Skip to content

मोबाईलचं व्यसन आणि मुलांची ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता !!

मोबाईलचं व्यसन आणि मुलांची ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता !!


सौ. मिनल वरपे


बाळ जन्माला आले की तेव्हापासून त्याची काळजी घेणे त्याच्याकडे लक्ष देणे हे प्रत्येक पालक अगदी चोख करतात.. पण जस जस बाळ नजर मिळवायला लागते, आपण काही बोललं की त्याला सगळं समजते अस ते बाळ आपल्याकडे बघू लागते अगदी तेव्हापासूनच आजच नवीन पालकत्व सुरू झालंय.. ते म्हणजे बाळ रडत असेल तर त्याच्यासमोर मोबाईल ठेवायचा, गाणे, कार्टून्स असे वेगवेगळे व्हिडिओज त्यांच्यासमोर लावले की ते बाळ कळत नसताना सुद्धा वेगळं काहीतरी दिसतेय म्हणून शांतपणे बघत बसते.

नंतर त्या बाळाला मोबाईलची इतकी सवय होते की जेवताना, झोपताना बघावं तेव्हा त्याला मोबाईल समोर पाहिजे असतो आणि जर पालकांनी मोबाईल दिला नाही तर ते बाळ इतकं रडत की काही करून उपयोग नाही आता मोबाईल लावावाच लागेल असा विचार करून त्याच रडणं शांत केलं जाते..

बालवय हे शिकण्याचं असते.. जन्माला आल्यापासून वेगळं काही दिसलं की ते चटकन catch करण्याची तयारी या वयात असते. आणि याच वयात त्यांना वेगवेगळ्या सवयी लागतात.. मग याच सवयींमध्ये त्या बाळाला समजते की आपण रडलो, थोडासा हट्ट केला की आपल्याला हवं ते करतात..

आज कुठेही बघा लहान मूल किती सहज मोबाईल चालू बंद करतात..मोबाईल कसा हाताळायचा याच उत्तम प्रशिक्षण देण्यात ते पटाईत असतात याचं कारण म्हणजे त्या मुलांचे पालक..

मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसला की लगेच त्याच्या हातात मोबाईल द्यायचा म्हणजे तो मुलगा त्या मोबाईल मधे इतका गुंग होऊन जातो की बाकी कुठेच त्याच लक्ष राहत नाही.. कधी काम असेल म्हणून नाहीतर कधी मुलांसोबत खेळायचा कंटाळा आला म्हणून किती सोपी पद्धत झालिये स्वतःला मोकळं ठेवण्याची… पण आज जे आपल्याला अगदी सहज सोपं वाटतेय ते उद्या आपल्याला किती त्रासदायक ठरेल हे जेव्हाचं तेव्हाच कळते… आणि नंतर होतो तो पश्चाताप…

लहान असल्यापासून मुलांना आपणच मोबाईल देतो.. मुलं रडत असेल तर त्याला जवळ घेऊन गप्पा मारायच्या, त्यांना छान गोष्टी सांगायच्या, त्यांच्याशी त्यांचं मन रमेल असे खेळ खेळायचे या सर्व गोष्टी न करता त्याच रडणं थांबावं, तो एकाच जागी बसून रहावा म्हणून आणि आपल्याला काम करता यावं किंवा आराम मिळावा म्हणून आपण त्यांना मोबाईल देतो.. यामुळे त्यांना त्याची सवय लागते.

नंतर मोठे झाल्यावर गरज नसताना देखील हल्लीचे पालक मुलांना महागडे मोबाईल घेऊन देतात.. फॅशन म्हणा किंवा स्वतःच स्टेटस दाखवाव म्हणून मुलांना दिलेला मोबाईल पुढे त्याच भविष्य किती बिघडवू शकतो याचा आपण विचार करू शकत नाही..

मुलांना आपण एकदा मोबाईल देतो पण नंतर मात्र त्याच्या अभ्यासावर झालेला परिणाम आपल्याला जाणवू लागतो..मुलं बघावं तेव्हा त्या मोबाईल मधे इतके गुंतलेले असतात की घरात कोण काय सांगतेय, आलेल्या पाहुण्यांशी बोलणं अगदी कोणत्याच गोष्टीशी काहीच संबंध नसल्यासारखं मुलं वागतात. .मुलं मोबाईल मधे इतके अडकतात की खाण्यापिण्याची शुद्ध त्यांना राहत नाही …

अभ्यासावर झालेला परिणाम तर आपल्याला त्याच्या प्रगतीपुस्तक मधे कळतो पण त्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम हा खूपच भयंकर असतो…. एकदा मोबाईल च व्यसन लागलं की बाहेरच जग त्यांना नकोस वाटते, घराबाहेर पडण्यासाठी ते टाळाटाळ करतात, कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना बळजबरी करावी लागते, चार माणसात गप्पा गोष्टींमधे जो आनंद मिळतो तो आनंद जणू त्यांना माहीतच नसतो.. वेगवेगळ्या ॲक्टिविटी मधे त्यांना रस नसतो.. आणि यामुळेच त्यांच्यातील आत्मविश्वास, नवीन काही करण्याची इच्छा ही लुप्त होत जाते..

काही मुलं तर अभ्यासाच्या निमित्ताने किंवा गेम खेळतोय म्हणत मोबाईल मधे भलतचं काही बघत बसतात.. आणि त्यांना चुकीच्या सवयी लागतात..

मोबाईल म्हणजे करमणूक, वेळ वाया न घालवता आपल्याला सहज कोणतीही माहिती मिळवून देण्याचं, लांब राहून सुद्धा एकमेकांशी जोडण्याचं एक साधन.. हल्ली शिक्षणासाठी मोबाईलचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतोय पण त्यासोबतच त्याचा उपयोग हा योग्य आणि गरजेपुरता नाही केला तर तेच साधनं अगदी सहजच कोणाचीही दिशाभूल करण्याच काम करते..

आपण मुलांना अडकवण्याचा, त्यांचं रडणं शांत करण्याचा, त्यांचे हट्ट पुरवण्याचा तर काहीवेळेस स्वतःला मुलांपासून आराम मिळवण्याचा एक सोप्पा मार्ग म्हणून मोबाईल मुलांच्या हातात देतो पण पुढे त्याचे गंभीर परिणाम आपल्यालाच दिसू लागतात… आणि शेवटी पच्छाताप शिवाय काही उरत नाही..

आधी आपणच मुलांच्या हातात मोबाईल देतो आणि नंतर भीतीने आणि काळजीने आपणच त्यांच्या मोबाईल मधे डोकावून बघतो यापेक्षा आधीच परिणाम लक्षात घेऊन मुलांना मोबाईल पासून जमेल तितकं दूर ठेवलं तर नक्कीच त्यांच्या मोबाईल मधे डोकावण्याची गरज कोणत्याच पालकांना जाणवणार नाही…


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!