Skip to content

मासिक पाळी, शिवाशिव आणि विकृत मानसिकता!!

मासिक पाळी आणि शिवाशिव


राज पाहुरकर


मासिक पाळी आल्याकारणाने स्त्री अशक्त होवून जाते, तिला आरामाची गरज असते हे सर्वांनाच (विज्ञानवादी व स्वयंघोषितधार्मिक लोकांना) मान्य आहे, यात कुठलेच दुमत नाही.

• स्त्रीला पूर्णपणे आराम करता यावा म्हणून आपल्या पूर्वजांनी विटाळ नावाचा कन्सेप्ट काढला…

• तीने स्वयंपाक करायचा नाही, भांडी, कपडे धुवायचे नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कार्य करायचे नाही म्हणजे तिला आराम मिळेल.

•काही लोकांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार स्त्रियांनीच सुरू केला असावा, अजूनही आराम मिळावा म्हणून स्त्रिया विटाळ मान्य करतात असे विविध पोस्टमध्ये लिहीलेले दिसून येते. हे ही आपण मान्य करू.

• त्यानंतर येणारा मुद्दा म्हणजे ही प्रथा चालू ठेवण्यासाठी धर्माची भिती आवश्यक होती. त्यांच्या हातून अधर्म होत असल्याकारणाने पुरूष मंडळी सुद्धा स्त्रियांचा विटाळ मान्य करू लागले.

इथपर्यंत सर्व काही ठीक आहे. पूर्वजांनी काढलेली प्रथा त्या काळी १००% योग्य होती. परंतु पुढे चालून त्या विटाळाचे विक्रूतीकरण होत गेले. हा विटाळ अधिक घट्ट होत गेला, त्याचे स्वरूप “शिवाशिवी” ने घेतले व नंतर समाजामध्ये छुआछूत ही प्रथा उग्र रूपाने धारण झाली.

यामध्ये स्त्रियांवर शारिरीक बंधनांबरोबर मानसिक बंधनेही लादण्यात आली. प्रथा पाळली नाही तर तीव्र प्रकारच्या शिक्षा निर्मित झाल्या (जसे उपवास करावा लागेल, दान दक्षिणा वाढवावी लागेल, विविध-विचित्र प्रकारच्या “शुद्धी विधी” कराव्या लागतील, आणखी बरेच काही). यातूनच (भिती + कर्मकांड) अंधश्नद्धेचा उगम होत असतो.

अंधश्नद्धेमुळे गुलामी व छळाला चालना मिळते. कालांतराने स्त्रियांवर विविध बंधने लादण्यात आली (तीने घरीच व एकाच खोलीत रहावे, दिवसभर अंघोळ करत रहावी, देवपूजा करू नये, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये, कोणासोबतही बोलू नये इत्यादी) .

तो विटाळ तेवढ्यापूर्ताच मर्यादित न राहता पूर्ण स्त्री शरीरच विटाळ बनले, स्त्री शरीर अधर्माला – पापाला खतपाणी घालते असा समज निर्माण झाला. यातूनच तीला शुद्र म्हणून घोषित केले, शुभ प्रसंगी विटाळलेल्या स्त्रीया हजर असू नये असा रिवाज निर्माण झाला. अशामुळे स्त्री-मनात कलह निर्माण होत असतो, आणि इतरही मानसिक विकार जन्मास येतात.

तर अशा प्रथा नक्कीच समाजहिताच्या नसतात, यातून पशुमानसिकतेचा जन्म होतो. जिथे माणुसकी संपुष्टात येवून प्राण्यांप्रमाणे दुर्बल घटकांची फटकारणी केली जाते, पशुप्रमाणे क्रुरता निर्माण होत असते.

ही क्रुर भावनाच मानवाच्या सामाजिक तसेच नैतिक आणि अध्यात्मिक विकासाला बाधा उत्पन्न करीत असते. धर्म आणि अध्यात्मिकता याची सांगड घालणे म्हणजे धार्मिक असणे होय. अशा अर्थाने अंधश्रद्धा मानणारा कधीही धार्मिक असू शकत नाही.

“संत म्हणतात दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती “, दया क्षमा शांती हे मानवाचे गुण होत तर शोषण, क्रुरता, अज्ञानता हे पशुंचे गुण असतात. म्हणूनच पशुवृत्ती क्रुर भावना ह्या अधात्मक्षेत्रात प्रगतीसाठी हानिकारक ठरतात हे संतांच्या शिकवणुकीतून आपल्याला समजते.

आणि स्त्रीयांवर केलेली सक्तीच आम्हाला अमान्य आहे. स्त्रीला आराम मिळावा म्हणून विटाळ योग्यही असला तरी शिवाशीव ही प्रथा कालबाह्य ठरते.

आता मानसशास्त्रियदृष्ट्या शिवाशीव कशी योग्य नाही हे समजून घेवू–

• कोणाला जर स्व: ईच्छेने विटाळ पाळायचा असेल तर ठीक, परंतु प्रथा म्हणून तिला सामाजिक अंग देणे हे मानसिक दृष्ट्या घातकही ठरू शकते.

जसे – काही लोकांचे तर्कानुसार ही प्रथा सुट्टी सारखी ऐन्जॉय करावी अशी आहे. पण ही सुट्टी त्यांच्यावर लादली तर त्याचे कारणाने मानसिक विकारही उद्भवू शकतात हे आपल्याला कोरोनाच्या लॉकडावून दरम्यान लक्षात आलेले असेलच.

• तिने कुठेही फिरू नये, घरातच बसावे, शिवाशीव पाळावी – या घटना त्या स्त्रीने मानसिकरित्या स्विकारल्या नाहीत तर तीचे मानसिक स्वास्थही बिघडू शकते. एकटेपणामुळे ऐंग्झायटी, डिप्रेशन सारखे विकार व अजुनही काही मानसिक आजार उत्पन्न होवू शकतात. (कोरोना झालेल्या व्यक्तीचा शिवाशीव करू नये म्हणून सरकारने कॉलरट्यून ठेवली आहे ती ऐकावी?).

• मासिक पाळी दरम्यान तिला शारीरिक तसेच मानसिक अशक्तपणा जाणवत असतो, अशा वेळी तिला बहिष्कारीत करणे, हिनविणे, तुच्छतेने बोलणे तिच्या मानसिक स्वास्थ्यावर टायरेक्ट ईम्पॅक्ट करत असतात. तीच्यामध्ये न्युनगंड निर्माण होत असतो त्यामुळे विविध मानसिक विकार उद्भविल्याने त्या महिलेचे मानसिक संतुलन सुद्धा बिघडत असते.

• मासिक पाळी दरम्यान स्त्रिचे शारीरिक स्वास्थ जपणे जेवढे महत्वपूर्ण आहे त्यापेक्षाही तिचे मानसिक स्वास्थ जपणे अधिक गरजेचे असते. तिच्या भावना जपणे हे घरच्यांचे कर्तव्य आहे. तिला हिनविण्यापेक्षा (शिवाशीव करण्यापेक्षा) तिची “काळजी” घेणे हा शब्द अधिक “धार्मिक” ठरतो.

तिला गरम पाणी देणे, दूध तसेच सकस आहार देणे, सोबतच मानसिक चैतन्य वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करणे (जसे – तिच्यासाठी गाणी गाणे, संध्याकाळी निसर्गाचे दर्शन घेणे, तिच्यासाठी करमणुकीची साधणे निर्माण करणे इ.) प्रेमाचे दोन शब्द तिच्याशी बोलणे – ह्या गोष्टीही केल्या जावू शकतात आणि करायला पाहिजेत. जेणेकरून तिला एकटेपणा जाणवणार नाही.

• जर कोणी मानसिकदृष्ट्या खचत आहे तर त्या व्यक्तिला दिलासा देणे, तिच्याप्रती करूणा व्यक्त करणे हिच “मानवता” होय. न कि तिचा छळ करणे, शिवाशीव (द्वेषभाव) करणे, बंधने लादणे ही अंधश्नद्धा होय; पशुता होय; अधार्मिकता होय.

(आजच्या वैज्ञानिक काळात स्वतःला धार्मिक म्हणवून घेणाऱ्या लोकांनी “धर्म” म्हणजे काय हे जाणावे व मगच “प्रथा”चे अनुकरण करावे)

धन्यवाद ?



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!