लठ्ठपणाने त्रस्त झाले आहात???
आकांक्षा किरणराव आळणे
लठ्ठपणाने त्रस्त झाले आहात???
गरज फक्त जीवनशैली बदलण्याची नाही,गरज आहे माईन्डसेट बदलण्याची….!!!”
लठ्ठपणा एक सामान्यपणे आढळून येणारी शरीराची स्थिती. सडपातळ, फिट आणि healthy असणं सर्वांनाच आवडतं, सध्या ट्रेंड हा स्लिम आणि फिट दिसण्याचा आहे. हवी ती style करता यावी, हवे ते कपडे परिधान करता यावे ह्यासाठी तरुणींमध्ये तर चुरस सुरू असते.पण जे कोणी लठ्ठ आहेत त्यांनी हार मानून चालणार नाही. लठ्ठपणा कमी करता येतो फक्त सातत्य ठेवावे लागणार काही गोष्टींबाबत.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात. लठ्ठपणा कमी करणे ही एक lengthy process आहे. झटपट वजन कमी करा असे होत नसते. लठ्ठपणा जसा हळूहळू वाढत गेला आहे तसाच तो कमी करायला देखील वेळ लागणार,सातत्य लागणार.
सर्व प्रथम आपली मानसिकता सकारात्मक ठेवा, स्वीकार करा आपले वजन आपल्या ideal weight पेक्षा जास्त आहे. Ideal weight म्हणजे height नुसार आपल्यात हवे असलेले वजन, standard weight म्हणू शकतो आपण त्याला. Ideal Weight calculate करण्यासाठी खालील equation आहे-
Ideal weight=height in cm-100
ह्याचे उत्तर जे येईल ते म्हणजे ideal weight असते. आपले सध्याचे जे वजन आहे त्यातून ideal weight वजा करावे सध्य स्थितीतील वजन अर्थातच जास्त असेल ideal weight पेक्षा म्हणजेच तुम्ही लठ्ठ आहात. असो, सध्या जे वजन आहे त्यातून ideal weight वजा करून जो आकडा येईल तेवढे वजन तुम्हाला कमी करायचं आहे कारण ते extra fat आहे हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे.
एकदा मनाशी ठरवले की वजन कमी करायचे आणि मनस्थिती सकारात्मक ठेवली की वजनावर काम करणं सोपे जाते. जीवनशैली मध्ये बदल हा मूलभूत घटक आहे. आपले दैनंदिन routine कसे आहे हे डोळसपणे चेक करा. आपली सकाळ कितीला होते आणि रात्र कितीला हे बघा. सकाळी 5-6 दरम्यान उठण्याची सवय लावल्यास उत्तम आणि निरोगी आयुष्य जगण्याची सुरुवात तुम्ही केलीत असे समजा.
लठ्ठपणाला जबाबदार काही गोष्टी आहेत-
१. व्यायामाची phyiscal activity ची कमतरता
२. stress level
3. overeating (basically emotional eating, sweet craving जास्त होणे)
4. जेवणाची अनियमित वेळ
5. झोपेची अनियमित वेळ.
ह्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.ठराविक वेळा ठरवा.
रोज ६०-९० मिनिटे व्यायाम करावा. त्यात तुम्ही weight training, cardio, yoga असे mix combination करू शकता. रोज निदान १५ ते ३० मिनिटे नियमित मेडिटेशन करावे. ह्याने मन स्थिर राहील, stress level कमी होण्यास मदत होईल आणि भावनिकरित्या स्थिर राहिल्यामुळे overeating हे आपोआप च कमी होईल.
मेडिटेशन केल्यास लठ्ठपणाला कारणीभूत असलेले 3 घटक आपण दुरुस्त करू शकतो म्हणून रेग्युलर workout, डाएट, सोबतच मेडिटेशन ची साथ हे combination नक्की वर्क करेल. फक्त ३० दिवस करून बघा, तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला लागेल.
आणि एकदा फरक जाणवला कि पुढचं काम आणखीन सोपं होतं.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

