Skip to content

मिळणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की न मिळालेल्या गोष्टी आपोआप पुसट होतात.

मिळणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की न मिळालेल्या गोष्टी आपोआप पुसट होतात.


काव्या गगनग्रास


क्षितिजचा १० वा होता. आई बाबांनी त्याच्या या वाढदिवसाला खूप छान तयारी केली होती. सर्व पाहुण्यांना बोलावलेलं, क्षितिजचे मित्र, मैत्रिणी सर्वांना आमंत्रित केलं होत. बाकीचे तर येताना काहीतरी आणणार होतेच पण आई बाबांनी पण त्याच्यासाठी खास दहावा वाढदिवस म्हणून वेगवेगळी गिफ्ट आणली होती. ज्यात गेम्स, गाड्या अस बरचं काही होत. ठरल्याप्रमाणे सर्व पाहुणे, मित्रपरिवार आला. क्षितिज साठी मोठा चार लेयर चा केक मागवला होता ज्यावर त्याच्या आवडत्या गाडीच चित्र होत. तो आल्यावर मस्त केक कटिंग झालं. सर्वांनी क्षितिज पा गिफ्ट दिले. शुभेच्छा दिल्या. त्याच्या आई बाबांनी सर्वांसाठी मस्त जेवण पण ठेवलं होत.

सेलिब्रेशन झाल्यावर सर्व जण जेवून आपल्याला घरी गेले. सेलिब्रेशन हॉल वर होतं. त्यामुळे सर्व झाल्यावर क्षितिज व त्याचे आई बाबा पण घरी आले. गाडीत त्याची सर्व गिफ्ट होतीच. घरी आल्याबरोबर क्षितिज ने गिफ्ट पाहायला सुरुवात केली. त्यातही तो पाहुण्यांनी काय दिलं हे न पाहता आई बाबांनी काय काय दिलं हे पाहू लागला. कारण त्याने वाढदिवसाच्या काही दिवस अगोदरच त्याच्या बाबांना एका मॉल मधली रिमोट कंट्रोल कार दाखवली होती आणि बाबांनी ती वाढदिवसाला घ्यायची प्रॉमिस केलं होत.

यासाठी जा इतका खटाटोप होता. कधी एकदा ती वर काढतो अस त्याला झालं होत. पण त्याने सर्व गिफ्ट उघडूनही त्याला कार काही सापडली नाही. त्याने बाबांना विचारल, बाबा मी तुम्हाला जी कार दाखवली होती की तुम्ही मला देणार होतात ती कुठे आहे? यात तर कुठेच नाही. तुम्ही मला सरप्राइज देणार आहात ना! म्हणून कुठेतरी लपवली असेल. सांगा ना मला. मला ती वर हवी आहे.

तेव्हा बाबा त्याला म्हणाले, क्षितिज अरे बाकीचे गिफ्ट बघ किती छान आहेत आणि तुझ्या मित्रांनी, पाहुण्यांनी दिलेले गिफ्ट तू पहिलेच नाहीस. तेसुद्धा बघ की! पण क्षितिज काही ऐकायला तयार नव्हता. त्याला ती रिमोट कंट्रोल कारच हवी होती. ती खूपच हट्ट करायला लागला तेव्हा बाबांनी सांगितले की जेव्हा ते ती कार आणायला मॉल मध्ये गेले तेव्हाच ती विकली गेली होती. त्यामुळे त्यांना आणता आली नाही. त्यांनी ते मॉडेल शोधायचा पण प्रयत्न केला पण त्यांना नाही मिळालं. हे सर्व ऐकून क्षितिज ल खूप राग आला.

खरतर त्याच्या समोर इतकी चांगली चांगली गिफ्ट होती, पाहुण्यांनी पण खूप काही दिलं होत. पण त्याने काहीही पाहिलं नाही, त्याचं त्याकडे लक्षही गेलं नाही. त्यात खरतर त्या कारहूनही चांगल्या चांगल्या वस्तू होत्या. पण क्षितिज ला लक्ष मात्र त्या न आणलेल्या कार कडे वळल्याने त्याने या वस्तू नीट पहिल्याच नाहीत. इतकंच नाही तर जेव्हा बाबांनी हे सर्व सांगितलं तो आहे त्या वस्तू टाकून तिथून निघून गेला. त्याने ना त्यातली एकही वस्तू वापरली ना एकही वस्तू उघडून पाहिली.

आई बाबांना या गोष्टीचं वाईट वाटल. त्यांनी त्याला खूप समजावलं पण त्याने काही ऐकलं नाही. इतक्या हौसेने त्या दोघांनी सर्व केलं होत पण एका गाडीसाठी क्षितिज ने ते सर्व नाकारलं. त्याने समोर जे होत ते काही पाहिलं नाही आणि त्याला महत्व पण दिलं नाही.

खूप दिवस त्याचा मूड खराबच होता. असच एक दिवस त्याचे आजोबा आले. आई बाबांनी त्यांना याच वागणं सांगितलं होतच. म्हणून ते त्याला भेटायला आले होते आणि क्षितिजच पण आजोबांशी छान पटायचं. आज शाळेतून आल्यावर आजोबांना पाहून स्वारी खुश झाली. त्यांनी मस्त गप्पा गोष्टी केल्या. खाण झालं. आजोबा क्षितिजला म्हणाले, क्षितिज, आज तू आणि मी एका ठिकाणी जाणार आहोत, तुला तिथे खूप मज्जा येईल. तोही लगेच तयार झाला. त्याला आजोबांनी सांगितलं नव्हत ते कुठे जाणार आहेत.

जाताना त्यांनी एक साधा केक घेतला. त्याने विचारलं पण आपण हा केक का घेतलाय? इतका साधा केक कोण खाणार? पण आजोबांनी त्याला वत पाहायला सांगितलं. थोड्या वेळाने ते एका ठिकाणी आले. ते गाडीतून उतरले तेव्हा क्षितिज ल दिसले की तिथे खूप मुल खेळत होती. वेगवेगळ्या वयाची मुल होती. पण सर्वांच्या अंगावर साधे कपडे. तरी सर्व आनंदात होती, खेळत होती. जेव्हा त्याने बोर्ड पाहिला तेव्हा समजलं की तो अनाथाश्रम होता आणि तिथल्याच एका मुलाचा जो क्षितिज च्याच वयाचा होता त्याचा वाढदिवस होता.

जेव्हा ते केक घेऊन आत गेले तेव्हा तिथल्या सरांनी त्यांच स्वागत केलं तसच त्या मुलाला पण जवळ बोलवलं. आजोबांनी आणि क्षितिज ने त्याला शुभेच्छा दिल्या व समोर केक ठेवला. तेव्हढ्यात त्या सरांनी बाकीच्या मुलांना पण गोळा केलं. तस पाहिलं तर तिथे कसलीच सजावट नव्हती. ज्याचा वाढदिवस होता त्याने पण नेहमीचेच कपडे घातले होते. तरीपण तो मुलगा खूप खुश होता. केक कापल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला चॉकलेट, हातांनी बनवलेले कार्ड अस काही काही दिलं.

कोणत्याच दृष्टीने त्यात काही किमती अस नव्हत. तरी तो मुलगा समाधानी आणि खुश वाटतं होतं. क्षितिज ने हे सर्व पाहिलं तेव्हा त्याने विचार केला. आपला वाढदिवस तर याहून किती पटीने मोठा करण्यात आला. आपण नवीन कपडे घातले होते. इतक्या महागड्या वस्तू आपल्याला मिळाल्या होत्या. तरी आपण का आनंदी नव्हतो. त्याला काही केल्या हे समजेना म्हणून तो आजोबांकडे गेला आणि त्याने आजोबांना विचारलं, त्यावेळी आजोबा म्हणाले, बाळा, तो आनंदी आहे कारण त्याच्याकडे जे आता आहे, जे त्याला आता मिळालं आहे त्याकडे त्याचं लक्ष आहे. तो हा विचारच करत नाही की त्याला मिळालं नाही. समोरचा केक, भेटवस्तू त्याला साध्या असल्या तरी मिळाल्या यातच आनंद आहेत.

तू दुःखी झालास कारण तू समोर जे होत ते पाहिलेच नाही. फक्त एक गाडी नव्हती यातच तुझ लक्ष गेलं. आणि म्हणून ज्या गोष्टी आनंद देणाऱ्या होत्या त्याही तुला दिसल्या नाहीत. म्हणून तू दुःखी झालास. कधीही लक्षात ठेव. आपल्याला सर्वांतल सर्व मिळत अस नाही. काही गोष्टी राहतात. पण म्हणून त्याच्याकडे पाहून जे आहे त्याचा आनंद घालवून टाकणं बरोबर नाही.उलट जे आहे त्यात आनंद मानायला पाहिजे.कारण काही लोकांना तेही मिळत नाही जे तू आता तुझ्या डोळ्यांनी पाहिलं. जर तू तुझ्याकडे आहे त्याच्याकडे पाहिलं. तर तुझ्याकडे जे नाही त्याच दुःख आपोआप कमी होईल. क्षितिज ला त्याची चूक समजली आणि आजोबांचं बोलण पण पटल.त्याने घरी गेल्यावर आई बाबांची माफी मागितली आणि ती सर्व गिफ्ट पाहून त्यांना वापरल.

आपण आपल्या आयुष्यात अनेकदा अस वागतो. आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष न देता नाही त्याकडे लक्ष देऊन दुःखी होतो. पण यातून होत काहीच नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं, कृतज्ञ राहणं योग्य. त्यातच खरा आनंद आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “मिळणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की न मिळालेल्या गोष्टी आपोआप पुसट होतात.”

  1. अधूनमधून सर्वांनीच वाचावा असा,

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!