माणूस मनातून उतरला की तो काय करतो..याचा आपल्यावर काहीच परिणाम होता कामा नये…
सौ.मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
माणूस म्हणून जगत असताना माणसाच्या मनात प्रत्येकासाठी एक विशिष्ट जागा ठरलेली असते आणि ही जागा कोणी काही जबरदस्तीने किंवा मला तुझ्या मनात जागा हवी आहे अशी मागून मिळत नसते ती जागा समोरच्या व्यक्तीने कमावलेली असते आणि प्रत्येकाच्या मनात आपल्या खास व्यक्ती असतातच मग खास म्हणजे काही सुंदरचं असेल असे नाही दिसायला जास्त सुंदर नसलेली व्यक्ती सुद्धा स्वभावाच्या आणि विचारांच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात आपली प्रतिमा कोरत जाते आणि प्रत्येकासाठी जागा या अर्थाने की माणूस म्हणून माणुसकीचे नाते आपले सर्वांशीचं असते नाही का..??
बघा खूप सुंदर गोष्ट आहे जर आपण या गोष्टीला समजून घेतले तर …..बघा आपल्याला राग नेहमी आपल्याच माणसाचा येतो जो आपल्यासाठी अनोळखी आहे त्यांचा आपल्याला कधीच राग येत नाही म्हणून जिथे आपलेपणा असतो, राग आणि रुसवे-फुगवे सुद्धा तिथेच असतात म्हणजे आपण उदाहरण बघुया समजा आपण ज्या गावात शहरात ज्या ठिकाणी राहत असणार त्या ठिकाणी आपले दूरचे नातेवाईक येऊन गेलेत परंतु आपल्या घरी आले नाहीत तर काहीजणांना राग येईल अरे तुम्ही तर आम्हाला आपले समजतच नाही नाहीतर घरी आलेच असते.
असेही होऊ शकते की त्यांना काहीतरी कामे असतील, घाईत असतीलं त्यामुळे त्यांना येणं झालं नसेल पण फोन तरी करायचा होता आम्ही आलो असतो ना भेटायला हे आपुलकी निर्माण होते ती फक्त त्या व्यक्तीसाठी मनात असलेल्या त्या जागेमुळे आदरभाव यामुळे मित्रहो, अजूनही अशी माणसे आहेत सर्वच नसली तरी सुद्धा फक्त त्यासाठी आपली तशी त्या व्यक्तीच्या मनात जागा हवी….
मित्रहो कोणाच्या मनात घर निर्माण करणे यापेक्षा ते टिकवणे महत्त्वाचे आहे, काही माणसे चांगुलपणाचे नाटक करून जगत असतात परंतु होते काय की त्यांचे ते उसने अवसान आणून ते किती दिवस मिरवणार कारण अशी एक वेळ नक्कीच येते की ते माझं माझं म्हणून आणलेलं उसनं अवसान एके दिवशी संपुष्टात येते आणि तोंडघशी पडलेल्या त्या व्यक्तीची खरी ओळख समोर येते आणि मग तो माणूस मनातून उतरून जातो.
म्हणजेच पहिल्यासारखी त्याची किंमत कुणाच्याही मनात राहत नाही कारण ज्यामुळे सर्व जण त्या व्यक्तीला मानत होते त्याच्या गोष्टीशी सहमत होते निवड फक्त स्वार्थापोटी त्या व्यक्तीने असे केले असल्यामुळे त्याची किंमत निवड खोट्या आशेवर तरंगणारी होती हे जेव्हा लक्षात येते तेव्हा मात्र त्याच्या असण्यापेक्षा त्याच्या नसण्याच्या अपेक्षा व्यक्ती करू लागतो….
माणूस मनातून उतरला की तो काय करतो त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होता कामा नये माणूस मनातून उतरल्याचा हा अर्थ कधीच होत नाही की त्या व्यक्तीने आपल्या मनाप्रमाणे वागावे परंतु त्याची अशी एक कृती ज्यामुळे अन्य कुणाला त्याची शिक्षा भोगावी लागली किंवा त्यामुळे दुसर्याचे नुकसान झाले ,खोट्या आशा दाखवून लोकांसोबत खेळ केला असे….. यामुळे माणूस मनातून उतरून जातो पहिल्यासारखी त्याची ती जागा राहत नाही.
परंतु माणूस मनातून उतरल्यानंतर तो काय करतो किंवा त्याच्या काही करण्याचा आपल्यावर परिणाम होता कामा नये…. बर्याचदा असे बघायला मिळते की बाकी लोकांचा आपण आपल्यावर खूप परिणाम करून घेतो तो मला असं कसं बोलला ती व्यक्ती मला असं कसं काय म्हणू शकते ?? इत्यादी अशा कितीतरी गोष्टी त्याचा आपण आपल्यावर परिणाम करून घेतो त्यामुळे त्रास फक्त आपल्यालाच होतो त्यामुळे ज्या लोकांना आपल्या मनाने जागा दिली नाही त्याचा परिणाम आपल्यावर होता कामा नये हे यासाठी मित्रांनो आपल्यापैकी काही जणांना सवय असते की जी व्यक्ती मनातून उतरून गेलेली असते त्याच्या बद्दल विचार करत बसायचा तो काय करतो यावर लक्ष ठेवायचं ,आणि त्याच त्याच गोष्टी आठवून स्वतःवरती त्याचा परिणाम करून घ्यायचा…
हे म्हणायला खूप सोपे आहे परंतु करायला मात्र तितकेच कठीण परंतु अशक्य नाही कारण काही गोष्टी स्वभावाच्या आडसुद्धा येतात त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींचा परिणाम किती मर्यादेपर्यंत होऊ द्यायचा हे ज्याचे त्याचे ज्याने त्याने ठरवावे कारण की आपले हित कशामध्ये आहे हे आपले आपल्याला जास्तीचे माहिती असते त्यामुळे तुमच्या वरती होणाऱ्या परिणामांचा आउटपुट सोर्स तुमच्या हातात असणार आहे त्यामुळे आयुष्य तुमचे आहे “”ना कोणाच्या अभावाने जगा, नाही कोणाच्या प्रभावाने जगा, आयुष्य तुमचे आहे ना… मग ते तुमच्या स्वभावाने जगा…..!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख आवडला