हेगाराला पण संधी दिली जाते फक्त कारावासाची शिक्षा देऊन. आपल्याला तर फक्त अश्याना संधी द्यायची आहे ज्यांना खरच त्यांच्या चुकीची जाणीव आहे. ज्यांना खरच सुधारायची इच्छा आहे आणि दुसऱ्याला माफ करून आपण कधीही लहान होत नाही.

उलट आपण त्यांच्यामध्ये हा विश्वास निर्माण करतो की तुम्ही खरच तुमची चूक सुधारू शकता, तुमच्यासोबत कोणीतरी आहे जे तुम्हाला यात मदत करेल. माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला आपण नक्कीच मदत करू शकतो. समाज यानेच तर तयार होत असतो. अनेकदा अस होत की समोरच्याला मदत करण, चूक असूनही त्यांना सोडून देणं म्हणजे त्यांच्या चुकांच समर्थन करण होईल. तर अस नाहीये.

Rebt चे जनक अल्बर्ट एलिस यांनी एक छान वाक्य सांगितलं आहे. जेव्हा आपण एखाद्याला त्याच्या चुकांसकट स्वीकारतो तेव्हा आपण त्याच्या चुका किंवा त्याने जे काही वाईट केलेलं असेल ते स्वीकारत नाहीये तर त्यापलीकडे तो एक माणूस आहे हे स्वीकारत आहोत, आपण त्याच्या चुकांच समर्थन नाही करत तर तो एक चुकू शकणारा माणूस आहे हे स्वीकारतो.

आणि जेव्हा आपण जे स्वीकारू, जेव्हा आपल्याला हे समजेल की या चुकिमागे त्याच कोणत तरी कौशल्य कमी पडत आहे ते त्याला नीट करायचं आहे तेव्हाच आपण त्याला मदत करू शकतो, संधी देऊ शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “वाईट आहे, दुष्ट आहे याहूनही आधी तो एक माणूस आहे म्हणून त्याला एक संधी मिळू शकत नाही का?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!