Skip to content

भावनिक असण्यापेक्षा काही प्रमाणात निर्लज्ज असावं, माणसांचा त्रास कमी होईल.

भावनिक असण्यापेक्षा काही प्रमाणात निर्लज्ज असावं, माणसांचा त्रास कमी होईल.


आकांक्षा किरणराव आळणे

लातूर.


किती अवघड वाटतं ना आयुष्य कधी-कधी.एकदम अशक्य वाटत जगणं.खूप सारी negativity,खूप सारे negative vibes आपल्याला जाणवतात इतरांकडून पण त्यांचे judgements आपण स्वीकारायचे की नाही हे आपल्या हातात असतं ना मित्रांनो..!!!
आज आपण थोडं निर्लज्ज कसे बनायचे हे बघणार आहोत अर्थात healthy way मध्ये स्वतःचे emotional balance बिघडू नये म्हणून थोडे निर्लज्ज व्हायला काही हरकत नाही.

एकदम बेसिक विचार आपण करूयात.जगामध्ये किती काही-काही घडत असते चांगले-वाईट म्हणजे टेन्शन घायचे असे ठरवले तर खुप scope आहे आणि होते देखील तसेच आपण खरच किती tension घेतो.बर खरं पाहता tension घेण्यासारख्या गोष्टी एकीकडेच राहतात पण आपण उदास होण्याचे कारण असे की एबी इतरांच्या मतांना,इतरांच्या judgements ला खूप महत्त्व देतो.

अमुक-अमुक मला असा का म्हटला.अमुक ने मला criticise का केले इथपासून ते चांगला पोशाख परिधान करून बाहेर गेलो पण माझी स्तुती का कोणी केली नाही ह्या validation पर्यंत इतके महत्त्व देतो आपण इतरांच्या मतांना.आवश्यक आहे का इतके importance देणं??खरच आवश्यकता नाहीये.आपण पूर्णतः कसे आहोत ते प्रत्येकाला माहिती असते.राहिली गोष्ट भौतिक गोष्टींची म्हणजे एखादी वस्तू,पोशाख,गाडी,घर ह्यांच्या स्तुतीची तर इथे neutral mindset ठेवायला हवा.स्तुती केली तरी चांगले आणि नाही केले तरी no hard feelings…!!

आता specific बघूयात-काही व्यक्ती फार वेगळी असतात.Out Of The Box.म्हणजे एका सामाजिक चौकटीत न बसणारे.काहीतरी वेगळं करू पाहणारे.थोडक्यात प्रवाहाच्या उलट्या दिशेने चालणारे.अशे लोकं खरे पाहता खूप courageous असतात.कारण comman path follow न करता वेगळे काही करणे ही खरीच मोठी बाब आहे.

अश्या लोकांनी emotionally खूप strong असायला पाहिजे.कारण सामाजिक खूप होऊ शकतो.भारतीयांमध्ये appreciate करणं हा गुणधर्म आधीच lacking आहे.त्यात असे सर्वांचा विरोध पत्करून वेगळे काहीतरी करणे म्हणजे सामाजिक बंड पुकारण्यापेक्षा काही कमी नाही.सांगायचा मुद्दा असा की एकतर एवढा विरोध आणि त्यातल्यात्यात emotionally weak असल्यास अश्या व्यक्तींना खूप त्रास होऊ शकतो.

आपल्याला मुळात त्रास होतो कशाचा??तर भावना दुखावल्या जातात म्हणून.भावनाशून्य बनने तसे तर अवघडच आहे कारण आपण मानव आहोत रोबोट नाहीत त्यामुळे भावना असणारच.त्यामुळे भावनाशून्य तर नाही पण कमीत कमी आपण थोडे निर्लज्ज आणि बिनधास्त तरी बनायला पाहिजे.

लोकं बोलतात,कोसतात म्हणून जो self doubt निर्माण होतात न त्यामुळे inferiority complex वाढीस लागतो आणि त्याचा पूर्ण परिणाम आंतरीक रित्या subconscious mind वर होते आणि बाह्यरूपात तो आपल्या personality मध्ये ही दिसायला लागतो.त्यामुळे नेहमीच emotionally विचार नाही करायचा,प्रॅक्टिकल राहायचं,थोडं निर्लज्ज व्हायचं पण आपलं आयुष्य सुखात जगायचं.

प्रत्येक गोष्ट,प्रत्येक घटनेचे realtion जर आपण emotions सोबत जोडत राहू तर emotionally खूप disturb होत राहू.काही प्रसंग,काही घटना घडून गेलेल्या असतात पण तरीही त्या आपल्याला present moment ला त्रास देतात.कारण आपण त्या प्रसंगांना तटस्थपणे बघत नाही,सोडून देत नाही,move on करत नाही.तर आपण अजूनही त्या अनुभवाला घट्टपणे मनाशी बिलगलेले असते म्हणून एवढा त्रास होत असतो.

पाणी मुठीत धरण्याचा प्रयत्न केला तर ते मुठीत च राहते का??नाही ना??तसेच कटू अनुभव,कटू प्रसंग ह्यांना आपल्या मनाच्या मूठीतून हळुवार निसटू द्यायचे,धरून ठेवण्याचा अट्टाहास बिलकुल करायचा नाही.शांतपणे,हळुवारपणे दुःख कुठल्या कुठे पळून गेले हे आपल्याला कळणार पण नाही.ह्यालाच म्हणतात self-management..!!

आपण असे केले तर कोण काय बोलेल,ह्याला काय वाटेल,त्याला काय वाटेल हा विचार करणं कमी करा.सुनो तो बस अपने दिल की और निकल पडो अपनी जिंदगी के सफर पे क्योकी-सफर खूबसुरत है मंजिल से भी..!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “भावनिक असण्यापेक्षा काही प्रमाणात निर्लज्ज असावं, माणसांचा त्रास कमी होईल.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!