मुलगा मुलाशी आणि मुलगी मुलीशी लग्न का करत असेल ?
टीम आपलं मानसशास्त्र
आजकाल बऱ्याच मोकळेपणाने अनेक विषयांवर बोलले जाते. जसे लग्न . मग ते भिन्न लिंगी असेल , काही वेळा समलिंगी , उभय लिंगी .
तरी यात स्त्री पुरुष. विवाह सोडल्यास इतर विवाह किंवा आकर्षण या कडे बघण्याचा दृष्टिकोन अजून विक्षिप्त आहे. आज आपण homosexuality म्हणजेच समलैंगिकता याचा विचार करणार आहोत. त्यातून मुलगा मुलाशी आणि मुलगी मुलीशी लग्न का करत असेल ? याबद्दल थोडे जाणून घेवू.
पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना ‘लेस्बिअन’ (इंग्लिश: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना ‘गे’ (इंग्लिश: Gay) म्हणले जाते. बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध.
मुलगा मुलाशी आणि मुलगी मुलीशी लग्न का करत असेल ?
Normally स्त्री आणि पुरुष यांची नैसर्गिक रचना , शरीर रचना , हार्मोन्स , या स्त्री पुरुषांना आकर्षित करतात. आणि त्यांच्यात आकर्षण , पुढील पिढी घडविण्याची जबाबदारी यातून विवाह हे बंधन निर्माण झाले. पण. म्हणजे पती पत्नी यात भावनिक मोकळेपणा असेलच असे ही नसते. काही वेळेस असते ही. पण जास्त करून हे शारीरिक आकर्षण , गरज , आणि समाधान मिळविणे असते.
मुलाचे मुलाकडे आणि मुलीचे मुलीकडे आकर्षण असेल . तर ते का आहे ? यामागे अजून संशोधकांना ही नक्की कारणं नाही सापडली. पण आनुवंशिकता , आणि गर्भात होणारे harmonal बदल. वातावरण. त्यांची गुणसुत्रता वेगळी असते.
काही वेळेस भावनिक दृष्ट्या मुले मुले, किंवा मुली मुली जास्त चांगल्या भावना एकमेका पाशी व्यक्त करू शकतात. मोकळेपणाने बोलू शकतात. भावनिक दृष्ट्या यांचा परिणाम ही कारणे असावीत असे संशोधकांना वाटते.
मग काहिंच्यात शारीरिक आकर्षण ही तीव्र असते. आणि आपल्याला भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या समजून घेणारी व्यक्ती आपल्या सोबत कायम पाहिजे असे होते.
आपल्या देशातील संसदेने तयार केलेले कायदे पुरुष आणि स्त्रीमध्ये झालेल्या विवाहालाच मान्यता देतात. वेगवेगळे धार्मिक समुदायांचे रितीरिवाज, संस्कृती आणि त्यांच्या पारंपरिक कायद्यांचा त्यात अंतर्भाव आहे.
आपल्या इकडे लोकांची वृत्ती संकुचितआहे. धर्माचा वाढता प्रभाव पाहाता समलैंगिक लोक असे म्हणतात की , आमचं रिलेशनशिप सांगण्याची भीती वाटते. LGBT हक्क हा विषय फक्त मोठ्यामोठ्या शहरांपुरताच मर्यादित आहे. स्त्री चे स्त्री कडे. आकर्षण किंवा पुरुषाचे पुरुषाकडे आकर्षण हा विषय खूप चर्चिला जातो. टार्गेट केलं जातं. टिंगल उडवली जाती.
भारतात समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता नसल्याने अनेक समलिंगी जोडपी एकतर विदेशात जाऊन लग्न करतात आणि तिथंच ते रजिस्टर्ड करतात. किंवा काही वेळा ते विदेशातच कायमस्वरुपी स्थलांतरित होतात.
बहुतांश मानसोपचारतज्ज्ञ याच विचाराचे आहेत. समलैंगिकता हा आजार नाही यावर त्यांचा विश्वास आहे. पण अर्थात काहींचा अजूनही यावर विश्वास नाही. हे एका झटक्यात स्वीकारलं जाणार नाही
मुलगा मुलाकडे आणि मुलगी मुली आकर्षित होते आणि हे आकर्षण केवळ आकर्षण न राहता त्यापुढे हे नाते जाते. मग शारीरिक जवळीकता, शारीरिक संबंध निर्माण होतात.
अर्थात हे संबंध नातेवाईक , समाज यांना मान्य नसतात. आणि ते यांच्या मागे रीतसर लग्न करा म्हणून मागे लागतात. परंतु गे असतील किंवा लेसबिन असतील तर त्यांना विरूद्ध लिंगी पार्टनर सोबत लग्न करण्याचा घरच्यांनी आग्रह केला तरी ते त्यांना स्वीकारणे शक्य नसते. कारण त्यांना त्यात इंटरेस्ट च नसतो. आणि घरचे या व्यक्तींना समजून घेतच नाहीत. आणि घरचे त्यांना त्या दृष्टीने त्यांच्या अडचणी , गरजा लक्षात घेत नाहीत. समजून घेत नाहीत.
अशा वेळी आपल्याला समजून घेणारी व्यक्ती जर आपल्या कायम सोबत असेल तर असा विचार केला जातो. दोन मुले किंवा दोन मुली यांच्यात आकर्षणं तर असतेच पण भावनिक दृष्ट्या ही ते एकमेकांना जास्त समजू शकतात. त्यांच्या शारीरिक गरजा आणि मर्यादा या ही त्यांना चांगल्या माहिती परिचित होतात. ते तसे एकमेक एकरूप होतात.
समलिंगी संबंध प्रस्थापित करणाऱ्या या जोडप्याला ही आपण कायम साथ राहावे अशी इच्छा असते . कुठे तरी एक कमिटमेंट पाहिजे असते. की यांची साथ कायम आहे. राहील. ही security पाहिजे असते. पुढे जावून मुले adopt करणे, आपल्या future plans करिता . घर , प्रॉपर्टी , mediclaim , किंवा emergency मध्ये आपल्या हक्काची व्यक्ती आणि ते हक्क तिला मिळू देत आणि एकमेकांची मदत , जसे इतर लोक त्यांचे संसार करतात तसेच आपले ही असावे. हा दूर दृष्टिकोन त्यांना लग्न करण्याकरिता प्रोत्साहित करत असतो.
या नात्याला कादेशीर मान्यता नसल्यामुळे मानसिक त्रासही होतो. अनेकदा समाजात किंना नातेवाईकांमध्ये पार्टनरची ओळख बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड म्हणून सांगावी लागते. पण प्रत्यक्षात हे नाते रिलेशनशिप त्याही पुढे सरकलेलं . ते फक्त बॉयफ्रेंड-बॉयफ्रेंड एवढंच , गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड एवढेच नसते. त्यामुळे बॉयफ्रेंड सांगताना त्रास होतो. कारण बरेचदा बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड या संकल्पनेकडे सिरिअसली पाहिलं जात नाही. म्हणून एकमेकांची ओळख पार्टनर म्हणून करून दिली जाते.”
मुलगा मुलाशी आणि मुलगी मुलीशी लग्न का करत असेल ? तर ही विकृती नाही. त्यांची शारीरिक रचना , आनुवंशिकता , गुणसूत्र रचना , भावनिक गरजा या त्यांची मनोवृत्ती घडवितात.
समाज सुधारणा होत आहे. अनेक कायदे ही होत आहेत. निसर्ग नियमावलीत काही गोष्टी बसत नाहीत. बसत नव्हत्या परंतु तेव्हा असे मोकळेपणाने व्यक्त ही होता येत नव्हते. आता ते व्यक्त करू शकतो ही पण क्रांतीच आहे. तसे पुढे जावून नातेवाईक , समाज आणि कायदा ही अनेक गोष्टींचे विचार नक्कीच करेल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Thank you for this article.