रोज अर्ध्या तासासाठी वाचन करा,गोंधळलेले मन भानावर येण्यास मदत मिळेलं….!
मयुरी महेंद्र महाजन,
पुणे,
एक वेळ होती, की ज्यावेळी घरातील मोठी असणार्या आजी, आजोबांचे अनुकरण करून, घरातील लहान मुले सुद्धा पुस्तक घेऊन वाचन करायला बसायची, हा ठेवा होता, संस्काराचा, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असायचा ,परंतु बदलत जाणाऱ्या जनरेशनच्या टप्प्यांमध्ये यात भरपूर बदल झाले,
तरीसुद्धा पुस्तकांवरती भरपूर प्रेम करणारे, पुस्तक प्रेमी आजही आहेत, आवडीचे पुस्तक मोरपंख ठेवून जपून ठेवणारेही आहेतचं, आज जर कोणी म्हणत असेलं की वाचन काय सांगता, त्यासाठी आम्हाला वेळ नाही, तर मला असं वाटते की प्रत्येकाला 24 तासाचं मिळतात, दिवसाचे, म्हणजे आवड असली की सवड मिळतेचं तसे….
आज आपल्या समस्यांमध्ये झालेली वाढ ,आपल्या गोंधळलेल्या मनाची व्यथा सांगते, परंतु ही व्यथा दूर करून आपल्या मनाला भानावर येण्यासाठी रोज अर्धा तासाची वाचन करणे, मदतीचे ठरेलं, कारण वाचनाने माणसाचे मन सशक्त होण्यास मदत होते, बुद्धी वृद्धिंगत होते, ज्ञानात होणारी वाढ आपल्या भविष्याच्या कितीतरी समस्यांचे निवारण करण्यासाठी मदत करते,
आज आपण सर्व तंत्रज्ञानाच्या जगात वावरतोय, की ज्यामध्ये आपण एका क्लिक वरती आपल्या जगातील कुठलीही माहिती मिळवता येते, वाचता येते, साठवता येते, परंतु शोकांतिका वाटते ,की माहितीचे विविध स्रोत उपलब्ध असताना, आपण त्याचे चिंतन आणि मनन करायला विसरून गेलोयं, एक वेळ होती घरातील माणसांची सकाळ ही वाचनाने व्हायची, मग त्यामध्ये धार्मिक ग्रंथ असो, वा पौराणिक कथा, किंवा कादंबरी असो, पण वाचन मात्र होत असे,…
रोज अर्ध्या तासासाठी तरी वाचन करावे, पण नेमके काय वाचावे? हे सुद्धा कळायला हवे.., कारण कोणी म्हणेल की मी रोज एक तास पेपर वाचतो, तर तसे नाही, पेपर जरूर वाचा, हरकत नाही, परंतु त्या बातम्या वाचताना आपल्या मानसितेला इजा पोहोचेलं, ईथपर्यंत त्याचे चिंतन करू नये ,कारण संपूर्ण जगाच्या क्रुरपणाचा तो आलेख वाटतो,
इतक्या बोगस पद्धतीने त्यात ती वास्तवता दाखवली जाते, आणि त्या वाचनाने आपण आपली सकाळ सुरू करणारं, तर निश्चितच दिवसभरात आपण त्या गोष्टीचे चिंतन करून स्वतःला त्रास करून घेणारं…
आज आपल्या सर्वांच्या हातात एक चालते, फिरते, आणि बोलते पुस्तक आहे, ते म्हणजे मोबाईल, आता याचा वापर आपण कसा करतो, ते आपल्या स्वतःवरती आहे, ज्या माध्यमातून आपण हे वाचन करतो, त्यातून मोबाईल हे एक साधन आहे ,साध्य नाही, अशी बरीच पुस्तक आहेतं, जी आपण ऑनलाईन वाचू शकतो, ऐकू शकतो, हे आपल्याला सहज उपलब्ध आहेत,
परंतु मोबाईल वरचे वाचन आपण इतक्या फास्ट करतो, की तितक्याच फास्ट मध्ये विसरूनही जातो, कितीतरी मेसेज असतात, त्पात कुठला तरी कधीतरी लक्षात राहतो, परंतु वाचन केल्याचे खरे समाधान त्यामध्ये कितीकदा मिळत नाही,..
पुस्तक हातामध्ये घेऊन वाचन करणे, या गोष्टीचे सुख काहीतरी वेगळेचं, अक्षरांवरून फिरणारी बोटे आणि शब्दांमध्ये असलेला आवाज थेट अंगावरती काटा आणतो, आपण ते अगदी मन लावून वाचत असतो, आज आपल्याला आपल्या लहानपणीचे एखादे पुस्तक जरी सापडले ,तरी आपल्याला किती आनंद होतो ,त्या पुस्तका प्रतीची आठवण,प्रेम असते,..
वाचाल तर वाचाल!!!! असे बाबासाहेब सांगून गेले, ते उगाचच नाही, एखादे तरी पुस्तक विकत घ्या ,आणि आवडीने वाचन करा ,पुस्तक म्हणून आपली आपणच आपली छोटीशी लायब्ररी तयार करू शकतो, आपल्या जीवनाचा ठेवा म्हणून जपून ठेवू शकतो,
वाचनाने आपल्या बौद्धिक क्षमता चौफेर होऊन, एक चांगला माणूस घडण्यासाठी मदत होते, वाचनाने माणूस घडत जातो, वाचनाने बुद्धीला आकार आणि त्याच्या क्षमतांचा विकास होतो, पुस्तके माणसांना घडवण्याचे काम करतात, आज आपल्या सर्वांसमोर भरपूर संधी आणि त्यासोबत वाढलेली स्पर्धा, आपल्या मनाचा गोंधळ सोडविण्यास अपूर्ण पडते ती आपली शक्ती, त्या वेळेस मदत करू शकते, फक्त आणि फक्त आपल्या पुस्तकांची दोस्ती …
जर आपल्याला वाचनाची सवय आधीपासून असेलं तर तिला जोपासत रहा, आणि नसेलं तर या नवीन वर्षापासून एक चांगली सवय स्वतःला लावून घ्या, जेणेकरून वर्षाच्या शेवटी आपण किती गोष्टी पुस्तकांमधून शिकलो, याची यादी होण्यासाठी मदत होईलं, चिंतन करावे, मनन करावे, वाचन करावे, मनाच्या डोही आनंद तरंग, घेऊया आनंद नव्या युगाचा, वाढेलं आनंद सप्तसूरांचा….!!!.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


