भावना व्यक्त करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर अशी मात करा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपलं आयुष्य सुरळीत जगण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपली बुद्धिमत्ता, आपलं शिक्षण त्यातून मिळालेलं स्थान ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण भूमिका निभावतात अस काही खूप वर्ष मानलं होत होत. त्यादृष्टीने मुलांसाठी चाचण्या बनवल्या जात. ज्या त्यांचं शैक्षणिक भविष्य वर्तवत होत्या. पण नंतरच्या अनेक संशोधनानंतर हे समजून आले की मानवी आयुष्यात बुद्धिमत्तेइतकीच भावना देखील महत्त्वाची आहे. त्यातूनच भावनिक बुद्धिमत्ता उदयास आली. ज्यावर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले. पुस्तक लिहिली ज्यात अगदी वर नाव येत ते म्हणजे Daniel golman यांचं. त्यांचं इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. ज्यात त्यांनी भावनांच जैविक स्वरूप इथपासून प्रत्येक भावनेत असणारा फरक इथपर्यंत सर्व सखोलपणे लिहिलं आहे.
आपण रोजच्या जीवनात वावरताना वेगवेगळ्या भावना व्यक्त करत असतो. त्याची जाणीव आपल्याला होत असते. अगदी आपण म्हणतो देखील मला ना खूप भीती वाटते, माझा राग राग होतोय, I feel jealous. आपापल्या पद्धतीने माणूस त्याला जे वाटेल ते सांगत असतो किंवा त्याची जाणीव त्याला होत असते. तरीही अस का होत की आपल्याला जाणवत एक असत आणि आपण react वेगळ्या पद्धतीने होतो. बरेचदा आपल्याला जे फील होत ते शब्दात नीट सांगता देखील येत नाही. ज्यातून परत आपली चिडचिड होते. कारण समोरच्याला काही समजत नसत.
आणि आपण इतका प्रयत्न करतोय तरी व्यक्ती समजून घेत नाही म्हणून आपल्याला त्रास होतो. अनेक लोक तर आपल्याला भावना शून्य वाटत, कोरडे वाटतात. अश्या लोकांच्या बाबतीत म्हटल जात की समोरचा मेला तरी यांना काही वाटणार नाही. खरच समोरच्या माणसाला भावना नसतात का? खरच तो भावना शून्य असतो का?जवळच्या नात्यात जेव्हा वाद होतात, गैरसमज होतात त्याच्या मुळाशी एक बोलण असतच ते म्हणजे एकतर मला काय सांगायचं आहे ते याला/हिला समजत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर कशीही रिअँक्शन असते आणि मला समजून घेतलं जात नाही. मानवी जीवनातील, नातेसंबंध यातलं भावनांच महत्त्व इथे समजून येईल. खरच व्यक्ती भावनाशून्य असते का? खरच तिला जाणीव नसते का? तर अस नाही. प्रत्येक व्यक्तीला भावना या जाणवत असतात. कारण तशी रचना आपल्या मेंदूमध्ये आहे. समस्या निर्माण होते ती त्या भावना व्यक्त करण्यामध्ये, त्यांचं नियोजन करण्यामध्ये.
फक्त नातेसंबंध नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात भावना मोठी भूमिका निभावतात. अनेक मुल शालेय जीवनात चांगले मार्क पाडतात, नेहमी पहिली येतात, पण इतर कोणत्या अॅक्टिविटी असतील, कोणासमोर जाऊन बोलायचे असेल, किंवा शिक्षण संपल्यावर बाहेरच्या जगात, व्यवहारी जगात वावरताना त्यांना अडचणी येतात तिथे त्यांना हवं तास यश मिळत नाही. याउलट अभ्यासात जी मुल जेमतेम असतात ती बऱ्याचदा व्यवहारिक जगात चांगलं यश संपादन करतात. याच कारण आहे भावनिक बुद्धिमत्ता.
आणि म्हणून जेव्हा आपण अस म्हणतो की मला जाणीव होते आहे पण मला ती नीट सांगता येत नाही, किंवा मला आता काय वाटत मला स्वतःला समजत नाही.
अनेकदा वाईट वाटलेल असत आणि सांगताना मात्र किंवा व्यक्त होताना मात्र राग येतो. चिंता वाटत असताना मला खूप भीती वाटत आहे अस लोक म्हणतात आणि त्यातून मग रिएक्शन पण तशाच येतात. इथे काय कमी पडलेलं असत तर ती भावनिक बुद्धिमत्ता. म्हणूनच जर भावना योग्य प्रकारे व्यक्त करायच्या असतील, त्याच्यावर मात करायची असेल तर आपण आपली भावनिक बुद्धिमत्ता विकसित केली पाहिजे. ती कशी करणार? तर त्याचे काही टप्पे आहेत.
१. स्वतःच्या भावना समजून घेणे: आत्म जाणिवेमधला हा महत्त्वाचा भाग आहे. मला आता काय वाटत आहे? मी आता काय फील करत आहे यावर बारकाईने लक्ष देणे. यालाच सेल्फ मॉनिटरिंग अस म्हणतात. यासाठी आपल्याला प्रत्येक भावना कधी येते हे माहीत पाहिजे. आपण इर्षेला पण रागाचं रूप देतो, मत्सराला पण रागाचं रूप देतो, चिंता पण एक आणि भीती पण एक, वाईट आणि hurt यातला फरकच आपल्याला माहीत नसतो. आनंदी आणि उत्साह या दोन्ही गोष्टी आपल्याला एकसारख्या वाटतात. बरेचदा तुला कोणती भावना जाणवत आहे अस विचारल्यावर मला वाटत मी नापास होणार असा विचार सांगितला जातो. म्हणजेच भावना आणि विचार यामध्ये पण काही फरक आहे याची माहिती नसते. तसच या प्रत्येक भावना जरी वाटत सारख्या असल्या तरी त्यात खूप फरक आहे. हा फरक समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला आता काय जाणवत आहे.
२. भावना योग्य पद्धतीने हाताळणे: भावना योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाही, समजत नाही याचं कारण म्हणजे त्या समजत नाही आणि त्यांचं योग्य नियोजन करता येत नाही. म्हणूनच अतितीव्र होणाऱ्या भावना आणि खूप कमी प्रमाणात व्यक्त होणाऱ्या भावना यांचं योग्य प्रकारे नियोजन करता आलं पाहिजे. राग अनावर होतो, चिंतेने हात पाय कापतात, हर्ष वायू होतो. कशाने? तर नियोजन न केल्याने. आता हे नियोजन करायचे असेल तर वैचारिक पातळीवर करावे लागते. कारण विचारांचा परिणाम आपल्या भावनांवर होत असतो. म्हणून भावना योग्य प्रकारे हाताळण्यासाठी विचार योग्य प्रकारे बदलेल पाहिजेत. उदा. मी गाडी चालवली तर accident होणारच असे वाटून चिंता येते. त्यातून गाडी व्यक्ती चालवत नाही. इथे खरच अस झालंय का? की हे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत असा विचार केला तर आपली अति चिंता आटोक्यात येऊन तिथे आपल्याला फार फार तर काळजी वाटेल जी गरजेची असते आणि ती काळजी घेऊन आपण गाडी चालवू.
३. इतरांच्या भावना समजून घेणे: समानुभुती, empathy. सम + अनुभूती म्हणजेच काय तर समोरची व्यक्ती आता काय फील करत असेल हे त्याच्या पातळीवर जाऊन फील करणे. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांनी जग पाहणे. त्याला काय वाटतं आहे हे त्याच्या पातळीवर समजून घेणे आणि इतकंच नाही तर अश्या प्रसंगातून आपण कसा मार्ग काढाल असता हे समजून घेऊन त्याला मदत करणे. नातेसंबंधांमध्ये ही खूप गरजेची आहे. समोरच्या माणसाच सुख दुःख समजून घ्यायचं असेल तर आपण तिथे असावं लागत. तर आपण चांगल्या पद्धतीने नाती बनवू शकतो. इतरांना मदत करू शकतो. आपल्याला एखादी गोष्ट शुल्लक वाटते पण त्या व्यक्तीसाठी ती खूप महत्त्वाची असते. अश्यावेळी जर आपण empathetic असलो तरच त्याच दुःख समजू शकत. म्हणून भावनिक बुद्धिमत्ता विकसित करायची असेल तर आपल्याला empathetic होता आलं पाहिजे.
या गोष्टी आपल्याला नीट जमल्या तर आपण स्वतःला अडचणीचा प्रसंगी प्रेरित करू शकतो, सामाजिक जीवनात चांगले कार्य करू शकतो. अनोळखी लोकांशी पण सहजतेने वावरू शकतो तसेच नवीन ठिकाणी, सामाजिक जगात चांगल्या पद्धतीने वावरू शकतो. अश्या पद्धतीने भावनिक बुद्धिमत्ता विकसित करून भावनाविषयक ज्या काही अडचणी आहेत त्यावर मात करू शकतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
