Skip to content

भावनांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर ही आयडियाची कल्पना वापरून पहा!

भावनांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर ही आयडियाची कल्पना वापरून पहा!


मधुरा धायगुडे


सहजच मालिका बघत होते बघत बघता मालिकेतील ते पात्र नकळत भावत गेलेले त्याचा तो अभिनय मनाला भिडणारा वाटला मनात ते पात्र निभावणारा नट नटी आवडयला लागते..सहजच विचार आल असे का होते आपण त्यात इतके आधीन होतो त्यचे कौतुक करतो खरतर ती एक व्यक्ती रेखा तो कलाकार आपले सगळे विसरुन साकारत असतो मनात घर करुन जातो.

आपल्या दैनंदिन जीवनातही इतरांच्या भूमिकेत शिरून त्यांची बाजू व जग समजून घेण्याची वेळ आपल्यावर बऱ्याचदा येते. भूमिकेत शिरण्याची ही प्रक्रिया नटापेक्षा किंचित वेगळी असली तरी नाते हिट् होण्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे.पण तसे होत नाही कधी कधी एखाद्या नात्यात आपल्या ला कटू अनुभव rejection ही स्वीकारावे लागते. इथे सहानुभूती नव्हे तर सह-अनुभूतीची दाखवली तर सहज होते.मग सह-अनुभूती (empathy)आणि भावनिक सहानूभूती (sympathy)यात नक्कीच फरक तो समजला गेला तर हे बंध बळकटी आणतात.

सह-अनुभूती मधे स्वत:ला समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत टाकणे म्हणजे सह-अनुभूती (empathy)! या प्रक्रियेत समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरून तिच्या भावना समजून घेणे व अनुभवणे समोरच्या व्यक्ती च्या जगण्याचा अर्थ लावू पहाणे म्हणजे सह-अनुभूती . मग यासाठी हवा निर्मळ संवाद व्यक्ती बद्दल ची सर्व माहिती एखाद्या व्यक्तीची भूमिका समजून घेण्यासाठी तिच्याबद्दल आपल्याला निदान जुजबी माहिती असणे उपयुक्त ठरते.

ती व्यक्ती कशी आहे, काय करते आहे व काय करू पाहते आहे, हे ज्ञात असल्यास सह-अनुभूती दर्शवणे सुलभ होऊ शकते.यात दृष्टिकोन समजून घेवून एखाद्या च्या भावविश्वाशी एकरुप होवून जाता येते ती सह-अनुभूती जी मालिकेतले एखाद्या पात्राशी आपण आपलेच प्रतिबिंब बघत आपलेच जगणे बघतो अन् स्वतःच स्वतःची सहानूभूती मिळवतो.

मग सहानूभूतीमधे दृष्टिकोन फक्त आपलाच आसतो यात माया करुणा प्रेम मिळावे ही गरज असते त्या त्या वेळची जी इतरांकडून मिळावी अशी भावना असते यात दुसऱ्या चे भावविश्व न बघता स्वतः पुरताच विचार होतो खरा.सह-अनुभूती आणि सहानूभूती या एकाच पठडीतल्या म्हणता येतात तुम्ही त्याचा कुठे कस केव्हा वापर करता हे महत्वाचे एखाद्या ला सहानूभूती देताना सह-अनूभूतीही होण गरजेच यात दृष्टिकोन भावविश्व समजून घेवून एकरुप होणं महत्त्वाचे ही सह-अनुभूती समोरच्या व्यक्तीची भावना, स्थिती अचूक ओळखणे, त्या स्थितीशी तादात्म्यता वाटणे आणि ती भावना,स्थिती नकारात्मक असल्यास तिच्याप्रती आस्था, काळजी दर्शविणे.ही सहानूभूती.

सह-आनुभूती ही सवयीने दर्शवली जाते एक प्रतिक्रिया तर सहानूभूती ही सवय म्हणता येईल. यात भावना असणं करुणा मनात असावी लागते.प्रत्येक गोष्टी च्या दोन बाजू असतात व त्या पाहण्याचा प्रयत्न म्हणजे सहअनुभूती.

एखाद्या निर्णय घेण्याआधी दुमत होत असल्यास सर्व बाजू पडताळणे, एखाद्या वर टीका करण्याआधी ‘मी जर समोरच्या व्यक्तीच्या जागी असते तर मला कसे वाटले असते, याचा विचार म्हणजे सह-अनुभूती.

एखाद्या व्यक्तीबद्दल व तिच्या व्यक्तित्वाबद्दल अधिक खोलवर जाणून घेण्यासाठी, आपल्या जवळच्या व्यक्तींशी जुळवून घेण्यास कठीण जात असल्यास, भांडणतंटय़ात समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्यासाठी, आपला राग शांत करण्यासाठी, भावनांवर योग्य ते नियंत्रण आणण्यासाठी सह-अनुभूती घेणे व दर्शवणे हा उत्तम उपाय ठरू शकतो.

सह-अनुभूती आणि सहानूभूती दृष्टिकोन व भावना यांवरच अवलंबून हाच मनात आलेला विचार..दोन्ही ही आवश्यक च.मग एखाद्या ला लेबल लावताना हा विचार स्वतःला त्या जागी ठेवून बघता येईल दुसऱ्याच्या भावविश्वात रमून जाताना सौख्याचीच अनूभूती मिळेल.मालिका बघता बघता सहजच एकाच नाण्याच्या या दोन अनुभूती असा विचार आला तो मांडावासा वाटला .

त्यामुळे समोरच्या व्यक्तीची आत्मिक स्थिती समजून घेण्यास मदत होईल. एखाद्या मनुष्याच्या विशिष्ट प्रकारच्या वागण्यामागील हेतू कळण्यास तो शोधून काढण्यास याची नक्कीच मदत होईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!