
या गोष्टी केल्याने निव्वळ त्रासच होतो , साध्य तर काहीच होत नाही ….
काही लोक तोंडावर गोड गोड बोलतात आणि पुढे गेलं की लगेच त्या व्यक्तीबद्दल निंदा-नालस्ती चालू करतात , त्याची माप काढतात …
एखाद्याला वाटतं मीच शहाणा , शहाणी आहे म्हणून इतरांना कस्पटाप्रमाणे धरणे किंवा वागवणे ….
स्वतःला त्रास व्हायला लागला की, मलाच एकट्याला त्रास का ? म्हणून मग इतरांना त्रास देणे ….
स्वतःबद्दल अहंकार बाळगणे ….स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना कमी लेखणे….
अगदी गरज नसतानाही इतरांच्या फालतू चौकशा करणे , इतरांच्या आयुष्यात डोकावणे….
सतत इतरांशी तुलना करणे , स्पर्धा करणे आणि स्वतःला त्रास करून घेऊन दुःखी होणे…..
एखादा दुःखी असेल तर , ते पाहून स्वतःला सुख वाटणे , सतत एकमेकांच्यात काड्या करणे , लावालाव्या करून गैरसमज वाढविणे , भांडण लावणे….
एखाद्याला खूप यश मिळाले तर त्याच्याबद्दल आनंद होण्याऐवजी मत्सर वाटणे….
दुसऱ्यांचे चांगले गुण बघण्याऐवजी फक्त द्वेषच बघणे, सतत फक्त चुकाच काढणे , एकमेकांना टोमणे मारणे….
दुसऱ्याच्या संपत्तीवर जळणे , किंवा त्याच्याकडे , तिच्याकडे एवढे का ? मला का नाही यातून दुःखी होणे….
अजूनही खूप सांगता येतील …या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे मनुष्याला काहीही साध्य होणार नाही आणि लोक अशा व्यक्तीबरोबर दूरच असलेल बरं म्हणून लांबच राहतात…..
त्यातून फक्त दुःख , त्रास , आणि वेळेचा अपव्यय होणार आपली उर्जा वाया जाणार ….
हे सर्व प्रत्येकाने सोडून दिले तर आयुष्यात स्वतःसाठी खूप काही करता येईल …. आनंद , सुख , समाधान मिळेल.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


