रात्री-अपरात्री अचानक एखादी प्रतिमा दिसण्याचा मानसशास्त्रीय काय अर्थ ??
सोनाली जे
आपण खूप छान गाढ झोपलेलो असतो आणि अचानक रात्री अपरात्री आपल्याला जाग येते , कधी दचकून ही . कारण काय तर तशी एखादी घटना , प्रतिमा आपल्याला झोपेत दिसते.
बरेचवेळा आपल्याला रात्री एका पाठोपाठ एक स्वप्न पडत जातात , रात्री अपरात्री अचानक एखादी प्रतिमा दिसते. किंवा एकच मोठे स्वप्न continue होत राहते ..जसे गाढ झोपेत स्वप्न बघत असताना अचानक जाग आली, किंवा वॉश रूम ला जाण्याकरिता उठलो तरी ही परत झोपल्यावर तेच किंवा तीच स्वप्न continue होतात..सकाळपर्यंत हे चालूच राहते पण सकाळी उठल्यावर रात्री कोणती किंवा कोणते स्वप्ने बघितले ते आठवतच नाही..काही स्वप्ने मात्र कायम ची लक्षात राहतात..आठवतात..
काही अंशी विज्ञान हे ही सांगते की शरीराची जी प्रकृती किंवा प्रवृत्ती असते त्यानुसार स्वप्ने पडतात.. आणि ही स्वप्ने बरेचदा रात्री अपरात्री दचकून उठवतात. जागे करतात.
१..कफ प्रकृती असेल तर पाण्यात पोहणे, पाऊस, पावसात भिजताना अशी स्वप्ने पडतात..अशा images दिसतात.
२. वात प्रकृती असेल तर हवेत तरंगतो, उडतो अशा प्रकारची स्वप्न पडतात.
३. पित्त ..स्वप्नात आग दिसते…
खरे तर तसे स्वप्नाचा खरा उलगडा तसा झालाच नाही..
मानसशास्त्र हे मानवी मन व वर्तन म्हणजे वर्तणूक यांचा अभ्यास करणारे शास्त्र..मन म्हणले की भावना आल्या..विचार आले …आणि वर्तन ..
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ फ्राईड यांच्या मते रात्री-अपरात्री अचानक एखादी प्रतिमा दिसणे , स्वप्नांचे नाते हे मानवी मनातील सुप्त भावना ..hidden emotions, anxiety.. म्हणजे चिंता किंवा desires .. इच्छा किंवा cognitive state म्हणजे विचार..thinking..reasoning , remembering… आठवण , स्मृती , प्रोब्लेम solving याच्याशी संलग्न आहे , recall या बरोबर निगडित आहे..
उदाहरण द्यायचे झाले तर भूक लागली असेल आणि गाढ झोपेत असू तर स्वप्नात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ दिसतील. किंवा रात्री झोपेत एकदम अचानक खाद्य पदार्थ खातो हे दिसून जाग येते.
एखाद्याचे वाईट चींतीले तर वाईट , नकारात्मक परिणाम डोक्यात असतात आणि आपण चुकीचे वागतो , वागलो हे डोक्यात असते ..म्हणजे आपल्या subconscious mind मध्ये आणींत्यातून आपल्यात guilt ही भावना सतत त्रास देत असते. आपल्या चुकीला आपल्याला देव ही माफ करणार नाही असे वाटत असते . आणि तेव्हा तेव्हा देवाची प्रतिमा झोपेत डोळ्यासमोर येते. कारण का तर आपलेच मन आपल्याला खात असते.
तसेच आहे जर एखाद्या बद्दल खूप चांगले विचार करत असाल , त्याच्या बरोबर प्रेमाचे संबंध असतील . आणि ती व्यक्ती दूर , परदेशी कामासाठी गेली असेल तर मनात सतत त्या व्यक्तीविषयी चांगल्या गोष्टी येत असतात. काम चांगले चालले असेल. खाणे पिणे. शिवाय तिथले हवामान त्या व्यक्ती सोबतच्या चांगल्या आठवणी नेहमीच येत असतात. जर त्या व्यक्ती सोबत बोलताना त्याचा तिथला एखादा कटू प्रसंग बोलण्यात आला तर ती आपली व्यक्ती अडचणीत असल्याचे दिसून रात्री अपरात्री दचकून जाग येते.
.किंवा अगदी सेक्स सारखी सुप्त भावना असेल तर स्वप्नात एखादी सुंदर तरुणी दिसेल किंवा आवडती स्त्री.. अगदी झोपेत वॉश रूम ला जायचे असेल तरी स्वप्नात washroom दिसेल.
काही मानसशास्त्रज्ञ सांगतात की आपण झोपलो तरी आपला ब्रेन..मेंदू हा कार्यरत असतोच..मेंदू मधला frontal lobe हा आपल्या memory शी related असतो..त्यामुळे आपल्या चांगल्या किंवा वाईट , किंवा उत्सुकता, चिंता , भीती , ताण, unconscious desires..wish fullfillment ..personal conflict जसे की कोणाशी वाद झाले असतील तर कोणी आपला पाठलाग करीत आहे, आपल्यावर कोणी हल्ला केला अशी स्वप्ने पडतात अशा प्रतिमा रात्री झोपेत दचकून उठायला भाग पाडतात… अशा अनुभवांची memory आपल्या मेंदूत साठलेली असते…थोडक्यात memory प्रतिमेच्या रुपात आपल्या समोर येते..
प्रोब्लेम solving चे उदाहरण द्यायचे झाले तर एखादे किचकट गणित आपल्याला काही केल्या सुटत नसते…पण जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हाही आपला मेंदू कार्यरत असतो आणि आपल्या subconscious mind मध्ये गणित आपण डोळ्यासमोर चित्रित करतो ..मांडतो आणि ते सोडविले जाते.
काही वेळेस काही medications मूळे ही विचार असतील त्या नुसार प्रतिमा दिसतात. काही वेळेस external stimuli याचा प्रभाव ही पडतो..उदाहरण द्यायचे झाले तर good smell आणि bad smell हे आपल्या positive किंवा negative प्रतिमा यांच्याशी related असतात..जसे कचरा जळताना प्रतिमा दिसेल. तर चांगला वास ..एखाद्या देवाची मूर्ती , मंदिर याची प्रतिमा आणि तो दरवळणारा सुगंध आपल्याला ती प्रसन्न इमेज दाखवेल.
काही वेळेस आपण एखाद्या जागेवर जातो आणि काही वर्षांनी खरेच त्याच जागी आपण जातो तेव्हा आपल्याला आठवते की आपण इथे आलो होतो..
मुलांना पेपर अवघड गेला तर आपण नापास होणार ही भीती असते. आणि नापास झालो तर पालक रागावणार , बरोबरची मुले चिडविनार हे डोक्यात असते. त्यामुळे रात्री बेरात्री अचानक पालक ओरडताना त्यांची प्रतिमा दिसते .. ही सुप्त भीती असते मुलांच्या मनातली ती प्रतिमेच्या रुपात दिसते.
एखाद्याला अंधाराची भीती वाटते तर कधी तशी अंधारातून जाण्याची वेळ आली तर ती भीती मनात अजून जास्त घट्ट बसते. आणि त्याक्षणी अंधारातून ती व्यक्ती जाते. पण रात्री झोपेत दचकून जाग येते कारण अंधारातून जात असताना कोणी तरी व्यक्ती , भूत , पिशाच पाठलाग करत आहे असे चित्र दिसते.
थोडक्यात मनातले विचार ,सुप्त भीती ही प्रतिमेच्या रुपात दिसत असतात. प्रकट होत असतात. तसेच एखादी घटना घडते तेव्हा ती आधी तशीच घडली असे जानविते पण ते असे का वाटते तर थोडेसे त्याला deja – vu म्हणता येईल का??
लहान मुले झोपेत हसतात कारण कोणता तरी चांगला अनुभव त्यांना दिसत असतो, एखादी व्यक्ती त्यांच्या सोबत खेळताना , हस्वताना दिसत असते. .याउलट झोपेत लहान मुले ओरडत उठतात कारण की मोठ्या कोणी रागावलेले असते..मारलेले असते..कोणाबरोबर भांडणं झाले असते..ती रागात असलेली व्यक्ती तो अनुभव झोपेत येतो आणि मुले झोपेत किंचाळत उठतात किंवा रडतात..
एखादा हॉरर movie बघितला तर रात्री त्यातले भयावह पात्र आपल्या मनात , डोळ्यासमोर येते . किंवा तशा प्रकारच्या भीतीदायक प्रतिमा दिसतात. पण म्हणजे खरेच रात्री-अपरात्री अचानक एखादी प्रतिमा दिसण्याचा कुठे ना कुठे तरी आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असतोच…आपले अनुभव चांगले ठेवा…
आनंद , उत्साह ..नावीन्य यांचा सतत समावेश ठेवा…निराशा, ताण स्ट्रेस चिंता anxiety यापासून दूर राहा , रात्री सोशल मीडिया पासून दूर रहा. भितदायक सिनेमे , सीरियल बघू नका. काही हलके फुलके , कॉमेडी बघा. किंवा आनंदी , बघा नाही तर चांगले वाचन करा. तर झोप ही गाढ लागेल आणि मन ही शांत राहील. तर अर्ध जागृत मनात subconscious mind किंवा स्वप्नात positive किंवा सकारात्मक अनुभव येतील. किंवा काहीच नाही येणार. Neutral राहाल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


