Skip to content

मोठं काहीतरी वाटोळं झालय….. अस तोंड घेऊन आपण का जगतोय???

मोठं काहीतरी वाटोळं झालय….. अस तोंड घेऊन आपण का जगतोय???


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


गिरिजा काही वर्षापासून एका नात्यात होती. पण काही कारणाने नंतर ते नातं पुढे जाऊ शकले नाही. त्यांना ते नातं तिथे थांबवावं लागलं. पण जरी नात संपलं असलं तरी गिरीजा मनापासून त्यातून बाहेर पडली नव्हती. ती सारखी कुढत राहू लागली. जरी ही गोष्ट त्रासदायक असली तरी त्याचा व्हायला पाहिजे तितकी त्रास तिने करून घेतला होता.

आता त्यातून बाहेर पडणं गरजेचं होतं पण तरीपण तिचा त्रास कमी होत नव्हता. सतत माझ्या आयुष्यात किती दुःख आहे. मी स्वतः माझं नुकसान करून घेतलं, मला नात टिकवता आल नाही असा भाव घेऊन ती वावरू लागली. तिला त्यातून बाहेर पडता येत नव्हतं. तिचा हा भाव इतरांनाही दिसू लागला.

पूर्वीचा तिचा हसरा खेळकर स्वभाव कुठेतरी हरवल्यासारखा झाला होता. झालेल्या घटनेचा तिने प्रमाणापेक्षा जास्त त्रास करून घेतला. माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं, नातं तुटल, आता काय पुढे चांगलं होणार असा भाव ठेवून ती वावरत होती. कोणी कितीही समजावलं तरी ते मनापासून पुढे जायला तयार होत नसल्याने तिला जास्त त्रास होऊ लागला.

पण मग कोणाच्या आयुष्यात दुःख किंवा त्रास नसतो? एकदम सुरळीत सर्व कोणाच आयुष्य असतं? आणि आयुष्याची मजा तरी काय? आयुष्याची खरी किंमत समजण्यासाठी दुःख तर येतातच. पण मग या दुःखात किती अडकून राहायचं हे आपल्यावर आहे. अनेकदा असं होतं की आपण नवीन काहीतरी करायला जातो आणि त्यात आपल्याला अपयश येत.

अशा वेळी आपलं काय चुकलं, कुठे काय सुधारता येईल असा विचार करून पुढे जायची गरज असते. पण झालेल्या गोष्टीने माणूस इतका गांगरून जातो त्या आपल्या आयुष्याचं नुकसान झालं असं त्याला वाटू लागत. सध्या आपण तर पाहिलं तर अगदी छोटे छोटे धक्के अपयश नुकसान काही लोकांना पचवता येत नाही. अगदी लहान मुलही याला बळी पडतात. त्यातूनच डिप्रेशन सारखे आजार होतात. आत्महत्या केल्या जातात. कारण हे लोक होते घटनेला इतकं मोठं करतात की त्यातून त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होऊन जातो.

एका दुःखद घटनेला आपण आपलं आयुष्य मानून बसतो. पण असं होऊ शकत का? खरंच ही घटना इतकी वाईट दुःखदायक असते का? अंगठा खरचटला तर शरीर तुटल्या सारखा त्रास करून घेणे योग्य आहे का? पण या सर्व गोष्टी आपल्या त्यावेळी लक्षात येत नाही. कारण आपण आपल्या दुःखात इतक गुरफटून जा की त्यातून बाहेर पडता येऊ शकत, पुढे काहीतरी करता येऊ शकत हेच समजत नाही.

इथे खरंतर या त्रासाला, दुःखाला, वाईट घटनेला स्वतःपासून पूर्ण वेगळं करून एका त्रयस्थ, तटस्थ नजरेने पाहणे गरजेचे असते. मला ही घटना इतकी त्रासदायक वाटते, मला वाटतं माझं वाटोळ झाल आहे. पण या घटनेकडे माझ्या जागी दुसरी व्यक्ती असती तर कस पाहिलं असत? काय विचार केला असता? तिने काय केल असतं? हे स्वतःला विचारता आलं पाहिजे. आपल्या लक्षात येईल की आपल्याला वाटतं तितकं काही झालेल नाही.

अनेकदा आपण आपल्यात इतका गुंततो की हे समजत नाही आपल्याहूनही अधिक त्रासात राहणारीही लोक आहेत. त्यांचेही आयुष्य आहे. जरी ही तुलना आपण केली तर समजेल की आपण कितीही शुल्लक कारणावरून ही नाराज, उदास, हताश होत असतो. अश्या लोकांच्या जगण्याकडे पाहून आपण प्रेरणा घ्यायला हवी.

आयुष्य हे सारख मिळत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून स्वतःला उदास, हताश करणे हे बरोबर नाही. आपल्या सोबत जर काही वाईट घटना घडत आहेत तर चांगल्या पण होत असतात त्याचाही आपण विचार केला पाहिजे. त्या कडे पण लक्ष दिले पाहिजे. त्याचा आनंद घेतला पाहिजे.

जर तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी प्रेरित व्हायचं असेल तर लहान मुलाकडे बघा. जेव्हा ते चालायला लागत तेव्हा ते किती वेळा पडल तरी पुन्हा परत उठून चालण्याचा प्रयत्न करत. ते थांबत नाही. त्याला कोण प्रेरित करत असेल? त्याची प्रेरणा ते स्वतः असत. म्हणून अनेकदा पडूनही ते परत तेवढ्याच उत्साहाने उठून चालेल लागत.

मुंगीचा जीव केवढा असतो. आपल्या साठी एक पावलाचं तर तिच्यासाठी किती मोठं असतं. त्यातही किती अडथळे येतात. तरी ती जिद्दीने स्वतःचा मार्ग डोळ्यासमोर ठेवून चालते, अन्न साठवते.

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला प्रेरीत करतात. फक्त आपल्याला त्यांना डोळसपणे पाहत आले पाहिजे. फक्त एका कुठल्यातरी घटनेवरून पूर्ण आयुष्याला बोल लावून ते थांबवणं, तसा आविर्भाव घेऊन जगणं योग्य नाही. त्यातून शिकून पुढे जाता आलं पाहिजे. तर खरी मजा!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “मोठं काहीतरी वाटोळं झालय….. अस तोंड घेऊन आपण का जगतोय???”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!