बाह्य जगात इतरांमध्ये मिळून-मिसळून राहण्यासाठी आपल्याला मुखवट्यांची गरज का भासते?
सोनाली जे
सर्कशीतल्या विदूषकाचे काम माहिती ना तुम्हाला ? किंवा चार्ली चॅप्लिन माहिती ना ? किती ही दुःख असेल तरी बाह्य जगात इतरांमध्ये मिळून – मिसळून राहण्यासाठी आपल्याला मुखवट्यांची गरज भासते. चेहरा मात्र हसरा ठेवावा लागतो.
खरे सांगायचे झाले तर आपले कष्ट , आपले त्रास , दुःख हे आपल्याला च सहन करावे लागतात. किती ही अडचणी असतील , संकटे असतील , समस्या असतील तर मार्ग आपल्या स्वतः ला शोधावे लागतात. मग ते चुकीचे असतील तरी परत दुसरे मार्ग शोधावे लागतात. चूक , बरोबर , trial , error यातून स्वतः तावून सलाखून निघावे लागते.
बाह्य जगात आपल्याला इतरांमध्ये मिळून-मिसळून राहण्यासाठी, बरेचदा त्यांच्या प्रमाणे राहावे लागते.निदान दिखावा तरी. सुनील तसा गरीब फॅमिली मधून अतिशय कष्ट करून , स्वतः चे शिक्षण नोकरी करत पूर्ण करून इंजिनिअर झाल्यावर एका चांगल्या कंपनी मध्ये नोकरीला लागला. तसा पगार दिसायला चांगला होता.
पण सुनील चे खर्च त्याहून जास्त होते. वडिलांनी थोड कर्ज काढून घर घेतल होते . आणि वडील मध्यंतरी खूप आजारी पडले आणि आता ते अंथरुणाला खिळून च आहेत. त्यांचे औषधांचे खर्च, कर्ज भागविणे , घरखर्च चालविणे यात सुनील चे पैसे कसे संपत समजत नसे.
ऑफिस मध्ये एक दोन वेळा सहकारी लोकांनी त्याला पार्टी करिता आग्रह केला तो देवू देवू म्हणाला पण त्याला ते जमत नव्हते. पुढच्या महिन्याच्या पगारा नंतर त्याच्या ऑफिस मधल्या मित्रांनी परस्पर पार्टी ठरविली आणि सुनील ला तसे सांगितले की आज तू पार्टी देणारच आहेस आम्हाला माहिती नाही काही.
बिचारा सुनील आता सगळे ठरवल्यावर काही इलाज नव्हता त्याला दिली त्याने पार्टी. पण तो पार्टी चा खर्च एव्हढा होता की पुढे दोन महिने बिचारा तो ऑफिस ला गाडी ने येवू शकला नाही कारण पेट्रोल खर्च कुठून करणार ? मग ट्रेन चे पास काढून धक्के खात , त्याकरिता लवकर निघून , स्टेशन पासून परत चालत येणे जाणे करून असे कष्ट करून त्याने ते manage केले.
बाह्य जगात इतरांमध्ये मिळून-मिसळून राहण्यासाठी आपल्याला मुखवट्यांची गरज का भासते? कारण आपण समाज प्रिय प्राणी आहोत. आणि इतर लोकांची ही आपल्याला दैनंदिन जीवनात गरज ही पडत असतेच.
आपण ज्या सोसायटी मध्ये राहत असतो तिथे अचानक काही खर्च निघतात. जसे की लिफ्ट बंद पडली. लिफ्ट चे खर्च , कधी पाण्याची मोटार बंद पडेल , कधी टाकी साफ , मेंटेनन्स वाढेल तर कधी सोसायटी चे आयत्या वेळी ठरलेले सांस्कृतिक कार्यक्रम असतील. त्यात आपल्याला बजेट नसेल तरी वर्गणी ही द्यावीच लागते. तिथे टाळाटाळ करून चालत नाही.
बाह्य जगात वावरताना आपण अगदी नॉर्मल आहोत असेच दाखवावे लागते. तुमचे जवळचे कोणी कायमचे सोडून गेले, आप्तेष्ट यांचे निधन , प्रेमभंग असेल. किंवा नोकरी जावो , व्यवसायात घाटा येवो. तरी आपल्या चिंता , दुःख याचे सावट ही आपल्या चेहऱ्यावर पडू देत नाही आपण कारण हे जग तात्पुरती सहानुभूती दाखविणारे असते. नाही तर आपली परिस्थिती समजली तर टाळणारे असते. नाही तर नावे ठेवणारे असते. किंवा मग खोटी सहानुभूती देणारे. काही आपल्या दुःखाचा , एकटे पणांचा गैरफायदा घेणारे.
त्यामुळेच आपण बाह्य जगात इतरांमध्ये मिळून-मिसळून राहण्यासाठी आपल्याला मुखवट्यांची गरज भासते .कारण इतरांनी आपल्या बाबत कोणतेच तर्क ही करू नयेत . गैरफायदा हि नको. आणि कोणाची तोंड देखली सहानुभूती ही नको . आपण आपले मार्ग शोधावे लागतात. त्याला पर्याय नसतो. दे हरी पलांगवरी असे कोणी देत नसते. त्यामुळे वरकरणी तरी आपले आपण समर्थ आहोत असे दाखवावे लागते. अगदी लोक त्याला इगो , अहंकारी , माज आहे असे म्हणतील .
भले घरी येवून एकांतात मनसोक्त रडू .पण दूनिये समोर आपले दुःख. मांडले तर सगळीकडून बोलणारी लोक असतात. काही वेळेस आपण या व्यवहारी जगात भावनिक ठरतो . आणि त्याचा परत जास्त मानसिक त्रास होतो.
आजकाल तर एव्हढे वाईट वाटते की कोणी शेजारी गेले तरी खांदा देण्यास , निदान शेवटचे अंतिम दर्शन घेण्यास ही जावू का नको असे दहा वेळा विचार करतात. नाही तर आपल्या आपल्या सवडीने जावून येतात. आणि तेव्हा येता आले नाही म्हणून परत खोटी दिलगिरी व्यक्त करतात.
त्यामुळे इतर कोणाकडून कोणती अपेक्षा ही ठेवू नये. पण समाजात राहतो. लोकांच्यात मिळून-मिसळून राहण्यासाठी आपल्याला मुखवट्यांची गरज भासते.
ज्या समाजाची आपण गोष्ट करतो त्यात चांगले , वाईट , स्वार्थी , चोर , लबाड , कोणी सन्यासी आहेत. तर कोणी पोलिस ही आहेत. पोलिसांचा वेश असेल तरी त्यात चोर ही आहेत. तर चोर असणारे प्रसंगी अतिशय सज्जन होणारे , वागणारे आहेत. आपले म्हणणारे प्रसंगी परके असतात. तर परके समजत असतो ते प्रसंगी वेळेस आपलेपणाने मदत करतात.
कोण कसे असते काहीच माहिती नसते. त्यामुळे आपला आनंद असो , दुःख असो. , गरीबी असो अथवा श्रीमंती ,हुशारी असो अथवा अज्ञान हे आपल्या पाशी ठेवावे लागते.
बाह्य जगात इतरांमध्ये मिळून-मिसळून राहण्यासाठी केवळ चांगुलपणाच्या मुखवट्यांची गरज भासते. कारण आपण कधी कोणाला स्पष्ट काही सांगितले. तर हे चूक आहे असे सांगितले , हा अन्याय आहे हे सांगितले. दोन जणात केला जाणारा भेदभाव आहे हे सांगितले तर आपण वाईट ठरतो. आपण स्वार्थी ठरतो. तिरकस विचार करणारे ठरतो .तर कधी प्रसंगी आपण comparision करणारे ठरतो. खरे तर जे सत्य आहे तेच आपण खरेपणाने मांडतो.
पण लोकांना खोटेपणा चा बुरखा जास्त आवडतो. काही असेल चुकले ते त्यांची तारीफ करणारे , वाह वाह करणारे त्यांना आवडतात. आणि अशाच लोकांना ते जवळ करतात. त्यामुळे आपण किती ही खरे असू . आपल्याला चांगले वाईट , खरे खोटे समजत असेल तरी आपण शांत राहून चांगुलपणाचा मुखवटा च धारण करावा लागतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


