Skip to content

बहुतेकदा आपण आपल्याच चुकांचे फळ भोगत असतो.

बहुतेकदा आपण आपल्याच चुकांचे फळ भोगत असतो.


प्रीती लांडगे


….होना काय पटतंय का हे, छोट्याशा उदाहरणाने सुरवात करू तुम्ही रोज चहा पिता बरोबर, तुम्हाला कधी कधी कामाला जायची घाई आहे. तुमचा चहा टेबलवर आणून ठेवला आहे. आणि तुम्हाला तुमच्या आई किंवा अजून कोणी घरातल्याने सांगितले आहे की चहा खूप गरम आहे लगचे उचलून किंवा लक्षात न रहाता गरमागरम चहा पिऊ नको तरी ही तुम्ही कळतनकळत किंवा जायची घाई म्हणून चहा घेतला आणि प्यायला भाजली ना जिभ, जिभेला चटका बसलाना हे झाले आपल्याच चुकीचे फळ भोगणे. हे पटते आहे ना तुम्हाला.

तसेच बहूतेकदा आपल्याला आपल्या आयुष्यात कधी कधी आपल्याच चुकीचे फळ भोगत असतो किंवा भोगावे लागते. परंतु ते स्वीकारण्याची आपली तयारी नसते म्हणून आपण दुसऱ्याला दोष देत असतो किंवा त्यांच्यामुळे असे झाले अस आपण म्हणतो. आणि सतत स्वतःचा बचाव करू पहातो. माणूस हा प्राणी कधी ही स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या दोष देत रहातो. आणि आणखी आपल्या चुका मध्ये वाढ करत रहातो. वा फळ भोगतो ते पण रडून किंवा त्रस्त होऊन. अच्छा झाली ना चुक ठिक आहे. तर त्याचे फळ ही भोगा ते भोगताना त्रस्त का होता. माणूस आहे तर चुक होणार कधी हातून चांगले ही होणार दोन्हीची फळे भोगावे लागणार. कधी नरम कधी गरम अस आहे ते. खिशात पैसा आहे तोपर्यंत खिसा गरम,गरम म्हणतो आणि पैसा नसला की बेशरम,बेशरम अस आपले होते.

आपल्या हातून चूका का बर होत असतील ? कारण अती उत्साह आणि गडबड तसेच अशांती बर्याचदा किंवा बहुतेकदा असे होते. तुमच्या गुगल पे वरून मेडिकल चे बिल पाठवायचे आहे. आणि तुम्ही चुकून दुसऱ्या कोणाला तरी पैसे पाठवले गेले आणि आता ते पैसे परत मिळत नाहीत. खात्या मधील होती ती रक्कम संपली नंतर येणारे खर्च भागणार कसे याचे टेन्शन आले आणि आपल्याला आपल्या चुकीचे फळ भोगावे लागत आहे. परंतु तेच काम निट लक्ष देऊन केले असते तर आज आपल्याला त्याचे फळ भोगावे लागले नसते.

म्हणून आयुष्यात काही करताना गडबड करू नका अतताई पणा करू नका जीवन खूप अनमोल आहे. तर चांगले वागा, चांगले विचार करून कृती करा म्हणजे चांगले फळ भोगत असाल. अनेक व्यसनाच्या आहारी जात आहे आताची पिढी आणि त्याचे अनेक दुष्परिणाम भोगत आहे. स्वतःचे उज्ज्वल भविष्य अंधारात लोटत आहे. कारण त्याचे चुकीचे पाऊल ही पिढी फक्त एका घरापूरती मर्यादित नसून ती समाजात देखील मिसळणार आहे. तर यांनी जी चुक केली तीच दुसरा देखील करू शकतो. तर दुसर्याला ही त्यांच्या चुकीचे फळ भोगावे लागेल. म्हणून आपण स्वतःला शक्य तेवढे मजबूत करावे. आपल्या विचाराला योग्य ती दिशा द्यावी. आणि जरी चुका झाल्या तरी मी त्याला हिंमतीने सामोरे जाईल अशी तुमच्या मनाची तयारी हवी. कारण जरी चुक झाली तरी त्यातून तुम्ही शिकता किंवा धडा घेता.की काय करु नये. काय केले की अस होते. हि कल्पना तुम्हाला येते आणि तुम्ही सावध होऊन काम करता. आणि जरी फळ भोगावे लागले तरी त्याचा स्वीकार करता आणि शांतपणे भोगता देखील.

आपण निर्णय घेतला की त्याचे परिणाम चांगले येणार की, वाईट हे माहीत नसते परंतु तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन त्या निर्णयावर काम केले त्याचे परिणाम चांगले येण्यासाठी मी काही चांगली कृती केली तर मी उत्तम फळ भोगतो परंतु घेतला निर्णय आणि दुसरीच कृती करत आहोत त्याची जबाबदारी घेत नाही तर अर्थात त्या चुकीचे आपणच आपल्या चुकीचे फळ भोगत असतो.

म्हणून थेंबे थेंबे तळे साचे तसेच छोट्या छोट्या चुका असतात परंतु फळ मोठे भोगावे लागते. कारण चुक आपली. एक मुलगी आहे तीला आपल्या मित्रा बद्दल प्रेम वाटत आहे. आणि तो मात्र तिला ऐवढा रिसपेक्ट ही देत नाही त्याला माहिती आहे. मी काही केले तरी ही मला बोलायला येणार ही माझ्या शिवाय राहू शकत नाही. म्हणून तो तुमच्या कडे लक्ष देत नाही. आणि तुमच्याशी कस ही वागतो. तुमच्या हट्टापायी तुम्ही लग्न देखील केले. (तिने/ त्यांने) आणि. पदरी निराशा आली तर काय हे आपण केलेल्या चुकीचे फळ भोगत आहोत. जमलं तर लवकर मोकळे होऊन चुक सुधारा, स्वतःत बदल करून चांगल्या गोष्टींचे फळ भोगा.

आणि तुम्हीच तुमचे शिल्पकार वहा. आणि स्वतःला अशा प्रकारे तयार करा आणि काही झाले तरी घाबरू नका सज्ज व्हा. म्हणजेच आपल्या चुकाचा सक्रिय स्वीकार करा आणि पुढे चालत रहा. ज्या चुका झाल्या त्या पुन्हा करु नका त्यात सुधारणा करून वेगळा बदल घडवून आणू असा निरधार करा आणि सगळ्याची जबाबदारी स्विकारा म्हणजे मार्गक्रमण करणे सोपे होईल हा यातून बोध घ्याचा आहे.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!