Skip to content

…म्हणून शांत राहणं किती चांगलं असतं बघा!

…म्हणून शांत राहणं किती चांगलं असतं बघा!


सौ. मिनल वरपे


मला तर बाबा त्यांचं काहीच नाही पटत.. त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचे विचार हे आपल्या डोक्याच्या बाहेर जातात.. आपला आणि त्यांचा काही ताळमेळच बसत नाही .. आपल म्हणणं पूर्वेकडे तर त्यांचं पश्चिमेला… मग अशावेळी आपण काय करतो…

असच काहीस सचित आणि त्याच्या घरातल्या मंडळींच.. म्हणजे व्हायचं काय तर माणसं म्हंटले की हाताची पाच बोट.. कोणी सारखं नसते मग तर असे वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एका घरात असली की कुठे कस वागायचं , काय बोलायचं याच तारतम्य प्रत्येकाला असायला हवं..

सचित खूप मोकळ्या स्वभावाचा.. मनमुराध जगणारा.. कोणाला त्रास होईल अस कधीच न वागणारा आणि चुकीचं काही घडत असेल तर त्याचा प्रतिकार करणारा… आणि वेळेचं भान.. वस्तुस्थितीची जाणीव असलेला मुलगा..

आणि घरात म्हणाल तर सगळे चांगले असले तरी भांड्याला भांड लागतेच ..आई वडील, भाऊ वहिनी, आणि सचित हे त्यांचं कुटुंब.. भाऊ आणि वहिनी अगदी कोणत्याही कारणाने एकमेकांवर कुरघोडी करणारे… आणि त्यांच्या दोघांत इतकं भांडणं की पूर्ण घरातलं वातावरण बिघडणार.. सुरवातीला सचित सुद्धा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचा.. पण नंतर त्याला कळून चुकलं की यांची भांडणं काय आपल्या समजावण्याने थांबणारी नाही म्हणून अशावेळी शांत राहण्याची सचितची भूमिका कायमच..

पण घरातल्यांच काय तर आपल्या मुलाचा संसार नीट व्हावा म्हणून काळजीने आई वडील नेहमीच त्यांच्या वादात त्यांना समजवण्याचा, चांगल शिकवण्याचा प्रयत्न करणारे पण त्याचा त्यावेळी काहीही उपयोग नसायचा उलट दुसऱ्या दिवशी आई वडिलांची तब्येत बिघडणार आणि हे नवरा बायको मात्र कारण शोधून एकमेकांशी गोडीगुलाबीने राहणार अर्थात रहावच पण दुसऱ्यांना त्रास देण्यात काय अर्थ आहे .

भांडणात पडून त्यांना समजावून जर काहीच उपयोग होणार नसेल उलट आपल्यालाच त्याचा त्रास होणार असेल तर त्या वादात आपण अडकाव आणि त्रास करून घ्यावा हे बर आहेका??? की सचित सारखं शांग राहण्याची भूमिका घेऊन वादापासून अलिप्त राहावं.. सचित शांत राहतो म्हणून त्याच्यावर वादाचे चांगले वाईट कोणतेच परिणाम होत नाहीत…म्हणून शांत राहणं किती चांगल असते बघा…

असे एक ना अनेक उदाहरणं हे आपल्याला ऐकायला तसेच अनुभवायला मिळतात..कधी घरात तर कधी कामाच्या ठिकाणी… कधी मित्र मैत्रिणीमद्ये तर कधी कोणत्या कार्यक्रमात.. अस कोणीतरी नक्कीच असते जे कोणाचं ऐकून घेत नाहीत.. आपल्याला त्यांचा स्वभाव पटत नाही..मग काय वाटते अशावेळी कस वागायचं..??? सचित सारखं शांत राहून की जे होतेय त्यामधे आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करून स्वतःलाच त्रास करून घेणं…

आपले शब्द… आपली मतं अशा ठिकाणी वापरायचे जिथे त्यांचा योग्य उपयोग होतो.. काही माणसं अशी असतात ज्यांना कितीही समजवण्याचा, चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचंच खरं करतात.. त्यांचा स्वभाव ते सोडत नाहीत मग अशावेळी आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा शांत राहण्याचा आपला निर्णय आपल्यालाच फायद्याचा होईल..

आपण कुठे प्रतिकार करावा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने प्रतिकार करावा हे सुद्धा आपल्याला त्यावेळी लक्षात यायला हवं.. चुकीचं होतेय पण त्यामधे शब्दाला काही अर्थच नाही अशावेळी शांत राहून तिथे न अडकण्यातच त्या गोष्टीचा होणारा प्रतिकार असतो… म्हणतात ना जस मोठ मोठ्या हत्यारांपेक्षा शब्द हे सुद्धा आक्रमक ठरतात अगदी तसचं काहीवेळेस शब्दांपेक्षा शांतता हीच त्यावेळेच्या प्रतिकार करत असते….

ती माणसं.. ती वेळ.. ती परिस्थिती.. जर आपल्या शब्दांनी बदलणारी असेल तर नक्कीच आपण तिथे जमेल तितके प्रयत्न करावेत.. पण जिथे सगळच न बदलणार असेल.. वेळ हीच त्यावर योग्य मात्रा असेल तिथे आपण काहीच न बोलता शांत राहण्याची भूमिका घेतलेली केव्हाही उत्तम….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!