योग्य व्यक्तीकडे भावना व्यक्त केल्या की ताण-तणाव कमी होतो.
सोनाली जे.
भावना हा विषय emotional intelligence म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता याच्याशी निगडित आहे. भावनिक बुध्यांक जेवढा जास्त तेवढे एकमेकांना समजून घेणे जास्त जमते.एकमेकांच्या भावना जास्त चांगल्याप्रकारे समजतात..खरे तर म्हणूनच जेव्हा मित्र मैत्रिणी असोत. प्रियकर प्रेयसी, दोन भावंडे असोत, किंवा नवरा बायको असोत किंवा जवळची नाती यात एक कोणी तरी कायम समजून घेणारी व्यक्ती असते.
म्हणजेच काय तर त्या व्यक्तीचा भावनिक बुध्याअंक जास्त असतो.emotional intelligence quotient जास्त असतो. बरेचदा आयुष्यात अशी किंवा अशा काही मोजक्या व्यक्ती असतात की त्यांच्या बरोबर आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो.
आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपली मानसिक, भावनिक अवस्था कशी द्विधा आहे..किंवा बरेचदा आपल्याला जे म्हणायचे आहे ते इतर लोकांना समजतच नाही..आणि तेव्हा हे भावनिक दृष्ट्या समजून घेणारे लोक शांतपणे आपले ऐकून घेतात..त्यांना आपल्या भावना जास्त चांगल्या प्रकारे समजतात .आणि त्यांच्या बरोबर बोलण्याने बरेचदा आपल्याला काही मार्ग सुचत असतात.पर्याय सुचत असतात. किंवा कोंडलेल्या भावनांची सुटका..
ताण तणाव म्हणजे काय तर ही एक नकारात्मक प्रतिक्रिया किंवा भावना आहे. एखादी गोष्ट आपल्या कंट्रोल मध्ये नसेल तर, किंवा बाह्य परिस्थिती मध्ये होणारा बदल आपण पटकन accept करत नाही त्यामुळे आपल्या मनाची होणारी अवस्था म्हणले तरी चालेल .
मनुष्य मुळातच social किंवा सामाजिक प्राणी आहे.त्यामुळे अडीअडचणी असतील किंवा काही बोलायचे असेल , सल्ला असेल तर ज्यांना ज्ञान आहे , जे त्यावर बोलू शकतील ज्यांना भावनिक दृष्ट्या समजून घेण्याची इच्छा आहे. जे समजू शकतात.अशाच लोकांशी आपण discuss करत असतो ..आणि तेही ऐकून घेवून त्यातून योग्य मार्ग , पर्याय सुचवित असतात.
भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती भावनिक नियंत्रण तर ठेवत असतातच पण भावनांचे समायोजन ही खूप व्यवस्थित करीत असतात .आणि म्हणूनच आपण त्यांच्या बरोबर जेव्हा आपल्या हाता बाहेरची परिस्थिती , जे ताण असतात ते त्यांच्या बरोबर बोललो की ते त्यावर नुसते सांत्वन करीत बसत नाहीत किंवा जे होवून गेले त्याबद्दल हळहळ व्यक्त करीत नाहीत.
तर त्या परिस्थिती मध्ये नक्की काय करता येईल , यातून मार्ग काय काढता येतील आणि परिस्थितीशी समायोजन कसे करता येईल याचे मार्गदर्शन करतात.
ताण तणाव वाढला की आपले bp वाढते. Sugar वाढते.. काही वेळेस व्यसनाधीन ही होते व्यक्ती..
खुबसुरत पिक्चर मध्ये सोनम कपूर physiotherapist दाखविली पण तिला जेव्हा ताण येतो, राग येतो , चिडचिड होते , परिस्थिती कंट्रोल बाहेर जाते तेव्हा ती आणि तिची आई मंजू . दीर्घ श्वास घेतात सोडतात..म्हणजे एकमेकांना दोघी कंट्रोल मध्ये कसे राहता येईल हेच technique वापरतात..
तसेच मुन्नाभाई डीन डॉक्टर अस्थाना राग आला, चिडचिड झाली , परिस्थिती कंट्रोल बाहेर गेली तर laughter therapy cha वापर करत होता. तसेच मुन्नाभाई प्रत्येकाची भावनिक अवस्था समजून घेवून त्या परिस्थिती मध्ये मार्ग शोधताना भावनिक आणि शब्दिक जवळीक साधताना टेन्शन नहीं लेने का मामु..या बरोबर एक जादू की झप्पी देत असे म्हणजेच काय परिस्थिती ला शांतपणे , टेन्शन न घेता हसत खेळत तोंड कसे द्यायचे..परिस्थिती चा सामना करायचा ..त्यापासून भीतीने पळून जायचे नाही हेच तर शिकवीत होता.
३ idiots मधला famous dialogue आजही सगळ्यांना दिलासा देवून जातो .all is well ..all is well. फरहान ची फोटोग्राफी ची आवड , त्याच्या भावना , त्यात त्याची करियर करिता मिळालेली संधी आणि तो आई वडिलांच्या करिता engineering जबरदस्तीने करत असतो ..पण रांचो .. फुंसुख वांगडू ..त्याच्या भावना योग्य प्रकारे समजतो आणि नुसते च समजून न घेता फरहान कशात आनंदी राहील याकरिता त्यातून मार्ग काढतो .आणि त्यातून फरहान चे फोटो ग्राफीचे आवडत career निवडून तो यशस्वी होतो..
engineering सारख्या विषयात सततचे ताण तणाव यांना तोंड देणारा फरहान त्याच्या आवडत्या क्षेत्रात खूप समाधानी आणि प्रगती करतो.म्हणजेच काय तर अशी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी व्यक्ती असते च की जिच्या बरोबर बोललो की ताण तणाव कमी होतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


