Skip to content

या १० गोष्टी आपल्याला मोठ्या मानसिक संकटात टाकू शकतात !!

या १० गोष्टी आपल्याला मोठ्या मानसिक संकटात टाकू शकतात !!


सौ. मिनल वरपे


१) तक्रार करणे :

जे आहे त्यामधे समाधान मानलं की तक्रार करण्यासाठी वेळच मिळत नाही. पण जिथे समाधान नसेल, समोर आहे त्याचा स्विकार करण्याची तयारी नसेल तिथे हे असच का.. ते तसचं का.. हा असा का वागतो.. तो तसं का बोलला या सगळ्या तक्रारी निर्माण होतात आणि यामुळे जितकं सोप आपण जगू शकतो त्यापेक्षा अनेक पटींनी आपण आपल्या समस्या वाढवतो.

२) तुलना करणे :

माझं आयुष्य हे मी चांगल्या पद्धतीने जगू शकतो पण हे दुर्लक्षित करून जिथे आपण आपल्या आयुष्याची, जीवनातल्या घडणाऱ्या गोष्टींची, माझ्याकडे काय आहे काय नाही, शिक्षण असो, घर असो, नोकरी असो वा राहण्याची पध्दत असो या सर्वांची तुलना दुसऱ्या कोणाच्या आयुष्याशी करतो त्यावेळी होणारा त्रास इतका असतो जो कोणाला सांगता येत नाही आणि त्यावर आपल्याकडे उपाय सुद्धा नसतो.. मग अशावेळी आपण आपली कोणाशी तुलना न करता आपलं आयुष्य स्वतंत्र जगावं.

३) तिरस्कार करणे :

आपल्याला जीवन जगताना अनेक अडथळे येतात त्यामधे कोणी आपल्याला साथ देते तर कोणी त्रास देतो. कोणाचं वागणं.. बोलणं आपल्याला आवडत नाही.. आणि अशा व्यक्तींचा, घडलेल्या घटनांचा आपण इतका तिरस्कार करतो की त्याच्यात अडकून आपण आपल्या आयुष्यात पुढे न जाता आपला महत्वाचा वेळ तिरस्कार करण्यात वाया घालवतो.. यापेक्षा जे आपल्याला पटत नाही.. आवडत नाही त्याच्यात अडकण्यापेक्षा आपल्या प्रगतीकडे वाटचाल करावी.

४) संशय घेणे :

संशय आपल्या आयुष्याला पूर्णपणे पोखरून काढते.. संशयी स्वभाव कधीच कोणाला जगण्याची प्रेरणा देत नाही उलट सर्वांपासून दूर करण्याचं काम करतो. संशय घेण्यापेक्षा आपल्याला जितकं स्पष्ट वागता येईल तेवढंच आपण मोकळं आयुष्य जगू शकतो. संशयात एकदा अडकल की ना आपण आनंदाने जगत ना आपल्या आजूबाजूच्या माणसांना.

५) अतिविचार :

कितीही आणि कोणतेही महत्वाचे निर्णय घायचे असतील तर गरजेपुरती विचार करणे नक्कीच योग्य आहे.. आपल्या आयुष्यात अनेक सुख दुःख येतात पण जर आपण फक्त त्याचा विचार करत बसलो तर आपल्याला आज मिळालेला वेळ पुन्हा मिळणार नाही याचा विसर पडून आपण हातात असलेला वेळ सहज वाया घालवून नंतर पच्छाताप करतो. आणि अतिविचाराने आपण अनेक मानसिक समस्यांना आमंत्रण देतो.

६) ऐकून विश्वास ठेवणे :

जर आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, चुकीचे निर्णय टाळायचे असतील तर नक्कीच कोणी आपल्याला काही सांगतोय म्हणून विश्वास न ठेवता खर काय आहे त्याची खात्री करून त्यानुसार वागलो, निर्णय घेतले तर उत्तमच.. कारण कोणाच्याही सांगण्या बोलण्यावर विश्वास ठेवून निर्णय घेणं म्हणजे योग्य

७) आळस :

लहानपणापासून आपण एक सुविचार ऐकूनच आहोत आणि तो आपल्याला कायम यशाची गुरुकिल्ली म्हणून काम करतो. आळस हा माणसाचा शत्रू असावा.. अभ्यासाच्या वेळी अभ्यास केला नाही आळस केला तर वेळ गेल्यावर जेव्हा आपण करिअर करायचं ठरवतो तेव्हा आधी केलेल्या आळसाचे परिणाम आपल्याला दिसतातच.. फक्त अभ्यास नाही तर जीवनात कुठे कधीही केलेला आळस आपल्याला भविष्यात त्रास देणारच.. म्हणून आळस झटकून जास्तीत जास्त सक्रिय राहिल्याने आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही.

८) अवलंबून राहणे :

स्वावलंबी स्वभाव हा आपल्याला कायम स्वतःवरचा विश्वास वाढवतो आणि जास्तीत जास्त क्रियाशील बनवतो. जेव्हा आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो तेव्हा आपल्या कार्यक्षमतेवर आपल्याला विश्वास उरत नाही. आपली काम आपल्या वेळेत न होता दुसऱ्याच्या सोयीनुसार होतात. दुसऱ्यावर विसंबून राहिला त्याचा कार्यभाग बुडाला म्हणून स्वावलंबी राहणे केव्हाही उत्तम.

९) अपेक्षा ठेवणे :

आपल्याला जितकं जास्त निरपेक्ष राहता येईल तेवढं कायमच तक्रारींपासून आपण दूर राहणार. इतरांकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की त्याचा आपल्यालाच त्रास होतो. म्हणून जास्तीत जास्त आपल्याला आपल्या अपेक्षा पूर्ण करता येतील याकडे लक्ष द्यावं.त्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते .. स्वतःवरचा विश्वास वाढतो.. स्वावलंबी बनण्याची आपली क्षमता वाढते.. आणि आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो.

१०) अस्थिरता :

आपण जे ठरवतो.. जे करतो त्यावर ठाम राहील की आपली निर्णय क्षमता वाढते. अस्थिर आणि चंचल स्वभाव आपल्याला योग्य अचूक निर्णय घेण्यापासून दूर ठेवतो. जीवन सुयोग्य पद्धतीने जगायचं असेल तर खात्री करून ठाम निर्णय घ्यावे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!