मानसिक ताण ओळखता येतो का ? तो कसा ओळखावा ?
सोनाली जे.
बरेचदा ताण आणि तणाव या दोन्ही गोष्टी एकाच दृष्टीने बघितल्या जातात. ताण म्हणजे काय तर स्ट्रेस .. टेन्शन म्हणजे काय तणाव. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद , किंवा प्रतिक्रिया म्हणजे ‘ ताण किंवा तणाव ‘ होय.
एखादी गोष्ट आपल्या कंट्रोल मध्ये नसेल तर, किंवा बाह्य परिस्थिती मध्ये होणारा बदल आपण पटकन accept करत नाही त्यामुळे आपल्या मनाची होणारी अवस्था म्हणले तरी चालेल .
पूर्वीच्या काळी ही ताण तणाव होतेच परंतु त्याचे प्रमाण कमी होते. त्या काळी सोयी सुविधा ही कमी होत्या. आज सोयी सुविधा वाढल्या आहेत परंतु रोजचे स्ट्रेस ही वाढले आहेत. जसे की ट्रॅफिक वाढले त्यामुळे वेळेत शाळेत , ऑफिस ला पोहचणे असेल , ऑफिस ची टार्गेट वेळेत पूर्ण करणे असेल , तर घरात प्रत्येकाच्या आवडी निवडी लक्षात घेवून वेळेत डबा करणारी आई असेल , किंवा नोकरी करून घरातले ही सर्व करावे लागणारी आई असेल . म्हणजे बाह्य आणि अंतर्गत ताण हे वाढतच चालले आहेत.
मानसिक ताण ओळखता येतो का ? तो कसा ओळखावा ?
खरे तर बरेचवेळा मानसिक ताण ओळखता येतो. रोजच्या वर्तनात ला हळूहळू होणारा बदल असेल किंवा अचानक बदल घडला तर ते जवळच्या लोकांना जाणविते . की असे पूर्वी तरी वागत नव्हते , नव्हती , नव्हता. आता काय असे विचित्र वागतात. चिडचिड करतात.
प्रत्येकाच्या सुखाची , गरजांची व्याख्या ही वेगळी असते. प्रत्येकाची स्वप्ने वेगवेगळी असतात. ध्येय वेगळी असतात. त्यामुळे प्रत्येकाची दुःख , चिंता , काळजी वेगवेगळी असते. त्यामुळे ही ताणतणाव येतात.
ताणामुळे वर्तनात होणारे बदल, चिडचिड , अस्थैर्य , insecurity यामुळे ताणाचा परिणाम तुमच्या वागण्या बोलण्यात दिसू लागतो. आपण ज्यंच्याकरिता ही सगळी धावपळ करत असतो , ताण घेत असतो , आपल्याला त्रास करून ही गोष्टी पुढे रेटत असतो त्या आपल्याच सोबत असणाऱ्या आपल्या लोकांना आपण आपल्या वर्तनातून दुखावतो.
मानसिक ताण , मेंटल स्ट्रेस / pressure / टेन्शन हे कसे ओळखावे : –
१. चिडचिडेपणा. : अनेकदा कामाचे टेन्शन , ताण आपल्याला चिडचिड करण्यास प्रेरित करते. उदा. : यश ला ऑफिस मध्ये बॉस कामावरून सतत बोलत असतो , सतत टार्गेट चे टेन्शन आणि ते वेळेत पूर्ण करण्याकरिता सतत मानेवर तलवार तो घरी आला तरी सतत त्यावरून. चिडचिड करतो. एकदा यशचा मुलगा पार्थ त्याला शाळेतल्या प्रोजेक्ट करिता मदत करायला सांगतो तेव्हा यश त्याच्यावर प्रचंड चिडचिड करतो. ऑफिस मध्ये ही काम इथे ही काम , घरी ही आलो की काम , तुझे तू बघून घे , ऑफिस मधून घरी आल्यावर थोडे ही आराम नसतो.
असे म्हणून चिडचिड केली.
तसेच आहे .ऑफिस मधल्या काम , ताण , ऑफिस मधून लक्षात ठेवून भाजी आणि इतर गरजेच्या वस्तू असतील , इस्त्री चे कपडे असतील हे न विसरता घेवून येताना उशीर तर होतोच पण एखादे काम ही विसरून चालत नाही. नाही तर दुसरे दिवशी गोंधळ उडतो. इस्त्री चे कपडे मग त्यातला तोच ड्रेस नवऱ्याला पाहिजे असतो ..किंवा मुलाचा युनिफॉर्म असतो त्यात ..विसरले की सकाळी शाळेत काय घालून जाणार ..
कारण काय सांगावे लागेल हे वेगळेच. तर असे छोटे छोटे मोठे मोठे ताण तणाव पूर्ण करताना सगळी कसरत होत असते. एकच व्यक्ती सगळीकडे धावपळ करताना होणारी तारांबळ , तो ताण कुठे तरी आई वर , घरच्या स्त्री वर किंवा पुरुष जे सगळे सांभाळत असतात त्यांना हा सततचा ताण सहन होत नाही आणि मग छोट्या छोट्या गोष्टीत ही चिडचिड.
स्त्रिया मुले आपली असतात हक्काची मग उगीच त्यांच्या अभ्यासावरुन चिडचिड करतात. अभ्यासाला बस. अभ्यास करत नाही म्हणून चिडचिड .बडबड करतात.
२. नैराश्य :- उदासीनता : – कोणत्याही गोष्टी कडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कमी होवून नैराश्य येवू लागते. उदासीनता वाढीस लागते.
एखादी गोष्ट बाकी सगळी जन उत्साहाने करत असतात परंतु ताणा मुळे काहीच करावेसे वाटत नाही. आपल्याला हे जमत च नाही. असे म्हणून नैराश्य , उदासीनता येते..
उदा. ऑफिस ची टार्गेट वेळेत पूर्ण केली नाहीत तर त्यातून निर्माण होणारा सततचा ताण पुढचे काम करण्याची इच्छा कमी करण्यास कारणीभूत ठरतो. किती ही काम केले तरी ते कमीच पडते. टार्गेट पूर्ण होताना नेहमीच ताण घ्यावा लागतो त्यापेक्षा जावू देत कामच नको अशी मानसिकता होते. काम करण्याविषयी सुधा उदासीनता येते.
नातेसंबंधात दुरावा येणे , जिवलग व्यक्ती चे निधन , ती काही कारणाने कायमची दुरवणे , विचार न पटणे , किंवा सतत मतभेद होणे, ब्रेक अप होणे , एकमेकांच्या priority बदलणे , गैरसमज , यातून नाती दुरावतात तेव्हा नात्या मधला ताण तणाव आणि प्रयत्न करून ही परत ती नाती जवळ येणार नाहीत याची खात्री पटल्यावर नैराश्य आणि उदासीनता वाढीस लागते.
३. आर्थिक ताण : प्रत्येकाला ठराविक वेळा , वयात स्वतः आर्थिक भार सांभाळावा लागतो. कधी कोणाला कमी वयात असेल तर कधी अचानक आलेली आपत्त्ती असेल , तर कधी शिक्षण पूर्ण झाल्यावर ..कधी लग्न आणि संसार या करिता .
यातून पुढे आर्थिक जबाबदाऱ्या या वाढत जातात जसे आई वडिलांची औषधे असतील , मुलांचे शिक्षण , वाढता घरखर्च असेल , गाडी , घर याकरिता खर्च असेल किंवा कर्ज आर्थिक ताण वाढत जातात. आणि आपल्या लोकांच्या अपेक्षा किंवा आपल्या गरजा आपल्या आर्थिक मिळकती मध्ये पूर्ण करता आल्या नाहीत तर आर्थिक ताण वाढून depression येते. आणि सतत चिंता या चेहऱ्यावर दिसतात. वागण्यात ही दिसतात.
४..आत्मविश्वास कमी होणे : सततचे अपयश : अभ्यासात , नोकरी व्यवसायात , नात्यात , आर्थिक गोष्टीत सतत चे येणारे अपयश आपले ताण तणाव वाढवतात आणि व्यक्ती मधला आत्मविश्वास कमी होतो. आपल्याला हे जमेल का नाही याची साशंकता निर्माण होते.
५. अलिप्तता :- आपले जवळचे नातेवाईक , मित्र मैत्रिणी , सहकारी यांच्यात काही ना काही कारणाने तणाव निर्माण होतो. जसे मीच का फोन करायचा असेल किंवा मीच का नोट्स काढायच्या , किंवा प्रत्येकवेळी मी कामात झालेल्या चुका किती समजून घेणार ? यातून एकमेकात , भावनात , अपेक्षा मध्ये ताण निर्माण होत असतो. आणि अनेकवेळा एकमेकांना संधी देवून ही आपल्या इच्छा , अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत . तर ताण निर्माण होवून नात्यात अलिप्तता येते.
६. कशातही रस किंवा गोडी न वाटणे. कोणत्याही छंदामध्ये आनंद न वाटणे.
७. थकवा वाटणे किंवा ऊर्जा कमी वाटणे.
८. हळूहळू बोलणे…तोंडातल्या तोंडात बडबडणे. पुटपुटणे.
९. बैचेनी वाटणे किंवा एका ठिकाणी बसविले न जाणे.
१०. सतत दुसऱ्यावर राग काढणे .
११. कामात लक्ष न लागणे, लक्षात न राहणे, लवकर निर्णय न घेता येणे.
१२. झोप न लागणे, सकाळी लवकर जाग येणे किंवा जास्त झोप लागणे. जाग आली , झोप झाली तरी अंथरुणात तसेच पडून रहावेसे वाटणे .
१३. भूक न लागणे, किंवा जास्त भूक लागणे.काही वेळेस खातच राहणे .
१४. एकटेपणा : आणि सततचे विचार
१५. आत्महत्येचे विचार येणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे. उदा. पेपर अवघड गेला म्हणून हुशार विद्यार्थ्याने आपण आता नापास होणार याचा विचार करून ताण घेतला त्यामुळे आत्महत्येचे विचार , प्रयत्न केले जातात. किंवा करावे असे वाटते.
१६. विनाकारण रडू येणे.क्षणात मूड बदलणे.
१७. सेक्सची कमतरता वाटणे. त्यातला इंटरेस्ट कमी होणे .
१८. ताण तणाव यातून डिप्रेशन बरोबरच डायबेटिस , हृदय विकार , palpitation, हृदयात धडधड वाढणे , रक्तदाब या सारखे आजार जडणे.मग लहान वयात ही.
१९. Mood swings : अचानक मूड बदलतात. मग कोणतेही ताण असोत आर्थिक , सामाजिक जबाबदाऱ्या , किंवा अतिशय जोखमीचे काम त्याचे ताण असोत. किंवा अगदी नवरा बायको नात्यात निर्माण झालेले अपेक्षा किंवा कमतरता यातून निर्माण झालेले ताण असोत. त्यातून मूड swings होत असतात.
वरच्या अनेक गोष्टींमधून व्यक्ती किती ताण घेत आहे हे समजते. मानसिक ताण , मेंटल स्ट्रेस / pressure / टेन्शन हे कसे ओळखावे : – तर त्याच्या नेहमीच्या वर्तनात हळूहळू किंवा एकदम घडत जाणारा आणि जाणविनारा बदल.हे सततच्या अनुभवाने , निरीक्षणाने , किंवा सतत घडणाऱ्या बदलणारे निर्णय , गोष्टी , मूड यातून लगेच लक्षात येतात.
आयुष्य खूप सुंदर आहे. मानसिक ताण ओळखता येतो . तो वेळेत ओळखा. त्यावर नियंत्रण मिळवा. माईंडफुलनेस techniques शिकून घ्या.
म्हणजे माझ्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातील मानसशास्त्रीय जाणिवामध्ये (emotional feelings), त्यांच्या प्रतिसादांमध्ये (responces), त्यांच्या निर्धारमध्ये (confirmation), त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये (reactions) त्यांच्या अनुभूतीमध्ये (experience) या सर्व घटकांमध्ये जाणीवपूर्वक बदल करून घेणे…आणि त्यातून ताण कमी करणे.
योगा , meditation करा . सकारात्मक विचार करा. आणि सकारात्मक लोकांच्या सोबत राहा. नियमित व्यायाम करा. चौरस आहार घ्या. नियमित झोप घ्या. आवडत्या गोष्टी , छंद जपा त्यातून तुमचा ताण कमी होण्यास मदत होईल. योग्य आहार , पाणी भरपूर प्या. तसेच सेक्स ही गोष्ट आपल्याला गरजेची आहे हे लक्षात घेवून ताण कमी करण्यासाठी त्याचा ही आनंद मुक्तपणे घ्या.
Motivational videos बघा. आवडत्या गोष्टी करा. लहान मुलांसोबत खेळा त्यातून तुम्ही खूप ताण मुक्त होत असता. आवडत्या ठिकाणी जा. छोट्या मोठ्या पिकनिक , ट्रीप काढा त्यातून वातावरण बदल होत असतो. कधी कधी मित्र मैत्रिणी सोबत मोकळेपणाने बोला, भेटा. व्यक्त व्हा.
आयुष्य सुंदर आहे. ताण ही कायम टिकणारी भावना किंवा गोष्ट नाही .ती परिस्थितीजन्य , व्यक्तीनुरूप , स्थल काल सापेक्ष आहे. ती बदलणारी आहे. त्यामुळे त्याचा आपल्या सुंदर आयुष्यावर परिणाम होवू देवू नका. ताण तणावावर मात करून पुढे आनंदाने आयुष्य जगा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


