Skip to content

‘लव्ह यु जिंदगी’ सतत म्हणा व तशी कृती करा…रूसलेल्या आयुष्याची तीव्रता हळुहळू कमी होईल.

‘लव्ह यु जिंदगी’ सतत म्हणा व तशी कृती करा…रूसलेल्या आयुष्याची तीव्रता हळुहळू कमी होईल.


हर्षदा नंदकुमार पिंपळे


जो दिल से लगे
उसे केह दो हाय हाय हाय
जो दिल न लगे
उसे केह दो बाय बाय बाय….
लव यू ज़िन्दगी
लव यू ज़िन्दगी
लव यू ज़िन्दगी….!!!

‘डिअर ज़िन्दगी’ हा चित्रपट आणि या चित्रपटातील ‘कौसार मुनीर’ यांनी शब्दबद्ध केलेल हे गाणं अगदी कमी शब्दात खूप काही सांगून जातं. गायक ‘अमीत त्रिदेवी’ आणि ‘जसलिन’ जेव्हा ‘लव्ह यु ज़िन्दगी’ ज्या सूरात गातात तो सूर थेट मरगळलेल्या मनाला एका क्षणात रिफ्रेश करतो.जर त्यांचा तो सूर एका क्षणात रिफ्रेश करत असेल तर आपण हेच (लव्ह यु ज़िन्दगी) रोज स्वतःला ओरडून सांगितलं तर किती छान होईल बरं…! म्हणजे स्वतःच्या अंतरंगातील सूर जेव्हा स्वतःलाच ऐकू येईल तेव्हा तर काय वाटेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. स्वतःचा सूर ऐकणं म्हणजे निव्वळ सुख….!

कधीकधी आयुष्य रूसतं
आपल्यावरच हिरमुसतं……
सगळं सोडून थेट एका
कोपऱ्यात जाऊन बसतं……

अशा या रूसलेल्या आयुष्याची तीव्रता हळुहळू कमी करायला हवी नं…? पण मग त्यासाठी आपण आपल्या आयुष्यावर प्रेमही करायला हवं.आपण इतरांवर प्रेम करतो , निसर्गावर-प्राणीमात्रांवरही प्रेम करतो.ईतकच नाही तर इतरांच आयुष्यही सुखी-समाधानी व्हावं यासाठी प्रयत्न करतो.पण आपल्या (स्वतःच्या) आयुष्याच काय…? या सगळ्यामध्ये आपण आपल्या आयुष्यावर/स्वतःवर प्रेम करायला विसरून जातो. आपल्या आयुष्याची काळजी आपण नाही घेतली तर आयुष्य रूसणार नाहीतर काय होणार नं…!

म्हणून म्हणते , उठा…आणि एकदा आपल्या आयुष्याकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पहायला सुरुवात करा. आयुष्य कण्हत कण्हत जगण्याऐवजी ‘लव्ह यु ज़िन्दगी’ म्हणत म्हणत जगायला सुरुवात करा.आयुष्य खरं तर खूप साधं-सोप-सुटसुटीत आहे.आपणच त्या आयुष्याला गुंतागुंतीच/किचकट स्वरूपाच बनवतो. असं आयुष्याला किचकट बनवण्यापेक्षा आयुष्याची प्रत्येक स्टेज enjoy करायला शिका.लोक काय म्हणतील याकडे फारसं लक्ष देऊन स्वतःच्या जीवाची घालमेल वाढवून घेऊ नका.स्वतःच्याच हातांनी आयुष्याला वेगवेगळ्या बंधंनांमध्ये अडकवून ठेवू नका.

आयुष्य कसं आकाशासारखच विस्तीर्ण आहे.मग पंखाना दडवून ठेवण्यापेक्षा मोकळ्या आकाशात मोकळ्या मनाने उडत उडत भरारी घ्या.अगदी आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मोगऱ्याच्या कळ्यांसारखाच ओंजळीत वेचायचा प्रयत्न करा.सभोवतालच जग पहा किती सुंदर आणि रंजक असतं.

आणि आपण स्वतः त्या जगात असू तर ते जग अधिकाधिक रंजक वाटत जातं.मित्रांनो इतकच नाही तर प्रत्येक दिवसाची सुरुवात एका गोड ‘smile ‘ ने करा.एक हसू आयुष्यभर नाही पुरणार पण एक दिवस नक्कीच पुरेल.आपण हसलो तर आपल्या हसण्यामुळे समोरच्या चेहऱ्यावरही हसू उमटेल.आणि मग सभोवतालच्या वातावरणात पहा कसा जगण्याचा उत्साह वाढलेला दिसेल.

तक्रार…या तक्रारींमुळे तर अर्ध आयुष्य उगाचच बेचव होऊन जातं.त्यामुळे शक्य होईल तितक्या तक्रारी कमीच करा.(स्वतःही तक्रारीला जागा देऊ नका.) आयुष्य जसं आहे तसं स्वीकारून पुढे चालत रहा.कारण जगण्याची मजा / सौंदर्य हे थांबण्यात नाही तर पुढे जाण्यात असते. ( एखाद्या कळीच फुलात रूपांतर होतं अगदी तसच या आयुष्याच……कळी उमललीच नाही तर फुलासारखी सुंदर गोष्ट आपल्याला कधी अनुभवता आलीच नसती.)

केवळ पैशाच्या मागे आयुष्य खर्च करू नका.जगायला पैसा लागतो हे जरी खरं असलं तरीही कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे छंद आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.म्हणून आपल्या आवडीचा किमान एक तरी छंद जोपासा.ए(तिकीट गोळा करणे ते मातीची भांडी बनवणे…,गायन-चित्रकला-नृत्य-लेखन…)एखादं लव्ह यु ज़िन्दगी सारखं गाणं गा…आवडत्या गाण्यावर ठेका धरा…

थोडक्यात काय तर अंतरंगात दडलेला कलाकार कधीतरी बाहेर काढा.आयुष्याच्या आनंद या कलांमध्ये नक्कीच लपलेला असतो.तो शोधायला थोडं बाहेर पडा.एखादी रोजनिशी लिहायलाही काही हरकत नाही. पण शक्यतो रोजनिशीमध्ये सुखाचे क्षण / हसरे किस्से लिहून काढा.कधीतरी तेच वाचून वाचून तुमच्या हास्याला उधाण आल्याशिवाय राहणार नाही.

आणि जगायच असेल तर वर्तमानात जगा.भूतकाळात नी भविष्याच्या चिंतेत वर्तमानातील ताजेतवाने क्षण असेच वाया घालवू नका.बदलत्या काळानुसार स्वतःला ‘upgrade’ करावसं वाटत असेल तर बिंधास्त करा.केसं पिकलीत , खूपच लठ्ठू झालोय , चवळीची शेंग झालोय तर होऊद्या.व्यायाम करा,चालायला जा..योग्य तो आहार घ्या.आणि केस कलर करावेसे वाटतायेत तर तेही करून पहा.

पुन्हा लहान मुलांमध्ये जाऊन लहान व्हावसं वाटतय तर अगदी बेफिकीरपणे जा….त्यांच्यातीलच ‘एक गोंडस मुल’ होऊन जगण्यातील आनंद घ्या.कधी रडावस वाटलं तर रडा , मोठमोठ्याने हसावसं वाटलं जरूर हसा. कुणाला भेटावसं वाटलं तर भेटा. कुणाशी काही मनापासून ‘share ‘ करावसं वाटलं तर नक्की करा.ज्या गोष्टीतून निखळ आनंद मिळतो , जे जे आवडतं ते ते अगदी मनापासून करा.(फक्त इतरांना न दुःखावता..)

खरचं, रोज एकदा तरी आरशात पाहून मोठ्ठ्याने म्हणा…. लव्ह यु ज़िन्दगी…. !! (आणि ते केवळ म्हणू नका तर कृतीतूनही ते साध्य करा..आपल्या आयुष्यावर प्रेम करा..) इतकच नाही तर कधीतरी एखादं पत्र स्वतःच्याच आयुष्याला लिहा…पाठवा….सांगा आयुष्याला आपल्याला मनापासून काय वाटतय ते…. Like….

Dear zindgi…,

I don’t know how to say, But you mean a lot to me.Thank you for all the lessons.I really love you my ‘Dear Zindgi’.

Yours lovingly..,
…..

इतकं जरी मनापासून बोललात तरी खूप आहे. मित्रांनो , या आयुष्याला ‘once more’ हा नसतो.या जगण्यावर , या जन्मावर शतदा प्रेम करावे……..(मंगेश पाडगावकर) हे गाणं सुखावणारं वाटतं. पण आयुष्य एकदाच मिळतं.म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने/उत्साहाने भरभरून जगायचा प्रयत्न करा.आयुष्यावर ‘लव्ह यु ज़िन्दगी ‘ म्हणत म्हणत नक्की प्रेम करा.रूसलेलं आयुष्य हसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही……!

काय मग….’लव्ह यु ज़िन्दगी’ बोलणार नं…….??????


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “‘लव्ह यु जिंदगी’ सतत म्हणा व तशी कृती करा…रूसलेल्या आयुष्याची तीव्रता हळुहळू कमी होईल.”

  1. लेख खरंच खूप छान आहे . स्वतःला पत्र लिहिणं ही कल्पना नवीन आहे .

  2. खरंच हा लेख खूप सुंदर आहे आयुष्यावर प्रेम करायला लावणारा व आत्मकेंद्रित करणारा सुंदर लेख 🙏🙏

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!