मनाने श्रीमंत असणाऱ्या लोकांच्या या काही खास सवयी तुम्हांला माहिती आहेत का?
सोनाली जे
पैशाने श्रीमंती तर असावीच पण त्या सोबत मनाची श्रीमंती असेल तर तुमचे व्यक्तिमत्त्व उठावदार तर दिसतेच पण संपूर्ण जगा पुढे तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व असता.
मी जेव्हा पुण्यात आले तेव्हा नोकरी आणि शिक्षण दोन्ही एकत्र सुरू होते. आणि खरेच मला जो बॉस मिळाला ना तो पैशाने तर श्रीमंत होताच पण मनाने ही खूप श्रीमंत होता. टाटा , अंबानी यांची असतील उदाहरणे पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असतेच तुम्ही कसे बघता , त्यातून ते समजते.
माझा बॉस अतिशय हुशार , पुण्यातल्या टॉप most architect मधला एक . अतिशय गरिबीतून पुढे आलेला त्यामुळे कष्ट , मेहनत आणि जिद्द, वेळ यांची खूप चांगली च ओळख असलेला.
मनाने श्रीमंत असलेल्या लोकांच्या काही खास सवयी असतात.
१. मनाचा मोठेपणा : असे समजू नका कुठे की लिखाण माझे माझ्या बॉस पाशी येवून थांबते. पण हे सगळ्याच मनाची श्रीमंती असलेल्या लोकात आहे. मी जेव्हा इंटरव्ह्यू करिता गेले तेव्हा दिलेली वेळ होती ५ ते ७. पण मी पुण्यात नवीन , त्यात गाडी नाही , अंतर जवळ नाही , बरं त्या वयात रिक्षा हा खर्च ही न परवडणारा त्यामुळे मला पोहचायला ७.३० वाजले. मनात पहिली पाल चुकचुकली. दिलेली वेळ ही नाही पाळू शकलो. इंटरव्ह्यू तरी घेतील का? पण दहा च मिनिटे बसायला लागले. मधले अधले कोणी ही नाही डायरेक्ट बॉस ची केबिन ..वेळ न घालविता. सुरू ही इंटरव्ह्यू. मीच माफी मागितली वेळेत नाही पोहचले . असू दे म्हणले आता आहेस ना समोर . विसरून जा ते.
मी सांगितले कॉलेज करून मी जॉब करू इच्छिते. Exam वेळी मला सुट्टी लागेल. ते म्हणाले असे लोक जिद्दी असतात. तू तुझे शिक्षण तुझ्या पायावर करणार आहेस तर मी नक्कीच मदत करेन .
ऑफिस टाईम होते १० ते ७ कॉलेज संपले की मी येईन ऑफिस असे ही सांगितले. सकाळी ७ ते ११ कॉलेज म्हणजे मी ११.३० पर्यंत येवू शकेन. पाहिजे तर मी जास्त वेळ थांबेन. मी ११.३० ते ८ येवू शकते ..तर त्यांनीच सांगितले माझे ऑफिस ९ पर्यंत असते पण तू ७.३० पर्यंत थांब.
दोन वर्षानंतर जेव्हा प्रॅक्टिकल सुरू झाली तेव्हा कॉलेज संपल्यावर प्रॅक्टिकल १२.३० ते २ असे . मी तेव्हाही सांगितले की मी जॉब करू शकत नाही , किंवा मी पार्ट टाइम येईन . .किती वाजता जमेल असे विचारले त्यांनी , मी सांगितले २.३० ते ७.३० ऐवजी मग मी आठ पर्यंत थांबेन म्हणले ते तयार ही झाले. आणि कुठे ही पगार ही कट नाही . परत त्यांनी माझ्या टायमिंग वरून कधी ही आक्षेप घेतला नाही, चिडचिड नाही. किंवा बडबड केली नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणाचा ना!!
२. मनाचा संकुचितपणा नव्हता कधी ही : किंवा bossing वृत्ती नव्हती कधी ही. ऑफिस काम चोख बाकी personal गोष्टी मध्ये कधी ही पडणार नाहीत. ऑफिस नंतर काय करता , अनेक जण ऑफिस वेळात त्यांची personal कामे , डिझाईन्स ही करत. पण त्यावरही कधी आक्षेप नाही घेतला . माझे दिलेले काम पूर्ण केलेत ना बास त्याकरिता कमी वेळात पूर्ण करून तुमचे काम करायचे का , जास्त वेळ ते तुमचे तुम्ही बघा. काम परफेक्ट पाहिजे आणि वेळेत बास एवढेच.
तुम्ही ऑफिस ला किती वाजता गेलात तरी ऑफिस मधून बाहेर पडताना तुमचे दिलेले किंवा नेमलेले काम पूर्ण करून बाहेर पडायचे, त्या तुमच्या वेळात तुम्ही किती ही टाईम पास करा , थोडा बदल म्हणून गप्पा मारा , ऑफिस टेरेस मस्त होती , गार्डन ही होती , तिथे जावून फ्रेश व्हा , वॉक करा , तुमचे फोन करा किंवा मला तर अभ्यास ही करायची permission होती. खा प्या .. मोकळेपणाने काम करा. हे तुम्ही हसत खेळत तुमचे काम पूर्ण करायचे . बाकी तुमच्या गोष्टी मध्ये कधी ही ढवळाढवळ करणार नाही .
३. Maturity : एखादे दिवशी आजारपणं किंवा काही personal कामामुळे कोणी येवू शकले नाही तरी मी बॉस म्हणून ओरडणार असे कुठे नव्हते अनुभव आणि मनाची maturity आली होती. की छोट्या गोष्टीत वेळ आणि energy घालवणार नाही.
काम परफेक्ट होण्याकरिता ओरडायचे ही तसेच आणि तो perfectness पाहिजेच यावर ठाम ..पण ओरडले तरी ते त्या क्षणा पुरते असे. पुढे काय पुढच्या क्षणला ते परत नॉर्मल असतं. तीच गोष्ट मनात धरून , तू आली नाहीस कामाला , तू आला नाहीस , हे सोडून , देत.
कामावरून ओरडले तरी ते उगीचच लक्षात ठेवून खुन्नस धरायची असे कुठेच नव्हते. विसरून जायचे त्याक्षणी आणि पुढे जायचे. ही त्यांच्या मनाची maturity होती.
४. Transperancy :
ज्या क्षणी जे असेल ते स्पष्ट बोलून रिकामे होणार. आणि जे काम असेल ते क्लिअर ..सगळ्यांना माहिती असे. त्यात कुठे लपावलापवी नसे. कोणाला काय दिले काम इथपासून अगदी पैशाचे व्यवहार ही सगळे क्लिअर .कधी ही कोणी ही कोणाला विचारले तरी सगळे transperant व्यवहार.
५. इगो नव्हता .
मी एवढा मोठा , बॉस म्हणून मी खुर्ची वर बसून राहणार असे कुठे ही नव्हते. अगदी परगावी साईट वर जावून आले तरी ऑफिस मध्ये येत. आले की पहिले डिझायनर सेक्शन ला जात , प्रत्येक डिझायनर ला दिलेले काम बघत , त्यात सुधारणा सुचवत, उद्या काय काम करायचे personally सांगत आणि नेमून दिलेल्या कामांची लिस्ट नाव आणि कामे ही sudio मध्ये लावत. कोणाला काय अडचणी समजून घेवून मार्गदर्शन करत. मी मोठा , माझ्याकडे तुम्ही कामाला , तुमचे तुम्ही बघा कसे करायचे हे कुठेही इगो नाही आणि personally मदत आणि guidance करत.
६. प्रत्येकाचा respect करत :
प्रत्येकाने स्वाभिमान जपावा , माझ्याकडे काम करता म्हणजे तुम्ही माझे नोकर असे कधी वृत्ती नव्हती , तुम्ही माझ्याकडे काम करता म्हणजे तुमचा स्वाभिमान , शिक्षण डोके माझ्याकडे गहाण टाकावे असे कुठेही नव्हते.
जरी बॉस म्हणून एखादी गोष्ट त्यांनी सांगितली आणि आपण suggest केले , सुरुवातीला पटले नाही त्यांना तर argue केले , योग्य रीतीने पटवून दिले तर ते नक्कीच त्याचा respect ही करत. आणि तसे बदल करण्यास permission ही देत.
मी सांगतो तसेच व्हायला पाहिजे असे असतं असे पण जर सुचविले तर ते स्वीकारण्याची तयारी ही असे.
७. मी मोठा , बॉस म्हणून कधी कोणाला तुच्छ लेखत नसत.
बॉस म्हणून इतरांना तुच्छ लेखत नसत. कित्येकदा स्टाफ सोबत हसत खेळत , चेष्टा मस्करी करत, अगदी दुपारचा चहा सर्वांच्या सोबत घेत . मी तुमच्या पेक्षा कोणी वेगळा आहे. तुम्ही तुच्छ अशी कधीच वागणूक नसे.
८. वर्षातून एकदा बाहेर जेवण , gifts देवून encourage करत.
ऑफिस व्यतिरिक्त थोडे interaction सगळ्या स्टाफ मध्ये व्हावे त्यात ही कोणी श्रेष्ठ कनिष्ठ , मग अनुभव असेल , पगार असेल असे नको , एकमेकांमध्ये ही attachment , healthy competition असावी म्हणून एकमेकांची डिझाईन्स , त्यांची personal site’s याविषयी ही मनमोकळेपणे चर्चा करून एकमेकात द्वेष चुकून असेल तर तो दूर करून healthy competition करिता आणि कधी वेळ पडली तर टीम work , एकमेकांची मदत घेण्याविषयी प्रोत्साहन च देत.
कुठे ही परदेशी गेले की प्रत्येक स्टाफ member karita tyanchi गरज , आवड लक्षात घेवून गिफ्ट घेवून येत. त्यांचे तिथले अनुभव शेअर करत. ज्यातून सर्वांना त्याचा उपयोग च होईल. आणि एक बाँड , attachment निर्माण होईल.
९ . स्टाफ ला जशी नोकरी ची गरज , अनुभवाची , मार्गदर्शनाची गरज तसे त्यांनाही प्रत्येक member ची गरज आहे हे दर्शवत :
एखादी गोष्ट किती ही वेळा विचारा राग येत नसे : एखादी गोष्ट जमत नसेल तर किती ही वेळा विचारा ते मार्गदर्शन करत.
उलट त्यांचे असे असे की जो स्टाफ त्यांनी घडविला आहे.
त्यांना मार्गदर्शन करणे सोपे याउलट जर हे सोडून गेले तर परत नवीन लोकांना शिकविणे , एक मेकांना समजून घेणे, कामाची पद्धत शिकविणे अवघड म्हणण्यापेक्षा परत श्रीगणेशा .त्यापेक्षा आहे तो स्टाफ टिकविण्याची वृत्ती होती. गरज मलाही आहे जशी तुम्हाला आहे तशी ..हेच त्यातून व्यक्त करत.
१०. सतत नाविन्याचा ध्यास आणि जिद्द , creativity आपल्या सोबत सगळ्यांनाच उत्साही ठेवण्याचा हेतू .
११. Appreciate करण्याची वृत्ती : गरज पडेल तेव्हा पैशाने ही मदत किंवा प्रोत्साहन देवून.. आमच्याच ऑफिस मधल्या डिझायनर ने नवीन course करून प्रावीण्य मिळविले तर सरांनी स्वतः पेढे मागविले आणि सगळ्यांना वाटण्यास सांगितले. म्हणजे प्रत्येकाला प्रोत्साहन , आणि प्रेरणा देत.
१२. Balance mind : काही ही झाले तरी मनाचा , शब्दांचा तोल ढळू देत नव्हते. कोणतीही व्यक्ती आपल्यामुळे दुखावली जावू नये आणि ऑफिस सोडून जावू नये. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधी ही कोणाला ऑफिस मधून आपणहून काढून टाकले नाही जे ते त्यांच्या इच्छेने सोडून गेले.
१३. दुसऱ्यांचे विचार करण्याची क्षमता : ऑफिस मधल्या स्टाफ ची गरज लक्षात घेवून सोयी सुविधा.. रोज ऑफिस ला गेलात की टेबल बरं पहिले पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप हजर असे. कोणी ही कोणत्या वेळात या ..त्यांची ही basic गरज समजून तशा instructions दिलेल्या असतं. शिवाय फ्रिज , microwave , filter water हे तर होतेच.
पण स्टाफ ने उत्साहाने काम करावे फ्रेश मूड नी म्हणून.Ac. सारख्या सुविधा जे अगदी सुरुवातीला त्यांच्या स्वतः करिता त्यांच्या केबिन मध्ये ही नव्हती पण स्टाफ चा विचार .
१४. साइट visit करिता पेट्रोल expenses , food expenses हे तर देतच
१५.वेळेचे नियोजन : स्टाफ असो किंवा नवीन प्रॉडक्ट घेवून कोणी आलेला असो , client कोणाचे फोन किंवा कोणाला कधी टाळले नाही.
Client चे साईट वरचे डिझाईन काम पूर्ण झाले नसेल सुरू असेल तरी client चे फोन कधी टाळले नाहीत किंवा जे आहे ते स्पष्ट सांगून कधी इतरांनाही रागवण्याची , चिडचिड करण्याची संधी दिली नाही.
किती ही बिझी असतील तरी वेळेचे योग्य नियोजन यामुळे कधी ही इतरांची मानसिकता ही बिघडू दिली नाही.
१६. माणुसकी :
प्रत्येक माणसाला माणूस म्हणून वागविले. कधी ही त्यांच्यात मतभेद नाही. मग तो अगदी fabricator असो , किंवा carpenter त्या ला मान देवून , मोकळेपणाने बोलून , काम ड्रॉइंग स्वतः समजून देत.तसे client असो किंवा स्टाफ सगळ्यांच्या सोबत माणुसकी ठेवून वागत.
१७ . वेळेचे punctual .. दिलेली वेळ पाळणार म्हणजे पाळणार आपल्या मुळे कोणाला त्रास नको , चिडचिड नको कोणची मानसिकता बिघडायला नको , उन , वारा, पावूस असो , वेळेचे punctual होते.
१८ . नवीन गोष्टी शिकणे , आत्मसात करणे , शिकविणे , ट्रेनिंग देणे , motivational videos किंवा सेमिनार organize करणे , काही competition ठेवणे ज्या मधून काम करणाऱ्या लोकांमध्ये नावीन्य , चैतन्य निर्माण होईल आणि त्यातून बक्षीस ही .. काही achievements ही . जी पुढे काम करण्यास अजून motivate करतील. विविध स्तरातील लोकांबरोबर चर्चा करणे यातून विचारांची सकारात्मक देवाणघेवाण आणि प्रगती मग स्वतः ची , कंपनी ची किंवा नोकरदार व्यक्तींची ही . प्रगती हाच उद्देश , हेतू , इच्छा.
१९ down to earth : मी बॉस म्हणजे मी वेगळा कोणी अशी मनोवृत्ती नव्हती ..मीही तुमच्यातला च एक अशी वागणूक आणि वृत्ती ही आणि इतरांना ही तशीच वागणूक . सोयी सुध्धा..ज्या कप मधून स्टाफ करिता चहा असे त्याच कप मधून तेही चहा पीत. वेगळे नव्हते काही.
कोणत्या च गोष्टीचा माज नसे.
२० वेळप्रसंगी इतरांना मदत करण्याची वृत्ती .. पैसे असोत किंवा इतर कोणती मदत ते कधी ही हात आणि मन आखड ते घेत नसत.
असे मनाची श्रीमंती असणारे अनेक लोक आहेत त्यांच्या ही अनेक सवयी असतील अनेक कंपन्या , छोट्या मोठ्या . टाटा मोठ्या कंपनी वाले , अंबानी असतील माहिती आहेतच आपल्या सगळ्यांना आता covid मध्ये work from home देवून त्यांनी आपल्या staff ची काळजी आहे हा मनाचा मोठेपणा च आणि काळजी ही दाखविली ना..
मी असा आहे , मी तसा आहे , मी हे केले , स्वतः ची फुशारकी न मारता माझ्या यशात माझ्या लोकांचा वाटा आहे , मदत आहे त्यांच्यामुळे मी यशस्वी आहे हे इतरांनाही श्रेय देणे हा मनाचा मोठेपणा आणि इतरांची काळजी आणि इतरांना ही महत्व दिल्यासारखे च ना!!
मनाने श्रीमंत असणाऱ्या लोकांच्या या काही खास सवयी सांगितल्या आहेत तुम्हाला ही माहिती असतीलच . इथे सगळेच मांडणे शक्य नाही. खूप मोठा विषय आहे हा ही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


