Skip to content

लाईफ पार्टनर निवडण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूयात….

लाईफ पार्टनर निवडण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूयात….


सौ. मयुरी महेंद्र महाजन

पुणे (चिंतामणी चौक)


मित्रहो, खरं तर हा जिवाभावाचा विषय आहे, जिवाभावाचा यासाठी की प्रत्येक जणचं कधीतरी या टप्प्यावरती येऊन विचार करतोचं……
मग त्यात मुलगी असेल किंवा मुलगा,

आज-काल जागतिकीकरण आणि आधुनिकीकरण होत असताना आज प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा बघायला मिळते, आणि या सर्वांत आयुष्याचा जोडीदार निवडताना प्रचंड कसरत करून सुद्धा कुठेतरी कमीच पडते अशी मानसिकता तयार झालीय….

मला सर्वात आधी सांगावसं वाटतं की लाईफ पार्टनर निवडणे जेव्हा आपण आपल्या आयुष्यात आयुष्याचा साथीदार म्हणून निवड करणार असू….त्या वेळेस खरंच आपण काय बघतो, त्याच्याकडे पैसा किती? त्याच्याकडे शेती किती?

तो नोकरीला आहे का?
किती पॅकेज आहे?
फॅमिली मध्ये किती लोक आहेत?
तो दिसायला सुंदर आहे का? त्याचे वय किती आहे?
तो माझ्यासाठी काय करू शकतो ,वगैरे …..

ही झाली एका मानसिकतेमध्ये ठरवलेली चौकट, पण वास्तव हे सांगते की ज्या अपेक्षा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून करणार आहात, त्यापैकी किती गोष्टी तुमच्या स्वतःकडे आहेत, आणि त्याही तुमच्या स्वबळावर….

कारण की लाईफ पार्टनर निवडणे हे काही भाजीपाला निवडण्या सारखे नाही ,
किमान बायका ते सुद्धा खूपच चाचपळून त्याच्याकडून घेतात, त्यात शंका नाही….

जर काही भाजी खराब निघाली तर आपण फेकू शकतो , पण आयुष्यात च्या बाबतीत मात्र तसे निर्णय घेता येत नाही, मी तुम्हांला खरचं अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचा जोडीदाराची निवड करताना खूप सोपे जाईल ….

काही जण आपापल्या एज्युकेशनची मुलं-मुली शोधत असतात , त्यांना मला एक सांगायचे आहे, लग्न दोन जीवांचा होणारं आहे, ना की आपल्या एज्युकेशनचे आणि हो जर तसं ठरवलं असेल तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या मध्ये तुम्हाला कुठेतरी ॲडजस्ट करावेचं लागणार …..

1 गुण = या जगात परिपूर्ण असे कुणीच नाही ,माझ्यातही काही कमतरता आहेत ,बेस्ट सुद्धा काहीतरी आहेचं,
त्यामुळे जोडीदाराची निवड करत असताना प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनासारखीचं मिळेल ,
असे नाही त्यामुळे कुठलाही व्यक्तीला तो एक माणूस म्हणून आपल्याला कसा वाटला ,
याचा आधी विचार करा….

2 प्रेम= काही लोक प्रेमात असतात, एकमेकांशी बोलणे, भेटणे, एकमेकांना वेळ देणे हे वाढत जाऊन जोडीदार म्हणून निवड करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र एकमेकांची उणीदुणी सांगतात, मला सांगायचं आहे जर खरच एकमेकांवरती खरं प्रेम असेल तर एकदा हातात घेतलेला हात शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सोडू नका…. कारण की आजकाल लग्न करणे हेसुद्धा बर्‍याच जणांसाठी एक व्यवसाय आणि त्यातून कितीतरी लोकांची लूट करणे ,अशांपासून सावधान रहा….

3 कुठलेही व्यसन नसावे = मुलाजवळ भले पैसा कमी असेल त्याने काय फरक पडतो, तो निर्व्यसनी असावा त्याची कमाई राहणीमान साधे असेल असू द्या ना, त्याच्या नावावर कुठलाही गुन्हा नसावा, त्याने जे काही कमावले स्वतःच्या आयुष्यात ते सर्व त्याच्या स्वबळावर आहे का ?
आधी ते बघा…

4 स्वभाव = समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि आपला स्वभाव त्यामध्ये आप जुळवून घेऊ शकतो का ? ते बघा …..

5 तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला आधार द्यायला तयार आहे का? कारण आयुष्य आपले आहे, लग्नानंतर ते गुलामगिरीत नव्हे तर स्वतंत्रपणे आपण जगू शकतो का ?याचा आधी विचार करा,

6 माझ्या मैत्रिणीचे खूप चांगले आहे ,मलाही तसा जोडीदार हवा आहे , हे कधीच डोक्यात ठेवायचे नाही, येथे प्रत्येक माणूस वेगळा आहे, खूप मोठ्या बंगल्यामध्ये नोकर म्हणून राहण्यापेक्षा, आपल्या झोपडीत राणी म्हणून जगायचे ,

7 जोडीदाराची निवड करताना प्रामाणिकपणे आपले मत आणि आपल्या विषयीची माहिती देणे, समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा तशी माहिती घेणे गरजेचे आहे , मग त्यामध्ये काही शारीरिक अपंगत्व असेल, कुठल्या आजाराने ग्रस्त असेल, काहीही ……

लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी त्या व्यक्तीशी एकदा तरी चर्चा नक्की करा, त्याच्या वागण्या बोलण्यावरुन तुम्हाला कळेलचं की तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकतात का?

8- लग्नाची स्थळे येण्याची सुरुवात झाली, तर एक धडकी भरते, असंख्य प्रश्न डोक्यात घर करू लागतात, कसं होणार, काय होणार, झाल्यानंतर पुढे संसार कसा होणार ,वगैरे … पण एक लक्षात घ्या, कुठलेही स्थळ असेल पण त्यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या,
जर आपण मध्यमवर्गीय असणारं तर आपण जास्त श्रीमंताच्या घरी अपेक्षा करणे चुकीचे आहे,

आपल्या कुवतीपेक्षा जास्त पण नको, आणि कमी पण नको मुलगी मिळत नाही म्हटल्यावर का कोणालाही मुलगी द्यायची का?
नाही, कारण स्वाभिमानाने जगण्यासाठी आपल्या स्वाभिमानाचा सन्मान होईल अशाच घरात मुलगी द्या….

मुलींना आवर्जून सांगावसं वाटते मला, अपेक्षा फक्त मुलांकडून ठेवणार का ? तुम्ही सुद्धा स्वावलंबी झाले पाहिजेत या अर्थाने असे नको की तुम्ही काम करता म्हणून तुम्ही काही घरच्या मंडळींना कमी लेखणारं… आणि मुलांना जर मी कमवतो तुला काय घर आणि मुलं बाळं सांभाळायची असा हलकट विचार असेल… तर तेथे घरच्या लक्ष्मी जी प्रगतीची दारे बंदच असतील…

10 विश्वास =आपण जोडीदाराची निवड करणार त्यासाठी दोघांमध्ये विश्वास निर्माण होणे महत्त्वाचे आहे, आणि त्या ठेवलेल्या विश्वासाला दोघांनी निभावणे हिच खरी परीक्षा… वेळ ही कधीही बदलू शकते त्यामुळे कुणाच्याही आजच्या वेळेवरून त्याच्या भविष्याची आखणी करू नका…

शेवटी एकच सांगेन बरीच लोकं चांगलं चांगलं बघत असताना त्यांना नेमकं काय चांगलं हवं असतं तेच कळत नाही….मित्रहो आपल्या जोडीदाराबरोबर आपण मस्त सुखाने चटणी भाकरी खाऊन समाधानाने जगू शकतो हेच खरं समाधान असतं… माझी मैत्रीण मला सांगते कुंडली जुळो ना जुळो दोघांची मनं जुळली पाहिजेत, हे महत्त्वाचे आणि हो,

अक्सर लोक बेहतर की तलाश में बेहतरीन खो देते है.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!