मनाने आपण स्वतंत्र केव्हा होणार ??
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इतिहास घडला. आपली भारत माता स्वतंत्र झाली. तेथूनच एका नव्या युगाला सुरुवात झाली. विविधतेने नटलेल्या लोकांच्या भावनांचा सन्मान म्हणून भाषावार प्रांत रचना करण्यात आली.
त्यानंतर अनेक युद्ध, जातीय व धार्मिक दंगली या भारत मातेने सोसल्या व अजूनही सोसत आहे. तसेच अनेक नवनवीन उपक्रम अनेक दिग्गजांकडून भारत मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले. जगाला हेवा वाटेल अशा स्तुत्य गोष्टी घडताना दिसू लागल्या. अनेक हालअपेष्टा, संघर्ष, मरण, यातना अंगावर झेलून आजच्या भारतमातेची रचना आपण अनुभवत आहोत.
आजचा लेख हा प्रत्येक भारतीय नागरिकांच्या चौकटीबद्ध मानसिकतेवर प्रकाश टाकणारा आहे.
चला तर मग पुढे वाचूया….
आपल्या मनाची स्वतंत्रता (प्रसन्नता) म्हणजेच खऱ्या अर्थाने भारतमातेची स्वतंत्रता इतक्या साद्धा-सोप्या गणितावर आज आपण भाष्य करूया.
खालील काही वाक्य आपल्याला आठवन करून द्याव्याशा वाटतात, ज्या आपल्या चौकटीबद्ध मानसिकतेचे प्रत्यक्ष दर्शन घडवतात…
● माझ्या नशिबात जे लिहिलंय तेच घडणार…
● मी कितीही प्रयत्न केला, तरी निराशाच पदरी पडणार..
● लोकांच्या मरण्यापेक्षा माझी लाईफस्टाईल जास्त महत्वाची..
● घराचा दरवाजा ओलांडला की मी व्यावहारिकच वागणार…
● लोकं जगो की मरो, माझं कुटुंब सुखरूप आहे ना, याचाच विचार मी जास्त करणार…
● एखाद्या प्रसंगी मदत म्हणून मी पैसे देईन, पण वेळ नाही…
● मुलाला / मुलीला जग किती स्वार्थी आहे, याचे उठसुठ धडे देणार आणि बाहेर मुखवट्यासारखं वागणार…
● दुसरा माझ्यापुढे जाऊ नये, म्हणून राजकारण खेळणार…
● देशाच्या तीव्र भावना अफवांमार्फत सोशल मीडियावरच व्यक्त करणार…
● कोणी सत्य व खरेपणाची बाजू मांडत असल्यास त्याचा आवाज दाबणार…
● गरिबांकडून खरेदी करताना तोलून-मापून भाव आणि अलिशान मॉलमध्ये GST सकट शिस्तीत रक्कम भरणार…
● स्वतःच्या सुख-सोयी बाजूला सारून मुलांच्या भविष्याची चिंता करून आत्ताच त्यांच्या बँक बॅलन्ससाठी धडपडणार…
● बाहेरची स्त्री मुक्त, पण घरातली नकोय असा पुरुषार्थ बाळगणार..
● बाहेरचा पुरुष मेहनती व कौटुंबिक वेळ देणारा आणि घरातला निर्दय, सर्व सोडून दिलेला…
● अगदीच निराशा सहन झाली नाही, तर मी आत्महत्या करणार…
अशा आणखीन असंख्य गोष्टींचं भूत मनाशी बाळगून आपण चौकटीबद्ध आयुष्य जगतोय व इतरांनाही जगण्याची जबरदस्ती करतोय. आपल्या मूलभूत गरजांव्यतिरिक्त अनावश्यक-अनाठायी गोष्टींचा अतिरेक करतोय.
यातनं होतंय काय, की आपलं मन, आपली बुद्धिमत्ता, आपला मेंदू किंवा आपली विचार करण्याची पद्धत ही संकुचित वृत्तिकडे झुकली आहे आणि ती आपल्याला कोणत्या दिशेकडे घेऊन जाईल हे ओळखणं खूप सोपं आहे.
असेच कायम राहू तर जसे भारत, पाकिस्तान, अमेरीका, श्रीलंका, जपान ई. ना आपण वेगळं-वेगळं ‘देश’ म्हणून ओळखतो अगदी तसंच एकमेकांना ‘द्वेष’ म्हणून ओळखू.
आपणच मनाने जर स्वतंत्र नसू (प्रसन्न) तर आपली भारत माता कशी काय स्वतंत्र असेल आणि राहील……
आणि आपण जसं वागतोय त्याचंच अनुकरण आपली मुलं करणार, हा नैसर्गिक नियम !!!
म्हणून अगोदर आपलं मन प्रसन्न असेल तर ते स्वप्न पाहिल मोठी, जे सदैव भारत मातेच्या चरणीच अर्पिले जाईल….
भारत माता की जय हो.. ??????
दैनंदिन जीवनाला त्रासले आहात का ?
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
