माणसांची कदर करा, कारण ते आपल्या आयुष्यात पुनःपुन्हा येत नसतात.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थी)
आपण आयुष्य किती गृहीत धरून चालतो ना ! जस की कायमचे रहिवासी आहोत आपण या भूतलावरचे , अगदी अमर असल्यासारखे! त्याच बरोबर आपल्या आजूबाजूच्या माणसांना , मित्रांना , कुटुंबातल्या व्यक्तींना आणि जवळपास सगळ्याच माणसांना खूप गृहीत धरून चालतो . आणि कधीतरी मग अचानक कोणीतरी या पृथ्वीचा निरोप घेत किंवा आपल्याला सोडून जात या ना त्या पद्धतीने आणि मग धक्का बसतो एक reality check मिळतो आपल्याला .
मग बऱ्याच वेळा असं वाटायला लागत की अरे त्याला हे बोलायचं राहून गेलं , त्याच्यासाठी हे करायचं होत पण राहून गेलं , या गोष्टीसाठी माफी मागायची होती अन त्या गोष्टी साठी आभार मानायचे होते पण सगळंच राहून गेलं . पण माणसाने एकदा का अखेर चा निरोप घेतला की सगळं करण आणि बोलणं अगदी अशक्य होऊन जात. आणि मग कधी कधी त्या गोष्टीचा पच्छाताप वाटायला लागतो, आपण हे का त्याच वेळी केल नाही अशी चीड मनात येते
पण आपण इतकं गृहीत का धरतो माणसांना ? खरं बघायला गेलं तर किती सोप्पं आहे ज्या वेळेला चूक लक्षात येईल तेव्हाच माफी मागणं, कौतुक वाटलं तर कौतुक करणं आणि कोणी मदत केली तर त्याचे आभार मानणं पण आपण काय करतो, तर राग आला की रागावतो, कोणाचं काही पटलं नाही तर लगेच आपलं मत मांडून मोकळे होतो , म्हणजे काय तर प्रेमाच्या किंवा समोरच्याला आणि आपल्याला ही आनंद देणाऱ्या गोष्टी वेळीच बोलून दाखवत नाही आणि बाकी जे नंतर व्यक्त केल तर चालू शकत अस मात्र सगळं व्यक्त करून बसतो. आणि मग जेव्हा माणूस दुरावतो तेव्हा जे बोलायचं- करायचं राहून गेल ते आठवून हळहळतो.
आपला शत्रू जेव्हा या जगाचा कायमचा निरोप घेतो तेव्हा सुद्धा खूप माणसे दुःख व्यक्त करतात की माणूस गेल्यावर त्याच्या बद्दल काही वाईट बोलू नये असं म्हणतात आणि शत्रू असणाऱ्या त्याच्या ही गुणांचं कौतुक करायला मागे पुढे बघत नाहीत पण हेच तो असताना का बर होऊ नये ? कदाचित काही शत्रू तरी मित्रांमध्ये बदलतील आणि जरी नाही मित्र झाले तरी चांगुलपणा च्या एखाद्या गोष्टीसाठी पुढाकार घेण्यात का इतका विचार करावा आपण?
चला हे झालं शत्रूचं, एक वेळेस हा विषय च सोडा. पण आपल्या माणसंच काय, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, जे आपल्यावर प्रेम करतात, ज्यांची काळजी वाटते अशा आपल्या माणसांकडे तरी कुठे आपण मोकळेपणाने व्यक्त होतो!
माझं हे झालं की मी याच्यासाठी हे करेन, अमक्याला ते देईन न तमक्याला हे, आणि असं म्हणता म्हणता कधी आपला काळ येतो किंवा त्यांचा हे कळतच नाही, आणि येऊन गेल्यावर मात्र करायचं राहून गेला किंवा बोलायचं राहू गेल याची खंत मनाला बोचत राहते आणि कधी कधी तर माणसं आपल्याला जिवंत असताना ही दुरावतात, कदाचित खूप प्रयत्न करतात ती आपल्या सोबत राहायचा पण आपण किंमत न ठेवल्यामुळे किंवा कदर नसल्यामुळे, दुखावून आपल्या पासून कायमची दुरावतात.
उदाहरणार्थ मला पगारात बढती मिळाली की बायको साठी अमुक वस्तू घेईन मुलांसाठी तमुक गोष्ट घेईन , हे तुम्ही कराच हो पण ते होईपर्यंत तुमच्या संसारासाठी धडपडणारी बायको, तुमची गोड मुले, तुमच्यासाठी अपार कष्ट करून तुम्हाला ज्यांनी मोठं केला असे तुमचे आईवडील, संकटात असताना धीर देणारे आणि प्रसंगी मदत करणारे तुमचे मित्र यांच्यासाठी तुम्ही खूप काही करू शकता ज्यासाठीं पैसे लागत नाहीत जस की वेळ घालवणं, त्यांचे कष्ट त्यांची माया तुम्हाला कळते हे व्यक्त करणं आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला किती भाग्यवान समजता हे त्यांना सांगणं.
मित्र, शत्रू, कुटुंबीय,नातेवाईक इत्यादी कोणी का असेना एकदा गेले की गेले परत कोणी आपल्या आयुष्यात येत नाहीत तरी आपण हे माहित असून सुद्धा कित्तेकदा विसरतो आणि अहंकारामुळे किंवा कधी कमीपणा येण्याच्या भीतीने किंवा गृहीत धरल्याने ज्या गोष्टी करायच्या त्या करत नाही , माणसे जपत नाही आणि त्यांची कदर ही करत नाही.
सध्याच्या धावपळीच्या, धकाधकीच्या आणि ताणतणावयुक्त जगात कशाचीच शाश्वती नसते त्यामुळे आपल्या माणसांची कदर करूयात. आपण केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीने ते सुद्धा आनंदी होतील आणि त्यांना तस बघून आपल्याला ही आनंद मिळेल. कधी कधी त्यांच्याकडे पुरेसा लक्ष देणं आणि त्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेवणं हे ही एखाद्याला आनंद देऊन जात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Khup Chan lihil ahe , Ani he Khar ahe je mazya bavtit ghadal he vachtana tyat mala mazi mi disli. Apan kahi velela apla rag itka tabun dharto ki apan aplya ragapudhe swabhimanapudhe itar kontyahi goshticha vichar karat nahi. Mazya batit hi mazya javlchya mansasobat ch as ghadal. Ajun hi mazyat manat barach kahi bolnyasarkh mala vatat hi mi tyanchyashi bolav pn ek man sangat ki tyanchyashi tu bolnyane kahi farak padnar ka mg ka bolu mg te rahatch. Roj praytna krte bolaych agdi manachi tayari karun pn tashi vel yetach nahi. Tumche lekh khup Chan astat. Thnx ya lekhbadal mi nakki praytna Karen mz man mokal karnyacha