रागीट लोकांना त्यांच्याच जवळच्या लोकांचं सहकार्य मिळालेलं नसतं,म्हणून ते रागीट बनतात.
हर्षदा पिंपळे
‘राग’…राग ही तशी नैसर्गिक भावना आहे.एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर राग येणारे बराच च जण आहेत. ईतकच नाही तर आपल्या समोर काही चुकीच घडत असेल तरीही आपल्याला राग हा येतोच.अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही राग येऊ शकतो.कुणाला राग अगदी सहज येतो तर कुणाला राग सहजासहजी येत नाही.आणि इतकच नाही तर एखाद्याचा राग अगदी साखरेसारखा सहज विरघळतो तर एखाद्याचा राग हा काहीही केलं तरीही जात नाही. तर काहींचा स्वभावच मुळतः रागीट असतो.तर काहीजणं आजुबाजूच्या परिस्थितीमुळे रागीट बनत जातात.आजूबाजूच्या परिस्थितीचा त्यांच्या मनावर कळत नकळतपणे विपरीत परिणाम होत असतो.
आता राग येण्याची असंख्य कारणे असु शकतात. कुणाला अगदी छोट्या छोट्या गोष्टींचाही राग येतो . राग इतका भयंकर असतो की रागात या व्यक्ती वस्तूंची तोडफोड करायलाही मागे पुढे पहात नाही.तर काही जणं एका ठिकाणचा राग दुसऱ्या ठिकाणी काढतात. अर्थात आपण त्याला ‘वड्याच तेल वांग्यावर काढणे’ असं म्हणतो. पण अनेकदा कसं होतं या रागीट माणसांना कधीकधी त्यांच्या जवळच्या लोकांचच सहकार्य मिळालेलं नसतं म्हणून ही रागीट लोकं दिवसागणिक अधिकाधिक रागीट बनत जातात.
अनेकदा असं वाटणं साहजिक आहे की आपल्याला आपल्या लोकांच सहकार्य मिळावं.पण अनेकदा असं काहीच घडत नाही. अनेकदा कामात , नात्यात आपण वेगवेगळे वाद होताना पाहतोच.कित्येकजण एकमेकांवर स्वतःचा राग काढताना आपण पाहतो.आता साध सरळ सांगायच झालं तर कित्येक घरामध्ये आर्थिक विवंचना ही सातत्याने असते.(कधी कधी याला मोठं कुटुंबही जबाबदार असतं.ते “छोटा परिवार सुखी परिवार” असं म्हणतात ते उगाच नाही.)
यातच घरातील कितीतरी सदस्य हे त्या त्या ठराविक व्यक्तीवर अवलंबून असतात.किंवा घरातील त्याच सदस्यांच उत्पन्न हे परिस्थितीच्या मानाने खूपच कमी असतं.आणि या सगळ्यामध्ये घरातील जे मूळ कमावते असतात त्यांच्यावर कामाच प्रेशर , घरातील जबाबदाऱ्यांच प्रेशर असतं.यामध्येच जर अशावेळी त्याच व्यक्तीला इतरांच सहकार्य मिळत नसेल तर ती व्यक्ती चिडचिडी होत जाते.त्यांचा मनात साचलेला राग अक्षरशः एखाद्या स्फोटाप्रमाणे बाहेर येत राहतो. आपल्या माणसांनी आपल्याला थोडफार सहकार्य करावं,हातभार लावावा अशी त्यांची माफक अपेक्षा असते.परंतु ती पूर्ण होत नसेल तर ते त्या व्यक्तीला कित्येकदा सहन होत नाही.परिस्थिती कळत असूनही आपलीच लोकं आपल्याला सहकार्य करत नाहीत ही भावना त्या व्यक्तीच्या मनात कळत नकळतपणे द्वेष निर्माण करते.त्यामुळे त्या व्यक्ती कालांतराने अजूनच रागीट होत जातात.
आता अजून एखादं उदाहरण सांगायच झालं तर…करिअर… करिअरच्या बाबतीतही अनेकांना आपल्याच लोकांच सहकार्य मिळत नाही. काही कारणास्तव करिअरला हवा तसा सपोर्ट मिळत नाही. प्रोत्साहन मिळत नाही. त्यांना वाटतं की कुणी नाही तर निदान आपली जवळची लोकं तरी आपल्याला सहकार्य करतील.पण बऱ्याचदा त्यांना अपेक्षित असं सहकार्य मिळतच नाही. परिणामी ते चिडचिड करायला लागतात. त्यांना स्वतःबरोबर इतरांचाही राग यायला लागतो.ते प्रत्येक गोष्टीत रागीट बनत जातात.अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून राग राग करायला लागतात.
तर असा रागीटपणा कधी ना कधी सर्वांसाठीच घातक ठरू शकतो. आणि त्या व्यक्तीसाठी तर नक्कीच तो घातक ठरू शकतो.कारण प्रत्येक वेळी रागातून काही सकारात्मक बदल घडेल असं आपण खात्रीपूर्वक अजिबात सांगू शकत नाही.त्यामुळे शक्य होईल तितकं मुळातच रागीट असलेल्या लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. जिथे आपली जबाबदारी आहे तिथे आवर्जून सहकार्य करा.कारण त्याने समोरच्या व्यक्तीला दिलासा मिळू शकतो.त्याच्यावर असलेला भार हलका होऊ शकतो. आणि आपल्याला सहकार्य मिळतय या भावनेतून त्यांच रागावर नियंत्रण राहू शकतं.कारण कुणीतरी बोललच आहे की…’एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.’ त्यामुळे आपल्याच लोकांना आपण नाही सहकार्य करणार तर कोण करणार नं…?
So..पहा, कधी कधी लोकांच्या अशा रागीट स्वभावाला अनेकदा आपणच जबाबदार असतो.त्यामुळे त्यांना समजून घ्या.त्यांना थोडफार तरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

एक दम छान सुंदर खूपच छान सुंदर आवडले
Khup Chan
Khup chaan
tumhi je sangitl ahe . majhi pn ashich avastha ahe. ya ragala paryay shodhla a me ata. me ata aaplya lokan kdn apeksha nahi thevt mhnun shant jhalo a khup.