Skip to content

“मी तुझ्या सोबत आहे!” आपुलकीचे दोन शब्द ही खूप महत्वाचे आहेत!

चला जरा जगुयात…..


सोनल कोल्हे -पटारे


बोला,
व्यक्त व्हा,
ऐकते व्हा,
कोण आयुष्यातून कधी exit घेईल काहीच सांगता येत नाही!

” कसे आहात?” , ” मी तुझ्या सोबत आहे!” आपुलकीचे दोन शब्द ही खूप महत्वाचे आहेत!….काय माहित कदाचित समोरच्याला फक्त या दोन वाक्यांची गरज असेल ! आणि हे दोन वाक्य ही त्याला खूप बळ देऊन जाईल! आपल्या सोबत माझा मित्र/माझी मैत्रीण/माझे नातेवाईक आहेत! मी एकटा/एकटी नाही आहे ही भावना देऊन जाईल!

विसरा ते हेवेदावे,राग , भांडण, रुसवा…एका क्षणात होत्याचं नव्हतं होतंय!
अंतिम समयी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अग्नी दिला जातोय….. कित्तेक dead bodies लावारस पडल्यात….

पैसा ,मान, पुरस्कार,पद नाही येणार आहेत सोबत….राहणार आहेत त्या फक्त सोबत जगलेल्या क्षणांच्या आठवणी!!

माझ्या जवळ सर्व काही आहे, मला कोणाची गरज नाही.. पैशाच्या .. नावाच्या जोरावर मी सर्व काही मिळऊ शकतो या धुंदीत मनुष्य प्राणी जगत होता. पण निसर्गाने दाखऊन दिले की निसर्गा पेक्षा मोठे आणि महान काहीही नाही. त्या मुळे सोडा तो गर्व, अहंकार , मनातील क्रोध, स्वार्थ आणि निसर्गाने दाखऊन दिलेल्या मार्गावर चालुयात…….

पाण्यासारखे निर्मळ राहुयात ,

पर्वतासरखे आपले मन विशाल करूयात …..बाहेरच्यांना नाही जमलं तर निदान आपल्या गरजू आप्तेष्टाना मदत करूयात मग ती कोणत्याही स्वरूपात- मानसिक, आर्थिक……

झाडासारखी छाया देऊयात त्यांना … ज्यांची मन होरपळली आहे .. दुःखाने….त्रासाने…

चंद्रा सारखे शीतल हाऊयात त्यांच्यासाठी ज्यांनी कळत नकळत आपलं मन दुखावले आहे…..

सूर्या सारखे तेजस्वी होऊन दूर करूयात मनातील अंधार आणि प्रकाशमान करूयात त्यांचे आयुष्य ज्यांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे….

हसू यात…. हसवूयात…. ऐकू यात कुणाच्या मनातलं….. व्यक्त होऊयात… संवाद साधूयात…

आजच्या काळात कुणाला भेटणं शक्य नसलं तरीही फोन / msgs ने एकमेकांच आयुष्य सुंदर बनऊयात….

चला आपण आता जरा जगुयात….खूप झालं पैशाच्या मागे पळण… स्वार्थी विचार करणं …आता जरा निसर्गाने दाखवलेल्या मार्गावर चालुयात…..

स्वतःला ही थोडा वेळ देऊयात … शोधुयात स्वतः चेच कलागुण, छंद….
Lockdown मध्ये खूप जणांचे work from home चालू असेल… काही नॉन working असतील तरीही वेळेचं मस्त नियोजन करूयात …..

स्वतः चे आरोग्य, व्यायाम , घरातील काम , office work या सोबत काही वेळ गाणे ऐकन, गप्पा मारणं..कुटुंबीयांसोबत आणि मित्र वा मैत्रिणींसोबत या साठी राखीव ठेऊयात… एखादी मस्त रेसिपी बनऊ… अगदीच एखादं instagram reel, YouTube shorts or Facebook Live etc hi बनऊयात… काय हरकत आहे चला आता जरा जगुयात!!

स्वतः ची काळजी घ्या आणि तुमच्या प्रिय जणांचीही!

 


 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!