बदला घेण्याची मानसिकता आपल्यात असावी की नसावी ??
सोनाली जे.
काय आहे बरं हा बदला ??
वृत्ती , मानसिकता , भावना का एखाद्या व्यक्ती किंवा परिस्थिती नुसार बदलणारा प्रतिसाद ?
बदला घ्यावासा कधी वाटतो ?
काही झाले तरी समोरच्याने आपण सांगू तसे वागावे, कधी कधी तर न सांगता ही त्याने समजून घ्यावे ही आपली अपेक्षा असते. सुरुवाती सुरुवातीला समोरची व्यक्ती नाती जपण्याकरिता समजून ही घेते , आपले माणूस तुटू नये म्हणून सगळे प्रयत्न केले जातात परंतु सतत समोरच्या व्यक्ती ने सांगेलं तसेच वागायचे. आपण काही किंवा कधीं त्यांच्या मनासारखे नाही वागले , तर आपण वाईट ठरतो. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी दुसऱ्याकडून घडत नाही. आपण आपले मत लादत असतो.
जसे की एकतर्फी प्रेमातून होकार देत नाही त्याचा बदला म्हणून acid फेकणे , प्रॉपर्टी मध्ये वाटणी करिता भावकी मधले सुधा एकमेकांचा बदला म्हणून वैरी होतात कधी कधी त्यातून खून , हाणा मारी करतात. नवरा बायकोच्या वादातून ते भांडण एव्हढे विकोपाला जाते एकमेकांचा बदला म्हणून प्राण ही घेण्यास मागे पुढे बघत नाहीत.
आजकाल तरुण पिढी सुधा बिघडत चालली आहे. पालक एखादी गोष्ट देण्यास नकार देतात , कधी छोटी वस्तू असेल , तर कधी मोठी गाडी , फोन , लॅपटॉप ..या वस्तू पालकांनी दिल्या नाहीत तर त्यांचा ही खून करणारी ही पिढी आहे.. हा बदला च झाला ना !!!
मनस्वी आणि मानव बाहेर मित्राच्या birthday party ला जाणार असतात. मनस्वी म्हणते मी वेस्टर्न gown घालणार आहे. तर तू ही मस्त blazer घाल.
मानव तिला म्हणतो अग श्रेयस चा वाढदिवस म्हणजे अगदी घरच्या सारखे ग .लहानपणापासून एकत्र आहोत. Blazer वगैरे काय घालायचे.मी मस्त साधा t shirt घालून येणार. यावरून मनस्वी वाद घालू लागते, चिडचिड करते, तरी मानव तिला म्हणतो की अग मनू, दरवेळी तू सांगतेस तेच घालतो .पण जिथे श्रेयस आणि मी अगदी लहान असल्यापासून घरच्या सारखे आहोत तर तिथे असली औपचारिकता नको ग.
मनस्वी मात्र काही ही ऐकून घेण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हती. तू नेहमीच माझे ऐकतच नाहीस , तुला माझे पटतच नाही, खूप चिडचिड , राग राग करते , साधी गोष्ट मानव पटवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण मनस्वी चे म्हणणे आपल्या स्टेटस ला जे शोभते तसेच आपण राहावे.
मानव सांगतो ही की अग आज आपण स्टेटस म्हणतो. तेही आर्थिक स्थैर्य मिळाले म्हणून पण लहानपणापासून छोट्या छोट्या गोष्टी मध्ये मी आणि श्रेयस खूप झगडत आलो , खूप मेहनत करत आलो, जसे कृष्ण आणि सुदामा घासातला घास ही आम्ही खाल्ला आहे. सुख दुःख सगळ्यात आम्ही एकत्र आलो आहोत. आज तो आपल्या पेक्षा कमी मिळवीत असला तरी तो मला खूप जवळचा आहे. त्याला दिखावा करून मला त्रास च होणार.
सगळ्यात शेवटी मनस्वी चिडते , भांडते मनाविरुद्ध घडले म्हणून ती मानव ऐकत नाही म्हणून मग त्याच्या या गोष्टीचा बदला म्हणून मी येणारच नाही पार्टी ला .मला यायचे नाही असे म्हणून रागाने अदळ आपट सुरू केली. शेवटीं मानव म्हणाला ठीक तू येवू नकोस .पण शांत रहा. असे म्हणून तो एकटाच वाढदिवसा करिता निघून गेला.
इकडे मनस्वी त्याच्या या कृतीमुळे अजून जास्त पेटून उठली. मानव ला मी महत्वाची नाही. माझी फिकीर नाही. गरज नाही. एकटा निघून गेला. तिचा इगो दुखावला गेला. आणि आता त्याच्या या कृतीचा बदला घेतलाच पाहिजे एवढ्या सुडाने ती पेटून उठली. आणि आता मानव स्वतः कसा एकटा जगू शकतो बघते च , कायमचे त्याला अडकविते असे म्हणून तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली त्यात मानव वर दोष , आरोप ठेवत त्याच्या चुकीमुळे मी हा निर्णय घेते आहे असे लिहून तिनेच स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.
यातून तिचा जीव तर गेलाच , पण मानव तो मात्र पोलिस , जवळचे नातेवाईक , तिचे आई वडील , स्वतः चे आई वडील , समाज या सर्वांच्या नजरेत दोषी ठरला. आणि मनस्वी चा हा बदला आयुष्यभर त्याला मानसिक त्रास देत गेला की वेळीच आपण तिला शांत केले असते , आपण थांबलो असतो तर कदाचित ही बदल्याची वेळ आली नसती.
बदला घेण्याची मानसिकता वाढत असते तेव्हा काही गोष्टी आठवाव्यात . विचार करावेत. शांत राहावे. एक व्यापारी असतो त्याला परदेशात जावून खूप पैसा कमवायचा असतो. त्याच्या घरच्यांचा विरोध असतो. तो बायकोला सांगतो मला जायचे च आहे. खूप मोठा व्यापारी व्हायचे आहे आणि भरपूर पैसे कमवायचे आहेत. बायको म्हणते ठीक आहे जा तुम्ही.
बरेच वर्ष परदेशात राहून तो भरपूर पैसे कमवून श्रीमंत होतो आणि ठरवितो की आता परत जायचे. परतीच्या प्रवासात त्याला एक व्यक्ती भेटते जी अचूक सल्ले देण्याकरिता प्रसिद्ध असते. तो व्यापारी विचार करतो बघू काय सल्ला देतो तो म्हणून त्याला एक सल्ला देण्यास सांगतो तो सल्ला असा असतो की कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी दोन मिनिटे थांबा आणि विचार करा. त्या सल्ल्याचे तो बुद्धिवान माणूस ५०० मोहरा घेतो. व्यापारी विचार करतो बास झाला एकच सल्ला.
तो प्रवास करून रात्री घरी पोहचतो. आणि सगळ्यांना surprise द्यायचे म्हणून खिडकीतून आत शिरतो . बघतो तर एव्हढा चिडून लालबुंद होतो की त्याची बायको कोणत्या तरी मुलासोबत झोपली आहे. तो रागाने लालबुंद होतो. आपल्या बायकोने आपल्याला फसविले. आता तिचा बदला घेतला पाहिजे , तिला ठार मारले पाहिजे म्हणून तलवार काढतो आणि तेवढ्यात त्याला त्या बुद्धिमान व्यक्तीचा सल्ला आठवतो. कोणती ही गोष्ट करण्यापूर्वी दोन मिनिटे थांबा आणि विचार करा.
तो मागे सरकतो . तेवढ्यात तलवार शेजारच्या हांड्याला लागते आणि त्या आवाजाने बायको उठते. बायको व्यापाऱ्याला बघून आनंदी होते. आणि तुमच्या शिवाय माझे आयुष्य किती एकाकी होते असे रडत सांगत असते त्यात तो व्यापारी अजून जास्त चिडून सुडाने पेटतो. पण तेवढ्यात बायको म्हणते बाळा उठ बाबांच्या पाया पड. तेव्हा बाबांच्या पाया पडल्यावर आई म्हणते बाळा तुझ्या डोक्यावरची पगडी काढ तेव्हा ती पगडी काढल्यावर लांबसडक केस असलेली मुलगी बघितल्यावर व्यापारी म्हणतो हे काय. ??
तेव्हा बायको म्हणते , तुम्ही परदेशी होतात आणि तुम्ही आपल्या बाळा ला बघितले ही नाहीत. पण तुम्ही इथे नव्हता म्हणून मी तिला आई आणि वडील या दोघांची माया आणि संस्कार ही दिले. तिला मुलासारखे वाढविले. आणि मुलीचे ही संस्कार केले आणि तिलाही कर्ते पणाची जाणिव करुन दिली.
रागाच्या भरात सुडाने पेटून उठलो होतो आपण हे व्यापाऱ्याच्या लक्षात येते. आणि आपल्या हातून खूप मोठा गुन्हा घडला असता केवळ आपण त्या बुद्धिवान व्यक्तीचा सल्ला ऐकला म्हणून मोठ्या संकटातून वाचल्लो असे म्हणून त्या व्यक्तीचे मनोमन आभार मानतो.
प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.
एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो… अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो… त्यावर माणसे ठाम असतात… खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते… विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे… म्हणजे मग तो विकसित होतो… जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात… ‘माणूस’ समजणे सोपे जाते…
दृष्टिकोन म्हणजे नकाशा. तोच चुकीचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही… एकच ध्येय असलेली माणसेही वेगवेगळ्या चुकीच्या ठिकाणी पोहोचतात, याचे कारण म्हणजे चुकीचे नकाशे… अर्थात चुकीचे दृष्टिकोन…. म्हणूनच *‘नजर बदलेगी, तो नजारें बदलेंगे’* असे म्हणतात…
अनेकवेळा रागाच्या भरात , हव्यासापोटी , अपेक्षाभंग , प्रेमभंग , विश्वासघात , कधी कधी तर नोकर ही मालकाने चांगली वागणूक दिली नाही , अपमान केला किंवा त्याला अपेक्षित गोष्टी दिल्या नाहीत म्हणून सुड भावनेने मालकाचा बदला घेणारे आहेत. पण या सगळ्या गोष्टी त्या क्षणी , राग आलेला असताना , परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे हे जाणवत असताना , समोरची व्यक्ती त्याच्या ठाम मतावर अडून असताना
आपण ही शांत राहण्याचा , स्वतः वर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा. वेगळा विषय काढून त्यावर बोलवे , त्याक्षणी दीर्घ श्वास घ्यावा सोडावा. जसे खुबसुरत सिनेमा मध्ये सोनम कपूर , उर्फ मिली डॉक्टर चक्रवर्ती .राग आला , समोरची व्यक्ती ऐकत नाही , परिस्थिती आपल्या कंट्रोल मध्ये नसते तेव्हा दीर्घ श्वास घेणे सोडणे करत असते. आणि शांत होत असते.
तसे आपण ही करून आपल्या स्व – मनावर कंट्रोल ठेवू शकतो. आपण लहान असताना आपण रागावलो , चिडलो की आपले आई वडील कायम एक ते शंभर अंक मोजायला लावत . आणि खूप जास्त चिडल्यावर एक ते एक हजार अंक मोजायला लावत.
तरीही आपला राग शांत झाला नाही तर आपल्याला उलटं count करायला सांगत आणि मग आपला राग कुठच्याकुठे पळून जात असे. कारण आपण ती गोष्ट नवीन गोष्ट करण्याच्या नादात विसरून जात होतो. परिस्थिती , व्यक्ती , स्थिती आपल्या नियंत्रणात नसेल तरी ही , कधी अपेक्षा , स्वार्थ असेल तरी सूड बुध्दीने कोणाचा बदला घेण्याची वृत्ती असू नये.
बदला घेण्याची मानसिकता आपल्यात असावी की नसावी ??
वाईट गोष्टी करिता बदला घेण्याची वृत्ती असू नये . पण आपल्या मध्ये क्षमता आहेत , हुशारी आहे , स्किल आहे केवळ आपण चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत असताना इतर कोणी तरी उगीच च तुमच्या क्षमतेवर , स्किल वर , तुमच्या प्रतिक्षेच्या निर्णयावर शंका घेतली , अविश्वास दाखविला , चिडचिड केली तर तुम्ही ती प्रेरणा समजून , या अपमान किंवा अविश्वास याचा बदला घ्यायचे ठरविले तर सकारात्मक दृष्टीने बघतीले आणि संधी समजून तुम्हाला त्याच व्यक्ती काय तर संपूर्ण जगा समोर सिद्ध करून दाखविले तर हा सकारात्मक बदला झाला .. जो तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्ती करिता प्रेरणा देवून गेला.
त्यामुळे नकारात्मक दृष्टीकोन ठेवून बदला घेण्याची मानसिकता कधीच ठेवू नये., नसावी. पण सकारात्मक बदला घेण्याची मानसिकता आपल्या मध्ये असावी जी आपल्याला जागे करते.. आपल्यातल्या क्षमता , उणिवा यांची जाणीव करून देते. ज्यात सूडाने पेटून उठून , प्रेरित होवून आपला स्वतः चा विकास किंवा देशाचा विकास करत असतो. ध्येय प्राप्ती करत असतो.
अनेक क्रांतिवीर , देश सेवक , समाजसेवक , भगतसिंग , राजगुरू , वीर सावरकर , सुभाषचंद्र बोस या सारखे देशभक्त देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता पारतंत्र्या विरुद्ध सुडाने पेटून उठले होते आणि त्यांच्या या सुडाच्या भावनेमुळे आपला देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवू शकला.
आयुष्य सुंदर आहे . तुमचा दृष्टिकोन महत्वाचा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


