Skip to content

मानसिक सपोर्ट देणं ठीक आहे, पण ते करताना तुमचं टेंशन वाढवू नका.

मानसिक सपोर्ट देणं ठीक आहे, पण ते करताना तुमचं टेंशन वाढवू नका.


सोनाली जे.


अनेकांना इतरांचे त्रास सहन होत नाहीत. त्यांना राहवतच नाही. ते जावून विचारपूस करतात. काय झाले याचा अंदाज घेऊन मदतीला तयार. कसे असते ना ओलखितली व्यक्ती असो अथवा नात्यातली पण पैशाने support देणारे फारच क्वचित सापडतात. अगदीच बोटावर मोजण्या इतके. पण मानसिक support देणारे खूप जण असतात. पेक्षा ते तोंड देखले दिखावा करणारे जास्त असतात. उगीच च काही जण सहानुभूती दाखविणारे असतात.

मात्र खरेच एखाद्या विषयी आत्मीयता असणारे , तळमळ असणारे , मनापासून मानसिक आधार देणारे ही असतात. मानसिक सपोर्ट देणं ठीक आहे, पण ते करताना तुमचं टेंशन वाढवू नका.

बरेचदा काय होते की आपण चांगुलपणा दाखवीत असतो पण समोरचे आपल्या चांगुलपणाचा फायदा घेवून अपेक्षित नसलेल्या गोष्टी ही करावयास भाग पडतात.

आता या दोन वर्षात जी covid pandemic परिस्थिती आली त्यात अनेक गोष्टी या सामान्य लोकांना मानसिक तणाव देत आल्या. यात सुरुवातीला पेशंट ची वाढती संख्या , उपलब्ध नसलेले बेड, याचे pressure hospital , doctor’s यांच्यावर वाढत होते. अगदी शिकावू डॉक्टरांना ही covid duty लावण्यात आली.

आपण सगळ्यांनीच पेपर मध्ये ही बातमी वाचली असेल की पुण्यातल्या ससून मधल्या डॉक्टरांनी आत्महत्या केली. सगळ्यांना हळहळ वाटली च पण डॉक्टर सारख्या डॉक्टर ने आत्महत्या केली याचे आश्चर्य ही वाटले.

का केली आत्महत्या त्या डॉक्टरने माहिती आहे ? रोज रोज येणारे serious Covid पेशंट , त्यांचे हतबल नातेवाईक , आणि या नातेवाईकांना पेशंट बरा होईल .. stable आहे. प्रयत्न करतो आहोत असे दिलासे ,

मानसिक सपोर्ट देत होते. पण ते करताना त्यांचं टेंशन वाढत होते. कारण हे covid पेशंट कधी ही दगावत होते. आणि मेडिकल सायन्स ला असणाऱ्या limitations , डॉक्टरांना नातेवाईक किती ही गयावया , हाता पाया पडले तरी ही हे डॉक्टर स्वतः त्यांना वरकरणी मानसिक support देत होते परंतु पेशंट ला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न आणि त्यातून औषधांच्या limitations यातून वाचवू शकत नाही हे वारंवार टेन्शन घेत गेले. डॉक्टर असून असहाय आहोत ही जाणीव.

यातून आपल्या जवळच्या नातेवाईक , शेजारी पाजारी , आजू बाजूचे लोक , शहरातलं , देशातले रुग्ण त्यांचे नातेवाईक यांची बिकट अवस्था रोज रोज बघुंन त्याचे टेन्शन घेवून. ..आणि आपण काही करण्यास असहाय , असमर्थ आहोत ही जाणीव यातून या डॉक्टरने आत्महत्या केली.

बरेचदा असे होते इतरांना मानसिक आधार देत असतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. नवरा बायकोचे वाद . Family कोर्टात भांडणे सुरू असतात . वकील , कौन्सेलर प्रयत्न करतात त्यांचे वाद मिटून समेट‌ घडून यावा.

पण ते दोघे नवरा बायको बघावे तर बाहेर एकत्र चहा घेत असतात आणि वकील इकडे त्यांना समजून सांगून ,मानसिक दृष्ट्या support देवून समजून सांगण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. तारखांवर तारखा पुढे ढकलून वेळ देत असतात. टेन्शन घेत असतात. पण त्या जोडप्याला काही फरक पडत नाही.

बरेचदा जवळच्या मित्राची , नातेवाईकांची नोकरी जाते अशा वेळी दुसरी मिळेल म्हणून मानसिक आधार देत असतो आपण पण त्या मित्राला येणारे सततचे अपयश , नोकरी न मिळणे यातून आपलेच टेन्शन वाढते.

बरेचदा आपल्या नात्यात , शेजारी कोणी आजारी असते . आपण त्यांना मानसिक आधार देण्यास जातो. भेटायला जातो . तर रुग्णाचे नातेवाईक यांना आधार देण्यासाठी काही मदत लागली तर नक्की सांगा असे आपण म्हणतो. एखाद वेळी आपली तयारी ही असते त्यांना मदत करण्याची .

एक गोष्ट आठवली . दोघे मित्र असतात. एका मित्राचे रवी चे व्यावसायिक वडील heart attack ने serious होतात. हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये होते. म्हणून दुसरा मित्र जय त्याच्या सोबत हॉस्पिटल मध्ये येतो. रवी ला आधार देतो. बरे होतील बाबा असा मानसिक आधार देत असतो. थोड्या वेळाने रवी नॉर्मल होतो .

अजय ला म्हणतो माझी ऑफिस ची important meeting आहे . मी जावून येतो. जय खूप आश्चर्य चकित होतो. की असे कसे काय याला आधार वाटावा म्हणून आपण आपले काम सोडून थांबलो आणि हा त्याचे काम सोडून थांबलो. आणि हा याला त्याचे काम महत्वाचे. ? तरी ही जय विचार करतो जावू दे खूप महत्वाचे काम असेल . कदाचित पैसे ही arrange करावयाचे असतील. तर कदाचित खूप टेन्शन मधून थोडे बदल म्हणून तो जात असेल .

तो ठीक म्हणतो . मी थांबतो इथेच काही लागले तर , डॉक्टरनी बोलावले तर . काही औषधे लागली तर मी आहे. तू जा असे म्हणून रवी ला पाठवितो . दोन तास होतात . तीन तास .. संध्याकाळ होते तसे जय ला काळजी वाटू लागते . टेन्शन येते की काय झाले असेल . का पैशाची व्यवस्था नसेल का झाली ? का हा कुठे जाताना धडपडला . एक ना अनेक गोष्टींचे विचार येतात आणि टेन्शन येवू लागते. म्हणून तो रवी ला फोन करतो तर रवी म्हणतो अरे टेन्शन कसले . माझे ऑफिस काम संपले मी घरी गेलो. तर मुले बाहेर हॉटेल मध्ये जायचे म्हणून हट्ट करून बसली. मी त्यांना घेवून हॉटेल मध्ये आलो आहे. त्यांना घरी सोडून येईलच मी हॉस्पिटल मध्यें .

रवी चे हे वागणे , बोलणे ऐकून जय लां खूप मोठा धक्का बसतो. रवी चे वडील आजारी म्हणून त्याला सोबत , मानसिक आधार देण्यास आपण आपले काम सोडून , घर सोडून दिवसभर इथे आहोत. आपण खाणे पिणे करण्यासाठी सुधा तिथून कुठेही किंचित ही हललो नाही . का तर डॉक्टरनी आवाज दिला तर इथे कोणी पाहिजे. ..बाबांचे काय होईल त्यांची काळजी त्याचे टेन्शन घेवून बसलो आणि हा निवांत . याला आपल्या वेळेची , आपल्या काळजी ची ही कदर नाही. मैत्री करिता आपण करत असलेल्या गोष्टी ची कदर नाही.

आणि उलट रवी म्हणाला जय लाच की अरे तू कशाला थांबला दिवसभर . ? काही असते तर डॉक्टरनी फोन केलाच असता की मला.
जय तेव्हा खाडकन जागा झाला की अरे आपण रवी करिता त्याक्षणी मानसिक सपोर्ट दिला तो ठीक होता .तेव्हा त्याची गरज होती त्याला. पण ती तो क्षण गेल्यावर त्यातून तो बाहेर पडला ही. आणि आपण विनाकारण त्याचे , बाबांचे टेन्शन घेवून बसलो .

माणसाच्या समजून घेण्याच्या आणि समजून सांगण्याला ही मर्यादा असतात त्या पलीकडे जावून समजून घेवू लागलो की नकळत माणसावर दुसऱ्याच्या नकारात्मक गोष्टीनं मूळ टेन्शन येवू लागते आणि त्यातून स्वतः चा घात होण्याची शक्यता जास्त होत असते. तेव्हा दुसऱ्याला मदत करताना स्वतः वर अन्याय होवू देवू नका.

आयुष्य सुंदर आहे. मानसिक सपोर्ट देणं ठीक आहे, पण ते करताना तुमचं टेंशन वाढवू नका. मर्यादा ठेवा. कारण तुमच्या सतत साथ असण्याने, support देण्याने फार काही फरक पडणार नसतो त्यांना. जेव्हा वेळ असते त्याक्षणी तुम्ही महत्वाचे वाटता. तुमचा मानसिक आधार महत्वाचा वाटतो. पण वेळ गेली की तुमच्या support ला ते विसरून ही जातात.

म्हणून हे विनाकारण टेन्शन ओढवून घेण्यापेक्षा मर्यादा ठेवा. आणि आयुष्यात आधार दिल्याचा आनंद ही घ्या पण अलिप्त राहून टेन्शन ही घेवू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!