मोबाईल देताना विचार केला नाही, आता डोकावून काय उपयोग !!
टीम आपलं मानसशास्त्र
साधारणपणे १९८५ पर्यंतची जी पिढी आहे त्यांना मोबाईल हे खूप उशिरा हातात मिळाले. म्हणजे स्वतः कमविल्यावर बहुदा प्रत्येकाने अगदीच गरज म्हणून मोबाईल घेतले.
पण आजकालच्या मुलांना मोबाईल हा खूपच लवकर मिळतो. अर्थात त्यांना गरज आहे म्हणूनच दिले. आजकाल शालेय मुलांपासून सगळ्यांकडे मोबाईल आहेत. कारण ही तसेच झाले गेल्या दोन वर्षात थैमान घातले तो covid सारखा व्हायरस . त्यामुळे शाळा , कॉलेज ही ऑफलाईन बंद पडलीं . आणि सगळे ऑनलाईन सुरू झाले. त्यामुळे जो अभ्यास येत असे तो ही व्हॉटसॲप वर , शाळा , कॉलेज ही गूगल मिट , झूम या app वर.
पण मग संपूर्ण मोबाईल हातात म्हणाल्यावर मग काय अजून जेवढे काही सोशल मीडिया ॲप घेता येतील ते सर्व. शिवाय सतत कोणाशी चॅटिंग , व्हिडिओ कॉल , त्यात थोडे वयात आलेल्या मुली आणि मुले यांच्यात आधी अभ्यासाचे बोलणे होत असे ते आता त्या पलीकडे जावून hi , hello , कशी आहेस यातून हळूहळू एकमेकांच्या आवडी निवडी , अजून थोडा personal touch येतं अनेक गोष्टी शेअर केल्या जावू लागल्या. त्यातून forwarded messages , कधी अंदाज घेत जवळीक साधण्याचा प्रयत्न .. तर कधी काही videos पाठवून . प्रतिक्रिया बघून ..
बरेचवेळा मित्र मैत्रिणी यांच्या सोबत फोन वर गप्पा नाही तर बघावे तेव्हा मोबाईल मध्ये डोके खुपसून .
श्रध्दा ची खास मैत्रीण निकिता घरी आली . गप्पा मारता मारता निकिता ने विचारले की अग श्वेता कुठे आहे. तर श्रद्धा म्हणते कशी , अग काय सांगू तुला माझी श्वेता इतकी गुणी आहे की कायम मान खाली घालून असते. म्हणजे अग मोबाईल मध्ये ग. आजकाल सगळं मोबाईल विश्व ना ! कॉलेज , अभ्यास , class सगळे मोबाईल वर .त्यामुळे मोबाईल मधून बाहेर डोके काढायला वेळच मिळत नाही तिला.
हे ऐकल्यावर निकिता तिला म्हणाली अग काही काय . जरा मधून अधून डोकावून बघ नक्की काय करते ती. हल्ली मुली मुले खूप बिघडले आहेत . परवाच माझी एक मैत्रीण सांगत होती तिच्या मैत्रिणीची मुलगी अशीच दिवसदिवस मोबाईल मध्ये असायची . आणि मैत्रिणीने कधी बघितले नाही .
आणि ती एका मुलाबरोबर रोज chat करत होती. खूप जास्त जवळीक वाढली. जेव्हा कधी भेटणं शक्य तेव्हा बाहेर ही भेटत होते. घरी आल्यावर व्हॉटसॲप कॉल मग व्हिडिओ कॉल असायचे. त्यातून खूपच पुढे जात गेले दोघेही. ड्रेस कोणता घातला पासून अगदी बाह्य आणि अंतर्गत पूर्ण ..आणि ते दोघेही खूप भावनिक होत होते तेव्हा. तिला त्याच्या शिवाय काही ही सुचत नव्हते . पूर्ण आधीन झाली होती ती. बाहेर भेटले तरी खूप जवळीक.
एकदा तिची आई रात्री दार न वाजवता तिच्या खोलीत गेली. काही विचारायचे होते म्हणून .ती आत गेली तर मुलीने पटकन मोबाईल लपविला. आईला काही समजेना. नंतर आई दोन तीन वेळा लक्ष ठेवून होती तिच्यावर तेव्हा ही असे झाले. म्हणून एकदा मुद्दाम आई तिच्या खोलीत गेली आणि तिच्या मोबाईल मध्ये डोकावूं लागली तर मुलीने पटकन मोबाईल झाकून ती आई सोबत इतरच विषयावर बोलू लागली. पण तिच्या बोलण्यात विस्कळीतपणा होता.थोडी घाबरलेली.
एकदा आईने म्हणले अग माझ्या फोनवरून फोन लागत नाही. तुझ्या फोन वरून लावते. तर ती अग माझी बॅटरी डाऊन आहे . हे काय आता चार्जिंग ला च लावते. आई बर म्हणाली. थोड्या वेळाने मुद्दाम आईने बघितले तर मोबाईल पूर्ण चार्ज होतं तिने फोन घेतला हे बघून मुलगी पटकन आली आणि आई असे म्हणाली की अग हे काय पूर्ण चार्ज तर आहे तर मुलगी म्हणते कशी आग आई तो काय कळत. चं नाही फोन पूर्ण चार्ज दाखवीत असतो पण नसतोच .
त्यानंतर रात्री उशिरा एकदा आई मुलीच्या खोलीत गुपचूप गेली तर मोबाईल वर तो आणि ती इकडे बिनधास्त आणि नको त्या अवस्थेत होते. आई ला काहीच सुचेना. तिने मोबाईल काढून घेतला त्याला ही ती ओरडली.
निकिता चे हे बोलणे ऐकून श्रद्धा ही श्वेता बाबत जागरूक झाली. पण श्वेता खरेच तिचा अभ्यास आणि ऑनलाईन कोर्स नवीन स्किल develop करण्यात बिझी होती. त्यामुळें श्रद्धा ला हुश झाले.
पण म्हणजे मुले मुली आजकाल कोणत्या थरावर पोहचली आहेत. हे यावरून समजते. गेम्स चे addiction , नको ते videos , अगदी पोर्न , काही ही सुरू असते. You tube वरून ही काही ही search करून बघतात.
मोबाईल देताना विचार केला नाही, आता डोकावून काय उपयोग !! अशी वेळ येवू देवू नका. मोबाईल दिल्यापासून नेहमीच मध्ये मध्ये फोन चेक करत रहा. म्हणजे थोडा धाक ही राहील. आणि मोबाईलचा योग्य वापर केला जातो ना हे पण लक्ष राहील. कारण जशा वाईट तशा कित्येक माहिती मिळणाऱ्या गोष्टी , चांगल्या गोष्टी ही सोशल मीडिया मुळे समजतात. त्यामुळे तशा सवयी आपणहून मुलांना लावा. आणि ठराविक वेळेत मोबाईल वापरायला द्या. इंटरनेट ही लिमिटेड द्या. जेणेकरून सगळ्यांवर नियंत्रण राहील .
आपल्या मुलीची काळजी काय मुलाची काय आपण घेणे जास्त गरजेचे. सुरुवातीपासून थोडे नियंत्रण , check ठेवणे गरजेचे तरच आपली मुलं ही आपल्यापासून काही लपविणार नाहीत. आणि आपल्याला ही त्यांच्या मोबाईल मध्ये सारखे डोकावून पहावे लागणार नाही.
मोबाईल देताना विचार केला नाही, आता डोकावून काय उपयोग !
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

