माझं नवीनच लग्न झालंय, बायकोला खुश ठेवण्यासाठी काय करू ??
टीम आपलं मानसशास्त्र
आजकाल सोशल मीडियावर वैयक्तिक प्रश्नांची इतकी गर्दी होतेय. कळतच नाही की आपण आपल्याला अडचणी , समस्या यांची उत्तर किती सहजरीत्या दुसऱ्याकडून अपेक्षित करतो.
माझी बायको मला खूप त्रास देते त्यासाठी मी काय केलं पाहिजे…??
माझं नुकतच लग्न झालं आहे बायकोला खुश ठेवण्यासाठी मी काय काय करायला हवं…??
माझ्या आईचं आणि बायकोचं पटत नाहीये यामधे मी काय करावं…??
हे प्रश्न वाचल्यावर क्षणासाठी अस वाटल जस , अरे मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे कोणता चांगला आहे मला सुचवता का…?? माझी गाडी विकून मला दुसरी गाडी घ्यायची आहे ही गाडी कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा..??
बघाना गाडी म्हणा नाहीतर मोबाईल.. वस्तूंच्या बाबतीत निर्णय घेताना दुसऱ्यांना आलेल्या अनुभवातून आपण आपले निर्णय घेताना विचार करतो. तिथे काहीतरी संबंध असतो तरी..
पण वैयक्तिक पातळीवर आपल्याला पडणारे प्रश्न जरी दुसऱ्यांसारखे वाटत असले तरी त्यांची उत्तरं मात्र वेगवेगळी असतात. किती सोप असताना सुद्धा आपण आपले प्रश्न अजून अवघड करतो. ते कसे हे एकदा विचार करून बघा…
माझी आई आणि बायको एकमेकींशी नीट वागत नाही मी काय करावं???
यावर सहसा काय उत्तर मिळणार
अरे दोघींना समजावं.
अरे काही उपयोग नाही विचार करून सोडून द्यायचं सगळं कितीही बोलल तरी कोणाला फरक नाही पडत..
अरे बायकोला घेऊन वेगळं रहा हाच सोप्पा उपाय…
अरे मीपण असच केलं बायकोला घेऊन वेगळा राहिलो आई ला महिन्याच महिन्याला सगळं पुरवतो लक्ष देतो..
अरे आई ने जन्म दिलाय तुला तिला सोडून आता आलेल्या बायकोचा विचार करतोस का…
अरे शांत राहायचं.. दुर्लक्ष करायचं .. भांडायच तेवढं भांडूदेत त्यांना तू तुझा मस्त रहा…
हुश््श… अशा एक ना अनेक शिकवणी मिळतील आणि त्याच्यात तुमच्या प्रश्नाचा तुम्हाला विसर पडेल असे भयानक उत्तर सुद्धा तुम्हाला मिळतात.आणि या सगळ्यांच्या उपदेशातून आपण अजून गोंधळून जाणार..
आता सांगा यातून जे उत्तर देतात त्यांचा स्वभाव, त्यांच्या आजुबाजूच वातावरण, त्यांच्या घरातील माणसांचा स्वभाव आणि आपला स्वभाव, आपल्या आजुबाजूच वातावरण, आपल्या घरातील माणसांचा स्वभाव यामधे किती साम्य आणि किती फरक असेल… तरीसुद्धा का एक क्षुल्लक विचार सोडून आपण आपले वैयक्तिक प्रश्न सोशल मीडियावर पोस्ट करतो.
आपण कस वागावं, आपल्या सोबत हे आहेत त्यांनी कस वागल पाहिजे, परिस्थिती कशी बदलता येईल यावर उपाय आपण स्वतःच शोधले तर नक्कीच आपल्याला उत्तर सापडतील. कारण मूळ परिस्थिती, वादाची किंवा प्रसंगाचीकारणे, काय केले तर काय होऊ शकते याचा अंदाज, सर्वांचे स्वभाव हे दुसऱ्यांना नाही तर आपल्यालाच माहीत असतात.
आपण आपल्या जवळच्या माणसांना, मित्रांना ज्यांना आपण कायम सर्व शेअर करत आलोय त्यांना आपल्या समस्या सांगून मन मोकळं करू शकतो… ते आपल्याला , आपल्या घरच्यांना चांगलं ओळखत असतील तर नक्कीच चांगला सल्ला देतील. आपल्याशी सविस्तर बोलतील किंवा जास्त गरज पडली तर तज्ञांकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. पण सोशल मीडियावर आपले वैयक्तिक प्रश्न मांडून आपल्या हाती काहीच लागत नसताना उगाच आपल्या वैयक्तिक आयुष्याला सर्वांसमोर उघड केल्यासारख आपण का करावं…..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

