Skip to content

लहान-सहान गोष्टींचं खूप टेन्शन येत असेल तर हा लेख नक्की वाचा..

लहान-सहान गोष्टींचं खूप टेन्शन येत असेल तर हा लेख नक्की वाचा..


हर्षदा पिंपळे


टेन्शन…”Life is full on tention” तुमचही असच आहे नं…? तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी हे असच असणार…अहो ,आयुष्य म्हणजे टेन्शन हे प्रत्येकाला असणारच यात काहीही शंका नाही. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीच टेन्शन आहे. पण कोणत्या गोष्टीच टेन्शन घ्यायच नी कोणत्या नाही यामध्ये मात्र आपली खूप गल्लत होते.

विनाकारण लहान-सहान गोष्टींच आपण टेन्शन घेत असतो.पण या लहान-सहान गोष्टींच टेन्शन घेणं गरजेचं आहे का..?अगदी ‘साखर संपली’ ते ‘चप्पल तुटली’ अशा लहान-सहान गोष्टींच टेन्शन घेणाऱ्या व्यक्ती आपल्या आजुबाजूला सहजपणे पाहतो.

तर काही असच रोजच्या जीवनातील काही छोटी छोटी उदाहरणं पाहूयात..

उदाहरण क्रमांक-१

घरातील साखर संपते….आणि नेमके त्याच वेळी अचानक पाहुणे घरी येतात.पण या अचानक आलेल्या पाहुण्यांमुळे कधी कुणाची शुगर वाढते तर कुणाचा “BP” अगदी वाढतो. कारण काय तर….साखर संपली , आता सरबत ,चहा कसं करायच…? हे साध सरळ छोटसं कारण…पण टेन्शन मात्र किती ते….???

उदाहरण क्रमांक-२

चहाचा कप हातातून निसटून फुटतो , खाली काचा-काचा होतात. पण त्यावेळी त्या एका कपावरच किती वेळ चर्चा रंगते.कप निसटला , हात ओला होता नाहीतर कप निसटलाच नसता आणि काचा काचा झाल्या नसत्या. वगैरे वगैरे त्या एका क्षणावर एक दोन पानाचा निबंध सहजच लिहून होईल इतकी चर्चा नी विचार करणारी माणसं आपण नेहमीच पाहतो.

उदाहरण क्रमांक-३

प्रत्येकाच्या घरी पाहुणे हे येतातच.पण मग पाहुणे घरी आले म्हणजे अगदी तारांबळ उडते. एक मेंबर जरी वाढला तरी रोजच्या जेवणाच गणित बिघडतच असं समजून स्वतःचीच घालमेल करून घेणाऱ्या सुगरणी विचारायलाच नको.त्यांना भाजी तिखट चालेल नं..? आणि पापड ठिक आहे नं…की चार भजा पण करायला हव्या…? नाही नाही भाजीला थोडं जरा जास्तच वाटण लावायला हवं..काय ते त्यांच्या घरी असच बनवत असतील नं…वगैरे वगैरे किती ते टेन्शन…!

उदाहरण क्रमांक-४

जेव्हा अलार्मच गणित चुकतं……..आई गं.. , उशीर झाला..आज सकाळी उठायलाच उशीर झाला. मी अलार्म लावला होता पण तो ऐकूच आला नाही. आता मलाच आठवत नाही नक्की मी अलार्म लावला होता की नाही…?जायच होतं बाहेर मला आता उशीर झाला. श्शी यार….माझ्याचमुळे झालं सगळं…..मी नीट पहायला हवं होतं अलार्म लावलाय की नाही ते…..आपण श्वासच घेत नाही पण टेन्शन मात्र श्वासासारखच घेतो.

ही झाली काही साधी सोपी उदाहरणं. पण मला सांगा या अशा बारीक सारीक गोष्टींच टेन्शन कशाला घ्यायचं…? अहो साखर संपली तर दुकानात जाऊन आणता येते त्यात स्वतःचा पारा वाढवून घ्यायची काहीच गरज नसते. आणि फुटलाच कप तर फुटुद्या. तुटलीच एखादी गोष्ट तर तुटूद्या. काही गोष्टी पुन्हा जोडता येतातही.चिकटपट्टी , डिंक कशासाठी आहेत…? जोडण्यासाठी तर आहेत.

पण तरीही आपण किती टेन्शन घेतो. आता तुम्ही म्हणाल की , तुम्हाला नाही माहीत ह्या पाहुण्यांच कसं असतं ते.. , काही कमी पडलं तर लगेच बोलायला लागतात. पुढे पुढे तर बोलतातच आणि मागेही जास्तच बोलतात.आमच्याकडे असं नसतं तसं असतं असं बोलतात ते पाहुणे.त्यांच कसं सगळं नीटनेटकं व्हायला हवं….बरोबर नं….? असं होतं का तुमच्यासोबत…?

आता पाहुणे सगळ्यांकडेच येतात. हल्ली तर चांगले पाहुणे वाईट पाहुणे असेही प्रकार पहायला मिळतात.काही खूप मिजासी वाटतात तर काहींना खरच जाणीव असते. नाही … आमच्या कडे नं असच असतं , तसच असतं वगैरे वगैरे बोलणारे ते पाहुणे…इतकं का लक्ष द्यायच त्यांच्याकडे…? अहो ते तर कितीही काहीही केलं तरी बोलतातच.

पण म्हणून इतकी स्वतःची दमछाक करून घ्यायची का..?काही पाहुणे खरच खडूस असतात बरं…त्यांना कितीही चांगलचुंगल करा , पण नावं मात्र ते ठेवतातच..इतकच नाही ओ…सारख सारख येत राहतात पंचपंक्वान्नांंच्या पाहुणचाराला….(काही पाहुण्यांना वाईट नको वाटायला पण काय करणार… असतात ओ काही त्रास देणारे पाहुणे…..)

अलार्म झाला नाही म्हणून कोण इतकी काळजी करतं…झाला थोडा उशीर तर काय बिघडतय…रोज रोज तर आपण असं करत नाही. ठिक आहे फार फार तर थोडा उशीर होईल पण मग असं टेन्शन घेणं चांगलं नाही नं…?

कशाला टेन्शन घ्यायच अशा लहान-सहान गोष्टींच…मस्त खेळायच , दंगा करायचा , मनं कामात , कलेत गुंतवायची तर बसता तुम्ही टेन्शन घेत. “Be cool ,Be calm” ला आपल्या आयुष्यात प्राधान्य द्या.”chillpills” घ्या नी cool रहा…आता chillpills म्हणजे काहीही होऊ द्या पण डोकं थंड ठेवा . इतकं टेन्शन घेऊन अजून टेन्शन वाढवू नका.या अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात अशा गोष्टींच टेन्शन घेणं म्हणजे खूप कठीण आहे. स्वतःसाठी आणि इतरांसाठीही.त्यामुळे टेन्शन ला भुर्र पाठवा…कायमच्या सुट्टीवर… हसा खेळा….Cool रहा….

कारण , आयुष्य सुंदर आहे… ते असं लहान-सहान गोष्टींच टेन्शन घेण्यात घालवू नका…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!