मुलींनो, सर्वकाही अर्पण करण्याआधी हे विचार नक्की करा….
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
मुलींनो , कधी आयुष्य क्षणभंगुर वाटतं…तर कधी खूप मोठ्ठ वाटतं.अशा या आपल्या आयुष्यात आपण आपलं सर्वस्व अर्पण करतो.पण हे सर्वस्व आपण अगदी सहज अर्पण करतो का….??आपलं सर्वस्व अर्पण करायच म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा तेही समोरच्यासाठी…..!! तर मुलींनो , हे सर्वस्व अर्पण करताना काही गोष्टींचा विचार करणं खरच खूप आवश्यक आहे.कारण आपण आपलं आयुष्य पणाला लावत असतो. आणि आयुष्य हे कदाचित एकदाच मिळतं….!! त्यामुळे मुलींनो काही गोष्टींचा जरूर विचार करा. उदाहरणार्थ:-
१) कुटुंब-
आपण आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो.आणि आपल्या घरातलेही आपल्यावर खूप प्रेम करतात. त्यांचा आपल्यावर विश्वास असतो…त्यांनी आपल्याला घडवलेलं असतं… त्यांनी रुजवलेले सुसंस्कार, नीतीमुल्ये यांना तडा जाणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो का….??
२) समाज-
समाज हा आयुष्यातला महत्त्वाचा Factor आहे. आणि समाजात आजही–अजूनही काही अंशी आपल्याला (मुलींना) मुलीने हे करू नये , मुलीने ते करू नाही. असं बोललं जातं.आपल्याकडून काही चूकीच झालं तर मुलीच्या जातीला हे शोभत नाही असे बोल लावले जातात. मग ते कोणत्याही गोष्टीवरून असुदेत.तर या सगळ्याला तोंड देण्याची आपली तयारी आहे का…??
३) स्वतःची स्वप्नं-
आपली स्वप्नं , ध्येय आपले छंद यांना आपण वेळ देऊ शकणार आहोत का..??ती आपल्याला खरचं पूर्ण करायची आहेत ना…??कुणी आपल्या स्वप्नांना अडवलं तर…..??
४) स्वाभिमान-
स्वाभिमान जपला पाहिजे असं म्हणतात. पण मग स्वाभिमान सोडावा लागला तर….??
५) उपभोगाची वस्तू-
आपण केवळ उपभोगाची वस्तू नाहीत न….?? फक्त शारीरिक गरजा भागविण्यासाठी माझं अस्तित्व नाही नं…???
६) मानसिकता-
कितीही काहीही झालं तरी आपली मानसिकता व्यवस्थित असली पाहिजे.मन आणि मान दोन्ही तुटणारे प्रसंग आले तर….??मानसिक आरोग्य कसे असेल..??
७) भावनिक आधार-
भावनिक आधार अगदी जवळचा वाटतो.पण हाच भावनिक आधार नसेल तर…??आणि आपणही भावनिक आधार देऊ शकतो का…??
८) Do or Die-
दोन्हीपैकी एक असे प्रसंग आल्यावर काय..??
९) आयुष्य एकच आहे-
काहीही झालं तरी आयुष्यात टोकाची भूमिका घेणार नाही.
आयुष्य एकदाच मिळतं ते असं क्षणात संपवणं चुकीच आहे. नवी संधी आयुष्य देईल.. याची जाणीव आहे न…??
१०) पूर्वग्रह-
मनात कोणतेही पूर्वग्रह नाही न…??कोणतीही चुकीची वा अर्धवट माहिती नाही न..??
११) नंतर कुणी स्वीकारल नाही तर…..??
माझा पती परमेश्वर…तो म्हणजे माझं सर्वस्व आहे.माझं सगळं काही तोच आहे.असं कित्येकदा बोललं जातं.आपण आपलं सगळं सोडून त्याची साथ द्यायला आपल्याच घरापासून दूर जाणार असतो.त्याच्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करणार असतो. लग्नाआधी किंवा लग्नानंतर आपलं सर्वस्व समोरच्यासाठी हसत हसत पणाला लावणाऱ्या कितीतरी मुली असतात.पण हे सगळं काही करताना त्या वरील काही गोष्टींचा नीट विचार करतात का…??गोष्टी सकारात्मक नाही घडल्या तर पुढे काय…??याचा विचार केलेला असतो का..??
कुटुंब, समाज,इच्छा-आकांक्षा , मानसिकता यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रत्येकीने केला पाहिजे. सर्वस्व अर्पण केल असलं तरी तिने कुटुंबाला , घरातील संस्कार, नीतीमुल्ये विसरता कामा नये.कारण संस्कारांना तडा गेला तर समजून उमजून न घेता समाजच जास्त बोल लावतो…मग समाजात अशा वेळी तोंड देण्याची आपली तयारी असणं आवश्यक आहे.सगळं काही दिल्यानंतर आपल्या स्वतःच्या चौकटीचं काय..?
आपली स्वप्नं.. आकांक्षा यांना पंख नाही मिळाले तर ,मला हवे ते छंद जोपासता नाही आले तर….काय…??आपलं सर्वस्व त्याच्या आड येणार नाही नं….??आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला स्वाभिमान दुःखावला गेला तर काय…??नात्यासाठी स्वाभिमान सोडावा लागला तर…..?? आपण सर्वस्व अर्पण करतोय खरं…पण आपण एखाद्याला किंवा त्याला भावनिक आधार देऊ शकतो का…??आणि आपल्याला सुद्धा भावनिक आधार असेल नं…??करा नाहीतर मरा असं काही झालं तर काय निवडणार…??आयुष्य एकच आहे.वाईट प्रसंग आला तर जगणं सोडणार नाही न..??आणि ह्या सर्वस्वाविषयी काही पूर्वग्रह आपल्या मनात नाहीत न…???चुकीच्या माहीतीमुळे यात आपण चुकीच्या पद्धतीने अडकत तर नाही न…?? एखाद्याला सगळं अर्पण करूनही तिथे पदरी निराशा आलीच तर पुन्हा कुणी स्वच्छ मनाने स्वीकारेन का…??
आपण केवळ एक शारीरिक गरज भागवणारी वस्तू तर नाही नं…??आणि सगळं असचं विचीत्र, नकारात्मक ,चुकीचं घडलं तर आपली तेवढी मानसिकता आहे नं…??मनाने खचून न जाता या बदलांना सामोरे जाणार नं…??की घाबरून जाऊन बेछुटपणे स्वतःवरच गोळ्या झाडणार…..???
या सगळ्या गोष्टींचा विचार आपण एखाद्याला सर्वस्व अर्पण करताना नक्कीच केला पाहिजे.कारण सर्वस्व अर्पण करणं साधीसुधी गोष्ट मुळीच नाही. सर्वस्व म्हणजे अगदी वेळ आली की स्वतःचा त्याग करायलाही कुणी मागे पुढे पाहत नाही.तर मग आपण खरचं आपलं सगळं काही अर्पण करणार आहोत का…??आणि जर सर्वस्वालाच तडा गेला तर त्यातून सावरण्याची आपली तेवढी मानसिक तयारी आहे का…?? सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्वस्वापलिकडे आपलं स्वतःचं एक “वैयक्तिक आयुष्य” असतं ते जगायलाच मिळालं नाही तर……या Overall गोष्टींचा मुलींनो एकदा तरी विचार करा….कारण काही गोष्टी कुणालाच परवडणाऱ्या नसतात…!!
सर्वस्व अर्पण करु नका असं म्हणणं मुळीच नाही. कारण जर सकारात्मक प्रतिसाद असेल तर सहसा गोष्टी complicated होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.पण जर नकारात्मक प्रतिसाद मिळाला तर गोष्टींच स्वरूप नक्कीच बदलून जातं.तर आपण एकदा तरी विचार करायला हवा होता असं आपल्याला वाटायला नको….म्हणून आधीच या सगळ्या गोष्टींचा विचार करा.आपल्या मनगटात, मनात काट्यांना सहन करण्याची ताकद निर्माण करा.पूर्ण मानसिक तयारी करा….आणि मगच आपलं सगळं काही हसत हसत अर्पण करा….म्हणजे कसं पूर्वकल्पनेची जाणीव असल्याने समजा काहीतरी विरुद्ध घडलच तर त्यातून बाहेर पडायला थोड तरी सोपं जाईल. कारण आपल्या सर्वस्वाची ताकद आपणच ओळखायला शिकलं पाहिजे…. नाहीतर सगळच व्यर्थ आहे….!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


