येणारा काळ हा गेलेल्या काळापेक्षा सुंदरच असेल, हा विचार तुमची निराशा झटकून टाकेल.
मयुरी महेंद्र महाजन
वेळेनुसार प्रत्येक गोष्टीत बदल होतो,जसं की लहानपणी हट्टी, जिद्दी आणि टवाळखोर असणारे मुलं/मुली मोठी होत असताना आपल्यातल्या त्या सर्व गोष्टी कधीच मागे टाकून गेलेले असतात, याचा अर्थ जी गोष्ट आजच्या घडीला दुःखदायक वाटत आहे ,येणाऱ्या भविष्यात आपल्याला ती नक्कीच चांगला रिझल्ट देणारं, विद्यार्थी प्रत्येक दिवसाला अभ्यास करून स्वताच्या कमतरता वरती मात करू शकतो, आणि येणाऱ्या काळात त्याचा रिझल्ट उत्तमचं….
ही झाली काही छोटी उदाहरणे, जसा आपला विषय आहे, तर आपण याला विस्तृपणे समजून घेऊया ,बरीच मंडळी आपल्या भूतकाळातचं जगत असतात, भूतकाळ चांगला असेल, किंवा नसेल, पण भूतकाळात अडकून राहू नये ,कारण आपण भूतकाळात अडकून राहिलो तर आपल्याला वर्तमानाचा व येणार्या भविष्याची ही गोडी चाखता येणार नाही, भूतकाळ आपल्या जीवनात घडून गेलेला असतो ,परंतु त्याचे बरेवाईट परिणाम त्याचे पडसाद मात्र कायम आपल्या मनावरती कोरले गेलेले असतात,
काहींच्या वाट्याला खूप दुखद भूतकाळ आलेला असतो, आणि त्या भूतकाळाला आठवून आठवून त्याला ईतकं जिवंत केलेलं असतं ,की पदरी फक्त निराशेचाच सुरू असतो, जिथे आपल्याला असं वाटतं की आता ईथे सर्व संपलेलं आहे, आता इथून पुढे काहीच नाही, खरं तर तीच खरी वेळ असते, स्वतःसोबत लढण्याची, ठणकावून सांगण्याची, या साऱ्या वादळ वार्यांना या भूतलावरच्या प्रत्येक गोष्टीत आपला विचार रुजविण्याची, आपल्या निराशेला प्रति उत्तर देण्याची,
आपल्या प्रत्येकाचा सामना हा कधी ना कधी या निराशेशी होतोच ,परंतु यां निराशेला झटकून टाकायचे असेल, तर आपल्याला आपल्या विचारशक्तीला प्रगल्भ करावे लागेलं, येणारा काळ गेलेल्या काळापेक्षा सुंदरचं असेल, हा विचार जेव्हा सर्वप्रथम आपण मनात रुजवू, तेव्हा निराशा तरं झटकून निघेलचं, परंतु येणाऱ्या प्रत्येक क्षणातीलं आपण सुंदर तत्व शोधण्याचा प्रयत्न करू, काय नाही, यापेक्षा काय आहे, यावरती आपले लक्ष जाईल, आणि गेलेल्या काळाचा कितीही विचार केला ,किंवा त्याला सजवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्याला आपण काहीही करू शकत नाही, परंतु येणाऱ्या काळाविषयी जर आपण सकारात्मकतेने आणि चांगल्या विचार सरणीची जोड दिली, तर येणारा काळ आणखी सुंदर होऊ शकतो ,गेलेला काळ अनुभवता येतो ,मात्र जगता येत नाही, येणार्या काळाला आपण छानपणे जगून अनुभवू शकतो, जेणेकरून आपल्या भूतकाळात तरी आपण चांगल्या क्षणांची ठेव म्हणून त्या जोपासू शकतो,
निराशा येण्यामागे खरं तर काही कारणं असतात ,जसे की आपण जसे ठरवलेले असते तसे न होणे, किंवा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करूनही ती गोष्ट हाती न लागणे, किंवा आपल्या अपेक्षा आणि ईच्छांप्रमाणे काही गोष्टी न होणे आणि हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे, की लोक यामुळे निराश फील करतात, की जी गोष्ट दुसऱ्या आहे, ती माझ्याकडे का नाही, परंतु आपल्याकडे असणारी गोष्ट ती मात्र दुय्यम स्थानाला जाते, त्यामुळे सतत कोणाशी तरी स्पर्धा करणे, आपली ताकद आणि आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने वापर करणे, खरं तर आपली स्पर्धा ही आपल्या स्वतःशी आहे, आणि येथे प्रत्येक माणूस कलाकार आहे,
येणारा काळ हा आपल्या प्रत्येकासाठी अगदी सुवर्णा सारखा आहे, हो कारण की प्रत्येक दिवशी जेव्हा आपण झोपेतून उठून जागे होतो, खरंतर ही आपल्या प्रत्येकाला लाभलेली देण आहे, कारण त्या परमपिता परमेश्वराने आपल्याला हा सुंदर जन्म आणि येणारा प्रत्येक दिवसाचा सूर्योदय पाहण्याचे भाग्य दिले ,त्यासाठी आपण सदैव कृतज्ञ असायला हवं,
चांगला आणि वाईट काळ येत जात राहणार ,हे उतार-चढाव आहेत जीवनाचे, प्रत्येक वेळी जर आपल्या साठी चांगलीच वेळे राहिली असती, तर आपल्याला चांगल्याची समज राहिली नसती, गेलेल्या काळातून धडा घ्यायला हवा ,तेव्हा येणारा भरभरून देऊन जाईल, तेव्हा त्याचा पूर्णपणे आस्वाद घेता येईल,
आपल्या येणाऱ्या काळाला सकारात्मकतेने सामोरे जा, जाताना तो आपल्याला खूप समाधान देऊन जाईल ,आणि जी व्यक्ती भूतकाळात अडकून आहे, अशा व्यक्तींना जर पुन्हा त्यात तोच जिवंतपणा , तो उत्साह जागृत करण्यासाठी आपला हातभार लागत असेल, तर नक्कीच आपण अशा व्यक्तींना मदत केली पाहिजे ,आयुष्यात आपल्या हातून पुण्यकर्म घडेल, आणि याचं समाधान आपणाला खूप काही देऊन जाणार असेलं, त्यासाठी आपण एक प्रयत्न नक्की करायला हवा…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Jabrdast
khup chan wachun positivity aali khup khup aabhar ….!!!