Skip to content

मनाला होत असलेला त्रास हा बहुतेकदा मनाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तींमुळेच होतो.

मनाला होत असलेला त्रास हा बहुतेकदा मनाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तींमुळेच होतो.


प्रीती लांडगे


हो खूपदा बघायला मिळते की आपल्या मनाच्या जवळ असलेल्या व्यक्तींमुळे दुखी होतो खूप त्रास सहन करतो. आपण खूप वेळा समोरच्याची मनापासून काळजी घेतो त्याला काय हव काय नको ते बघतो.

प्रत्येक वेळी त्यासाठी उपलब्ध असतो परंतु म्हणूनच तो माणूस आपला जास्त फायदा घेतो. किंवा आपल्या वेळेची त्याला कदर नसते आणि आपण त्याच्या प्रत्येक वेळेला आपण असतो कारण आपण मनापासून त्यांना आपल मानलेले असते.

आपण प्रामाणिक पणे आपली भुमिका बजावत असतो परंतु समोरचा फक्त चांगल वागण्याच नाटक करत असतो. आणि हे नात कोणत ही असू शकते. कोणत्यांना कोणत्या नात्यात एका जवळच्या व्यक्ती मुळे दूसरी व्यक्ती दुखावलेली असते. आणि दुर्दैवाने है त्या समोरच्याला कळत ही नाही.

तुमचा एक सॉरी समोरच्याला आनंद देऊ शकतो तो समोरचा झाले गेले विसरून जावून चांगल बोलू शकतो परंतु तो आपला जवळचा व्यक्ती तस म्हणत नाही आणि गुंता वाढतो. आधी ती व्यक्ती आपल्याशी खूप गोड बोलेन सतत आपल्याशी गप्पा मारतील अगली लाडाने सोनू, मोनू म्हणतील आणि कधी कधी पिल्लू म्हणून उल्लू सुध्दा बनवतील.

खरी गोष्ट काय आहे माहीती का जो आपल्याला दुख देतो किंवा फसवतो तो जेव्हा गोड बोलत असतो तेव्हा त्याला बरोबर माहीत असते की तो खोटे बोलत आहे. परंतु आपण त्या शब्दाच्या मृगजळात अडकतो आपल्याला ते खरे वाटते आणि नंतर जेव्हा आपल्याला कळते की हे सगळे खोटे होते तेव्हा आपण दुखी होतो.

आणि तेही आपल्या जवळच्या माणसामुळे. आणि हो परका माणूस, दूरचा माणूस आपल्याला का दुखी करेल ते तर आपल्याला धक्का लागला तरी सॉरी बोलता परंतु हीच जर जवळची व्यक्ती असेल तर क्षमा मागणार ही नाही लाखात एखादीच व्यक्तीच अशी सापडेल.

अहो अताचच बघा एखाद्या मुलगा आईला वडिलांना कती त्रास देतो. तो तर कीती जवळचा असतो रागाच्या भरात मुलगा आईवर कधी हात उचलतो तर आईला ढकलतो. आणि ती आई दुख किंवा वडिल दुखी होतात परंतु त्या मुलाला त्याचे काहीही वाटत नाही.

म्हणून तुम्ही ही दुखी झाल्यावर फार हाताश नका होऊ त्यावेळी तुम्ही तुमचा आनंद शोधा आणि त्या व्यक्तीला ही दाखवून द्या तुझ्या बोलण्याची काही गरज नाही कारण माझ्या जवळचा व्यक्ती मी स्वतःच आहे आणि मग बघा त्या दुखातुन तुम्ही कशा बाहेर येता ते दुख तुम्हाला दुख वाटत नाही तुमचा सोबती वाटते आणि अस दुख वाट्याला येणे सुध्दा काही वेळेस गरजेचे असते.

कारण यामुळेच किंवा या अनुभवामुळे तुम्हाला माणस कशी आहेत हे समजायला लागते. नंतर तुम्ही फार गुंतत नाही तुम्ही डिटैच होता हा खूप मोठा फायदा कारण तुम्ही थोडे जरी गुंतला तरी ते बांधते. म्हणून दुख हे तुम्हाला जगायला आणि लढायला शिकते म्हणून दुख आले म्हणून हताश होऊ नका. जेवढे जेवढे विखुरले जाल तेवढे निखराल मजबूत बनाल.

म्हणून जरी दुखी झालात आणि जवळच्या व्यक्तीने दुख दिले असेल तर त्याला क्षमा करा आणि पुढे जा आणि हो क्षमा करायची म्हणजे जाऊन त्याला मिठ्या नाही मारत बसायच्या क्षमा करून चार हात लाब राहून त्याच्याशी वागायचे त्याला पुन्हा आपल्याला दुखी करण्याची संधी द्याची नाही.

त्या दुखाला तुमची ढाल बनवा आणि आयुष्याच्या लढाईत हिंमतीने उतरा कारण (जिन्दींगी जिंन्दगी है सही तरी केसे जिवो तो जिन्दींगी ही वरणा वही जिंन्दगी उमरभर के लिऐ गंदगी है.)

तेव्हा हताश होऊ नका आणि मनाला तर कधीच खचू देऊ नका कितीही जवळच्या व्यक्तीचे बोलणे मनात आत जावू देऊ नका त्याला बाहेरच्या बाहेर उडून लावा अगदी फोर,सिक्स मारतात तसे उडवून लावा. त्याच काम दुख देणे आहे आपले सावरणे हे विसरू नका.

आपल्या मनाला आपला सारथी बनवा कारण कीतीही दुख देणारा जवळचा असला तरी हा सारथी तुम्हाला दुखी होऊ देणार नाही. आणि मग तुम्ही खर्या अर्थाने स्वार्थी बनाल म्हणजेच स्वार्थी होणे म्हणजे तुमच्या “स्व”ला धक्का लागू न देणे. प्रत्येक दुख वेदना पचवून पुढे जाणे. आणि कस आहे जेव्हा भावना संपते तेव्हा वेदना सुरू होते आणि वेदनेची संवेदना होते. म्हणून कधी कधी वेदना आपल्याला सहवेदना शिकवते. म्हणून “दुख तो अपना साथी हैं!” अस म्हणत असतील.

आणि मनाच्या जवळ ही तिच व्यक्ती असते जी मनमौजी असते. म्हणून तर ती आपल्या सोबत मनाला येईल तसे वागते त्याच तिला काही घेणे देणे नसते. आणि ते आपल्यासाठी देखील एक धडा असतो. तो आपण शिकला आणि त्यातून आवश्यक तो बोध घेतला तर आपल्या ज्ञानात भर पडेल आपला अनुभव वाढेल.

आणि माणसा माणसातील फरक समजू लागेल वा आपला त्रास हा आपण जास्त मनाला लावून घेतले तर ते दुख वाढते आणि आपण आपला रिंमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका तुमचा रिंमोट तुमच्या हातात ठेवा. आणि त्या दुखाला टाटा करा कतीही जवळची माणस दुख देवू द्या. त्या दुखाला मित्र बनवा. कारण तुच तुझ्या जिवनाचा शिल्पकार आहेस. आणि तस ही काही गोष्टी सोडून दिल्या की तिथल्या तिथे त्रास कमी होतो किंवा थांबतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “मनाला होत असलेला त्रास हा बहुतेकदा मनाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तींमुळेच होतो.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!