मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देऊया, कारण पुढे सरकायचंय.
सोनाली जे.
हँसते-हँसते कट जाए रस्ते
ज़िन्दगी यूँ ही चलती रहे
खुशी मिले या गम
बदलेंगे ना हम
दुनिया चाहे बदलती रहे !!
आयुष्य आहे. भूतकाळ , वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच. पण वेळेनुसार , गरजेनुसार , किंवा काही वेळेस इच्छा नसताना ही , कधी पुढच्या चांगल्या भवितव्यासाठी काही गोष्टी , मित्र , मैत्रिणी , नातेवाईक , शेजारी, स्थळे , जागा , व्यक्ती , नोकरी यात बदल करावे लागतात.
अशावेळी नक्कीच वाईट हे वाटत असते. कारण आधीच्या सर्व गोष्टी पासून दुरावत असतो. त्या मागे सोडून पुढे जाताना नक्कीच वाईट वाटते.
जसे दहावी पर्यंत खूप छान मित्र मैत्रिणी झाले असतात. आपल्या सोबत आपली सुख , दुःख शेअर करणारी .आपण त्यांच्या सोबत मनमोकळेपणे बोलत असतो. एकमेकांना मार्गदर्शन मग अभ्यास असेल , इतर अडचणी असतील किंवा अगदी आपले खास secret शेअर केल्यावर सोबत आणि साथ देणारे असतील., डबा खाताना घासातला घास भरविंनारा मित्र मैत्रीण असेल. चांगले शिक्षक , शाळा , सगळ्या गोष्टी मागे सोडून दहावी नंतरचे शिक्षण घेण्याकरिता कॉलेज मध्ये जावे लागते. अशावेळी या सगळ्या गोष्टी मागे सुटणार म्हणून तिथेच थांबून चालणार नाही ना ??
मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देऊया, कारण पुढे सरकायचंय. कारण किती ही वाईट वाटले , त्रास झाला , सोबती मागे सोडून पुढे जावे लागले तरी ते जावेच लागते .पर्याय नसतो .
अशावेळी आठवणी या सोबत असणारच आहेत. पण जेवढ्या हसून निरोप देवू तेवढ्या चांगल्याच गोष्टी लक्षात राहणार आहेत. जर त्रास करून घेतला . रडलो . भावनिक झालो तर आजपर्यंत ज्या खूप चांगल्या गोष्टी एकत्र केल्या आहेत . आनंद , सुख मिळवले आहे त्याची जागा त्या त्रासाने , दुःख करण्याने चंद्राच्या डागासारखी डागाळेल.
आणि पुढे जाताना एक ठाम निश्चय करून जा. Back and Forth मध्ये अडकला तर आता जे नवीन करणार आहात , पुढे जाणार आहात तो निश्चय ही मागच्या गोष्टीत अडकल्याने डळमळीत होईल. आणि एकदा जर ठाम निर्णय घेतला पुढे कॉलेज मधल्या गमती जमती एन्जॉय करता येतील. नवीन मित्र मैत्रिणी मिळतील. त्यांच्या कडून अजून नवीन गोष्टी शिकता येतील त्यांच्याकडून , नवीन शिक्षक , नवीन वातावरण मिळेल. त्या त्या क्षणी त्या त्या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे.
मागे सुटणाऱ्या गोष्टीत अडकून पडलो तर आताचा क्षण ही वाया घालवू. आणि आताचा क्षण निसटला , ती वेळ गेली , व्यक्ती गेली , परिस्थिती बदलली तर परत तो क्षण कधीच येत नाही. म्हणून मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देऊया, कारण पुढे सरकायचंय. आणि पुढे सरकताना त्या त्या क्षणांचे आनंद , सुख मिळवायचे आहेत.
नावीन्य आणि चैतन्य मिळवायचे आहे. नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. आयुष्य अजून भरभरून जगण्यकरिता नवीन अनुभव , अनेक व्यक्ती , आपल्यापेक्षा अनुभवी , ज्ञानी अशा व्यक्तींचे मार्गदर्शन पुढे जावून च मिळते. आणि पुढे जावून हा उत्साह टिकवायचा असेल तर मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देऊया, कारण पुढे सरकायचं.
माझी खास मैत्रीण .पाचवी पासून अजून एकत्र आहोत. Bsc नंतर लगेच आई वडिलांनी ठरविलेल्या मुला बरोबर लग्न केले. छोट्या शहरातून पुण्या सारख्या मोठ्या शहरात आली. वाढते खर्च लक्षात येवू लागले. नवऱ्याची नोकरी होती पण मिळकत फारशी नाही. म्हणून व्यवसाय करायचे ठरविले त्याने . हीचा जॉब सुरू होताच. दोन मुले झाली. एक मुलगी एक मुलगा.
मैत्रिणीचे दागिने विकून तिच्या नवऱ्याने बिझनेस सुरू केला त्यात ही नुकसान होत गेले. मग काहीच करत नव्हता . मुलांची जबाबदारी , घरची जबाबदारी , सगळे खर्च हे माझी मैत्रीण बघत होती. शेवटी कुठे ना कुठे सहनशक्ती संपली. नवरा आणि तिचे वाद होवू लागले. शेवटी घटस्फोट घेतला. त्याने काही ही दिले नाही. मुलांचा खर्च नाही ..मुलांची जबाबदारी ही तिच्याकडे . पण तिने इथेही जिद्दीने आहे हा बदल स्वीकारला आणि मागे सुटणाऱ्या तिच्या या वैवाहिक आयुष्याला हसून निरोप दिला.
कारण तिला त्यातच अडकून पडून मानसिक त्रास आणि वाद यातून शांत , वादमुक्त जीवन जगण्याचा , आयुष्यात पुढे सरकण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यात ही सगळ्याच जबाबदाऱ्या पडणारच होत्या. आर्थिक , मुलांच्या सगळ्याच जबाबदाऱ्या , कोणाचा support नाही कारण आई वडील divorce विरुद्ध होते त्यामुळे त्यांनी कोणता ही support दिला नाही.
मुले मोठी होवू लागली . नवऱ्याची पोकळी तशी जाणवत होतीच. त्यातच ऑफिस मध्ये बरोबर काम करणारा त्याचा ही divorce झाला होता. त्यानं आणि हिने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. लग्न केले . आधी घरी सांगितले नाही. पण मग सांगितले. दुसरा नवरा त्याने त्याचा फ्लॅट आधीच्या बायको ला देवून टाकला . आणि राहायला मात्र मैत्रिणी कडे तिच्या घरी आला.
मुलांच्या बरोबर थोडे जमवून घेत होता. पण हिच्या इतर नातेवाईक , मैत्रिणी यांच्यात मिक्स होत नव्हता. त्यांना टाळत होता.
या दुसऱ्या नवऱ्याने ही घरची जबाबदारी नाही उचलली. घर भाडे , मुलांची फी , मुलांचे खर्च , घर खर्च सगळे हीच करत होती. आणि एक दिवस यानेही covid काळात नोकरी सोडली. हिची नोकरी सुरू होतीच. पण पहिल्या नवऱ्या बाबत जे झाले तेच या बाबत ही झाले.
शेवटी याच्या बरोबर ही divorce घेतला. पर्याय च नव्हता. याच्याकडे काही मागण्याचा , त्याने काही आर्थिक मदत करण्याचा प्रश्न नव्हताच.
संसार , जोडीदार यांनी खऱ्या अर्थाने तिला आयुष्यात अनेक धडे शिकविले. स्वतः खंबीर राहणे गरजेचे.
आपल्या मुलांना आपणच असतो . आणि पडणाऱ्या जबाबदाऱ्या या टाळता येत नाहीत ही शिकवण मिळाली आणि त्यात मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देत गेली a कारण पुढे सरकायचंय हे ध्येय होत. सगळ्या त्रासातून , दुःखातून आणि अशा आपल्यावर बांडगुळ झालेल्या नवऱ्या पेक्षा आपण स्वतंत्र राहणे योग्य असा निर्णय तिने घेतला. आणि मुलांच्या भवित्व्याकरिता आणि गृह शांतता राहण्याकरिता तिने सगळ्या गोष्टी हसत स्वीकारल्या ही आणि जे मागे सुटत गेले त्याला हसत निरोप ही दिला.
आयुष्य सुंदर आहे. प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही मागे सोडावे लागतेच. आणि निरोप देवून पुढे जाताना हसत मुख राहावे लागतेच .. तर च पुढे ज्या गोष्टी येतील त्याला धैर्याने तोंड देता येते. सकारात्मक राहता येते.
आपण अंतराळात रॉकेट सोडतो तेव्हा त्याचे काही भाग टप्प्या टप्प्याने सुटे होत जातात. आणि तेव्हाच ते रॉकेट खूप जास्त स्पीड ने पुढे जाते. जे भाग सुटे होत जातात ते ही तेव्हा गरजेचे असतात. पण जेव्हा रॉकेट यशस्वी रित्या अंतराळात जाते तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. त्यात यश , जीत असतें . विजय असतो. आनंद असतो.
आपल्या ही आयुष्यात अशा व्यक्ती , वस्तू , जागा येत असतात. ज्या आपल्याला अत्यंत प्रिय असतात. आपलेच लोकं कधी बदलतात. त्यांची मते बदलतात. त्यांच्या गरजा , प्रायोरिटी बदलतात. तर काहींना बदलावे लागते. काही ना काही कारणाने व्यक्ती , वस्तू , घर मागे सोडून पुढे जावे लागते.
कधी आयुष्यभर साथ देणारी व्यक्ती काही कारणाने साथ सोडणार हे समजते. तर परदेशी जाताना मुले आई वडिलांना ही सोडून पुढे जातात. पण इच्छा नसताना किंवा मिळणारी चांगली संधी याकरिता सगळ्यांना निरोप देवून हसत पुढे जावे लागते . तरच परदेशात त्यांना मिळणारी त्यांच्या योग्यता असते तशी , त्यांच्या दर्जाची संधी मिळतें.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

