मोकळ्या वेळेत आपण काय विचार करता, यावरून आपली मानसिकता समजते!!
मिनल वरपे
मोकळा वेळ मिळाला.. काही काम नसेल तर त्यावेळी तुम्ही कोणता विचार करता यावर तुमची मानसिकता अवलंबून असते.
जर तुम्ही रिकाम्या वेळेत विचार करत आहात आणि तेव्हा जर तुम्हाला भन्नाट कल्पना सुचत असतील तर भारीच .. कोणतीही गृहिणी मोकळ्या वेळेत विचार करताना जर तिला घरात काय काय बदल करता येतील, नाविन्य कस आणता येईल, नवनविन पदार्थ कोणते करता येतील अशा नवनविन कल्पना सुचत असतील तर नक्कीच तिची मानसिकता उत्तम म्हणता येईल..
पण तेच जर तिच्या मोकळ्या वेळेत ती विचार करत असेल की काय नशीब आहे माझं, माझं कस होणार, घरातील माणसं नीट वागत नाय.. काहीच सुचत नाही. तर हे विचार तिची खराब झालेली मानसिकता दर्शवतात.
आपण जर शिक्षण घेत असू , नोकरी करत असू नाहीतर अजून काही.. जेव्हा आपल्याला वेळ मिळतो काम नसते त्यावेळी आपल्याला नेहमीच चांगले विचार करण्याची सवय असेल.. नवनविन कल्पना सुचत असतील तर अति उत्तम. पण जर अस घडत नसेल तर तेव्हा काय समजायचं…
तर त्यावेळी आपल्या मनात नविन विचारांना जागा नसते. सतत तेच तेच रटाळवाणे विचार आपला दिवसाची सुरूवात करतात आणि त्याच विचारांनी आपली रात्र होते. ते विचार आपल्याला आपल्यातील ऊर्जेचा योग्य तो वापर करू देत नाही.
आणि मग आपण एकतर जास्त भावनिक होतो शिवाय राग, संताप, चिडचिडेपणा, नैराश्य या सारख्या आपल्याला त्रास देणाऱ्या आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणाऱ्या समस्या निर्माण होतात.
आपण असे विचार का करतो…आपण नेहमीच अशा रटाळ विचारांमध्ये अडकलेलो असतो कारण आपण नवीन काही ऐकत नाही.. बघत नाही..उदा. भावनिक मालिका बघणे… त्याचं त्याच विषयावर सतत बोलणे. आपल्या आजूबाजूला तेच विचार सतत होत असतात.आणि मग आपण त्यामधे इतकं अडकतो की आपल्याला वस्तुस्थितीच भान नसते.
आपल्याला आनंद होईल, मनापासून हसू येईल, काही वेळेसाठी का असेना..ते बघताना आपल्याला आपल्या विचारांचा विसर पडेल असे विनोदी तसेच मनोरंजन करणारे कार्यक्रम चित्रपट आपण बघावे.
माणसं तीच जरी असली तरी अशा माणसांपासून लांबच राहावे जे नकारार्थी विचार करतात आणि पसरवतात.
आधी वेळ मिळत नव्हता म्हणून अमित खूपच वैतागत होता, शालिनी सुद्धा आधी संसाराच्या गर्तेतून बाहेर पडून स्वतःचं असं काही करू शकत नव्हती. परंतु अमितला आता खूपच वेळ असतो, परंतु तो सगळा वेळ अमित वाया घालवतोय. मग ते मला असेच का बोलले, माझ्याच बाबतीत हे असं नेहमी का घडतं, वगैरे.
म्हणजेच गतकाळात घडलेल्या प्रसंगांचा अमित रिकाम्या वेळेत इतका विचार करायला लागला कि आता त्याला त्या गोष्टींची सवय झालीये. त्यामुळे त्याला आता नवीन काही सुचतच नाही. जरी सुचलं तरी त्यानंतर लगेचच नकारार्थी विचार अमितला पछाडून टाकतात.
परंतु याबाबत शालिनी मात्र मोकळ्या वेळेचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे. आत्तापर्यंत योगा, मार्केटिंग स्किल आणि संगीताचे तिने क्लास पूर्ण केलेत. तसेच तिला एका ठिकाणाहून मुलांचे योगा घेण्याची संधी सुद्धा चालून आली आहे. आता ती मार्केटिंग स्किल वापरून स्वतःचा व्यवसाय आणखीन घट्ट करतेय.
याचा अर्थ शालिनीच्या गतकाळात काही दुःखी प्रसंग घडले नसतील काय ? कदाचित अमितपेक्षा जास्त सुद्धा घडले असतील. परंतु भविष्याचा वेध घेऊन तुम्ही रिकाम्या वेळेत कोणत्या विचारांना गोंजारता यावरून तुमची मानसिकता आकार-उकार घेत असते.
म्हणून इथे आपल्यालाच ठरवायचं आहे कि, आपल्याला अमित व्हायचंय कि शालिनी !!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


It’s very positive thinking, so nice