मानसिक समस्यांवर आयुर्वेदिक उपचार घ्यावे का?
डॉ.रोहिणी कोरके
मानसिक समस्या आणि आयुर्वेद
आयुर्वेद हे एक प्राचीन वैद्यकशास्त्र आहे.यामध्ये शारीरिक आणि मानसिक आजारांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. प्रथमतः हे विकार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.यालाच सस्थवृत्त असे म्हणतात. या स्वस्थवृत्ताचे पालन केल्यास मनुष्य शंभर वर्षाचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो असे सांगितले आहे. असो याबद्दल पुढील एखाद्या लेखात सविस्तर वर्णन येईलच.
आजच्या काळात बदललेल्या जीवन पद्धतीमुळे आयुष्यमान कमी होत चालले आहे.तरीसुद्धा निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.मागील एका लेखात पाहिल्याप्रमाणे स्वस्थ शरीर तिथे स्वस्थ मन तसचं अगदी उलट स्वस्थ मन तिथे स्वस्थ शरीर हे अगदी खरं आहे.म्हणून शरीर अन् मन दोन्ही निरोगी राहिले पाहिजे.
शारीरिक आजार फक्त शारीरिक कधीच नसतात.तसचं मानसिक आजार फक्त मानसिक नसतात.दोन्हींचा एकमेकांशी संबंध असतोच.यासाठी एक उदाहरण पाहूया.मानसिक विकाराचे निदान होण्यापूर्वी शरीर काही ना काही संकेत देतेच जसे की अचानक blood pressure वाढणे किंवा अचानक चक्कर येणे प्रचंड प्रमाणात डोके दुखणे इ.तसेच प्रचंड मानसिक तणावाखाली असलेली व्यक्ती blood pressure,cholesterol history नसताना heart attack ने दगावल्याची उदाहरणे आपण ऐकली असतील.याचाच अर्थ शरीर आणि मन एकमेकांशी निगडित आहेत.
सध्या corona महामारीच्या काळात मानसिक आजारांचे प्रमाण अधिक वाढले आहे.याचे कारण म्हणजे सततचे ताणतणाव. एकतर शरीराचे tension म्हणजे corona होण्याची भिती आणि दुसरे म्हणजे अनेकांचे कामधंदे बंद झाल्याने होत असलेली आर्थिक ओढाताण.
अनेक मानसिक विकारांचे वर्णन आयुर्वेद तसेच आधुनिक वैद्यक शास्त्रात आहे.पण सद्यस्थितीत सर्वाधिक भेडसावणारा विकार म्हणजे Depression.यालाच आयुर्वेदात विषाद असे म्हणता येईल. यामध्ये रुग्णाच्या मनात कोणत्यातरी गोष्टीची प्रचंड भिती निर्माण होते त्यामुळे तो अत्यंत चिडचिड करायला लागतो.त्याला सतत insecure वाटतं राहते.
तो घरातल्या लोकांपासून ,समाजापासून अलिप्त राहायला लागतो. एकटं राहणं पसंत करायला लागतो. मनात negative विचार जास्त प्रमाणात येत राहतात. Positive thinking कमी होत जाते.काही काम करावेसे वाटत नाही.नुसतं एका ठिकाणी बसून राहतात.किंवा मध्येच कुठेतरी दूर निघून जातात.सतत विचारमग्न असतात आणि विचारलं तर त्यांना सांगताही येत नाही.एखाद्या गोष्टीकडे एकटक पाहत बसतात.
याचं पर्यावसन शेवटी Psychiatric treatment घेण्यामध्ये होतं.ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मनाची वैचारिक क्षमता मंदावली जाते.त्यामुळे Negative विचार येण्याचे प्रमाण कमी होते पण Positive विचारांचे प्रमाण काही वृध्दींगत होत नाही.शारीरिक कष्ट करण्याची क्षमताही काही प्रमाणात कमी झालेली दिसते.
तसेच शरीरावर इतर साईड इफेक्ट दिसतात ते वेगळे.त्यामुळे सुरवातीला वरदान वाटलेली ही treatment नंतर रुग्णाला नकोशी वाटायला लागते. तसचं सुरुवातीला काही काळासाठी म्हणून चालू केलेली ही औषधी नंतर कायमची पाठ धरतात कारण व्यक्ती त्या औषधांवर dependent होऊन जातो.
आता विचार करूया आयुर्वेदिक उपचारांबाबत.अजूनही आयुर्वेदात यावर उपचार आहेत की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका आहेत.तर याचं उत्तर असं आहे की नक्कीच आपण आयुर्वेदाच्या साहाय्याने या विकारांवर मात करू शकतो.
सर्वात प्रथम चिकित्सा म्हणजे आश्वासन चिकित्सा म्हणजेच assurance.रुग्णाला बोलतं केलं पाहिजे.त्याच्या मनात कोणत्या गोष्टीची भिती बसली आहे ते शोधून काढून ती गोष्ट त्याच्यासाठी हानिकारक नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण केला पाहिजे.तेव्हा तो हळूहळू त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागतो.
तसेच या जोडीला मानसमित्र वटी, स्मृतिसागर रस,ब्राम्ही वटी,सारस्वतारिष्ट,अशा प्रकारचे अनेक औषधी कल्प उपलब्ध आहेत ज्यांचा उपयोग रुग्ण प्रकृती आणि अवस्था पाहून केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा झालेला दिसून येतो.
आयुर्वेद पंचकर्म उपचार पद्धतींमध्ये शिरोधारा आणि नस्य यांचा उत्तम लाभ होताना दिसून येतो कारण या उपक्रमांमुळे शिरोभागी संचित मल निघून जातात व या भागाला बल प्राप्त होते.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापैकी कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय तसेच ही औषधी बंद करूनही व्यक्ती कालांतराने निरोगी जीवन व्यतित करू शकतो.
यासह आयुर्वेदात वर्णन केलेल्या योगा , प्राणायाम,ध्यान धारणा याचा आधार घेतल्यास मानसिक रुग्णांमध्ये कमालीचे बदल दिसून येतात.म्हणूनच मानसिक समस्यांवर आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


