महिलांनो, सर्वच पुरुष एकसारखे असतात, हे काही खरं नाही.
सौ. मिनल वरपे
स्त्री ही अनंतकाळची माता.. आज याच स्त्रियांसाठी स्त्री स्वातंत्र्य .. स्त्रियांचं होणारं शोषण आणि त्यासाठी आलेले विविध कायदे.. स्त्री सक्षमीकरण.. या सगळ्यांचा समावेश आजच्या कायद्यात आणि अर्थातच स्त्रीयांच्या रक्षणासाठी होतोय.
स्त्रियांचं खूप शोषण झालंय आजही काही ठिकाणी होत आहे.. स्त्रियांना अत्याचार सहन न करता त्याविरुद्ध उभ राहण्याची ताकद मिळाली ती स्त्री शिक्षणाने.. खरचं स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळायची आजही बऱ्याच ठिकाणी मिळतेच.
पण या सर्वात , पुरुष सगळे सारखे. ही मानसिकता कुठवर योग्य आहे. आपण अनेक साहित्यातून हेच ऐकत आहोत की पुरुषाचं वर्चस्व, पुरुषी मानसिकता, पुरुषांची मक्तेदारी आणि त्यावेळेस तस होत सुद्धा पण आजचा काळ बदलला आहे. आज एक स्त्री जर होणाऱ्या अत्याचाराला विरोध करते तर तिला सगळेच पुरुष विरोध करत नाही तर काही तीला साथ सुद्धा देतात.
स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे आणि यात आपण दोष देताना सहज म्हणतो की का फक्त पुरुषांनीच पुढे जायचं.. पण आपल्या हे लक्षात येत नाही प्रत्येक स्त्रीला जरी तिच्या नवऱ्याने साथ दिली नसली तरी तिच्या वडिलांनी, भावाने, मित्राने कुठेतरी पाठिंबा दीलाच असेल ना तेव्हाच ती एवढी हिम्मत करू शकली.
आज आपण सहज म्हणतो की स्त्री शिक्षणाला सुरवात करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना आपण खूप मानतो कारण त्यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनवते पण आपण हे कस विसरतो की ज्यांनी स्त्री शिक्षणाला सुरवात केली जगासमोर एक इतिहास घडवला त्याच स्त्री ला.. सावित्रीबाई फुले यांना पाठिंबा देणार दुसर कोणी नसून त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले हेच होते.
नेहमीच सगळे सारखे असतात असा लेबल लावून जे चांगले आहेत त्यांनासुद्धा कुठेतरी दुखावलं जाते.
जस प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या मागे एक स्त्री असते तसच प्रत्येक स्त्रीच्या यशाच्या मागे एक पुरुष असतो हे सुद्धा तेवढच खरं.
आज सुद्धा अन्याय अत्याचार होत आहेत.. स्त्रियांना पुढाकार दिला जात नाही, मारहाण केली जाते, कधी तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहिले जाते तर कधी बलात्कार होतो आणि हे सगळं नक्कीच साफ चुकीचं आहे पण हे जस आज कोणत्याच स्त्रीला ऐकायला आवडत नाही तसच बरेच पुरुषमंडळी सुद्धां आहेत ज्यांना अशा विकृतीची चीड आहे.
आज लग्न झाल्यानंतर सुद्धा एक स्त्री पुढचं शिक्षण घेतेय.. नोकरी करते हे तीच स्वातंत्र्य जपण्यासाठीच
पण तिला साथ देणारा हा तीचा नवरा सुद्धा असतोच. आपण दोघे सोबत काम करू , घरात असलेलं काम वाटून घेऊयात ही मानसिकता सुद्धा आज बऱ्याच पुरुषमंडळींची आहे.
आजच्या या लेखात फक्त हेच सांगण्याचा उद्देश आहे की एखादी व्यक्ती चुकीची वागली की सगळं जग चुकीचं आहे अस आपण ठरवू नये. ज्या पुरुषांना आपण आज टारगेट धरतोय त्यातील बरेच पुरुष हे स्त्रियांना तिचे हक्क मिळावेत, स्त्री ने तीच स्वातंत्र्य जपावं यासाठी झगडताना दिसतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


सौ.मीनल ताई, तुम्ही योग्य विषय मांडला. पण जसे सरसकट पुरुषांनाच दोषी, विकृत ठरविले जाते, कारण त्याला आधी पासून इतिहासाची किनार लाभलेली आहेच. जसे महाभारत, रामायण, भारतातील परकीय आक्रमणे इत्यादी. परंतु आताच्या अत्याधुनिक वेगवान तंत्र युगात काही महिला वर्ग असाही अस्तिवात येत आहे की, जे पुरुषांची परीक्षा टेस्ट घेत असतात.
जे साधे सरळ, निर्व्यसनी, निरासक्त, असतात ते अशा महिलांना लवकर बळी पडतात, किंबहुना त्यांना जास्तीत जास्त आकृष्ट करण्याचा प्रयत्न होत असतो. ही आजची २१ व्या शतकातील, प्रगत युगातील खूप छान सावली आहे, ज्याला काही मीडिया, माध्यमे, चॅनल्स जबाबदार नाहीत काय, जे दिवसरात्र प्रत्येक घरातील खरकटी भांडी घासण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत.