Skip to content

प्रेम टिकवणं जमत नसेल तर कोणाच्याही आयुष्यात शिरू नका.

प्रेम टिकवणं जमत नसेल तर कोणाच्याही आयुष्यात शिरू नका.


सुप्रिया गोटेकर


प्रेम खरंच काय?असतं!
अजूनही न समजणं थोडं अवघडचं!

ज्या व्यक्तीवर आपण अतोनात प्रेम करतो. आपल्या जीवनात त्या व्यक्तीला अग्रगण्य स्थान देतो. आपल्या जीवनातला सर्वात मोठा आधार ज्या व्यक्तीला समजतो. तीच व्यक्ती आयुष्यभर आपल्या सोबत रहावी असं आपल्याला वाटतं.म्हणून आपण आपल्या जीवनातले प्रत्येक स्वप्न त्या व्यक्तीसोबत रंगवत असतो.

पण काही कारणाने जर का?दोघांच्या नात्यांमध्ये चुकांची उधळण होत असेल तर झालेल्या चुकीसाठी समोरच्या व्यक्तीला समजून न सांगता नात्याला पूर्णविराम देणं.असं करणं खरंच योग्य आहे का?प्रेमाच्या नात्यात एकमेकांना समजून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं.समजून घेतल्यानेच नाती ही चिरकाळ टिकून राहत असतात.

पाखरांसारखं उडत-उडत दुसऱ्यांच्या आयुष्यात जाऊन, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं तयार करून, नात्याची दोर घट्ट करून, एकमेकांना नको ते वचन देऊन, सुखदुःखाची गाणी गुणगुणायला काही वेळ नाही लागत हो,पण त्याच नात्याचं अविस्मरणीय घरटं जेव्हा मोडून जातं तेव्हा उरतात त्या फक्त आठवणी त्या आठवणींना उजाळा देत जगणं म्हणजे जिवंतपणीच अर्ध आयुष्य मेल्यासारखं जगणं होय.

आयुष्यात कुणावर प्रेम करून ते चिरकाळ टिकवून ठेवणं जमत नसेल तर,कुणाच्याही आयुष्यात चुकूनही जाऊ नका.कारण सोडून देणारा तर सोडून देतो पण सोडून दिल्यानंतर होणारा त्रास पचवणं खूप कठीण असतं हो,म्हणून कुणाच्या आयुष्याचा कचरा होईल आणि त्या व्यक्तीला मरण पत्करावं लागेल अशी वेळ कुणावर येऊ देऊ नका.

एक व्यक्तीच आपलं आयुष्य हे वळणावर आणू शकते. आणि एक व्यक्तीच आपलं आयुष्य बरबाद पण करू शकते. लहान लहान कारणावरून नातं संपवण्याची भाषा केली जाते.जर नातं संपवायचचं असेल तर काळजी घेणे सुद्धा खूप गरजेचं असते. उगीचचं आपल्या आयुष्यात कुणी येत नसतं हो,समोरची व्यक्ती आपल्यावर इतका विश्वास टाकून आपल्याला तिचं सर्वस्व मानते तर आपणही त्या व्यक्तीच्या भावना जपायला हव्यात.व्यक्ती आपल्या जवळ असल्यावर आपण तिला प्रेमाने जपतो.

पण त्याच व्यक्तीसाठी सरते शेवटी आपण नको त्या शब्दांचा वापर करायला तयार होतो.अर्वाच्च भाषा आपण त्या व्यक्तीला बोलतांना वापरतो,त्या व्यक्तीची खिल्ली उडवतो,नको त्या तिच्या खाजगी गोष्टीमध्ये ढवळाढवळ करतो.परंतुआपणही थोडं या गोष्टीचं भान ठेवावं की ती व्यक्ती आपल्या सोबत असो किंवा नसो आपण प्रेम केलेल्या व्यक्तीचा आजही तसाच आदर करावा.

कुणी कुणाचं नसतं.!

आपणच आपलं आयुष्य हसत जगायचं असतं.
येईल तारावया कुणी या विचारात रमायचं नसतं.

दुसऱ्यांच्या आधारावर जगण्यापेक्षा आपणच खंबीर बनायचं असतं.
स्वतः मात्र दुःख झाकून इतरांना सुखी ठेवायचं असतं.

कुणी वाईट म्हटलं म्हणून त्यांचं मनावर घ्यायचं नसतं.
आपण मात्र कसं आहोत हे आपल्यालाच माहीत असतं.

दुसऱ्यांचे अवगुण शोधण्यापेक्षा स्वतः स्वतःचं परीक्षण करायचं असतं.
आपल्या मध्ये कुठल्या गुणांची कमी आहे हे आपणच तपासायचं असतं.

आयुष्याच्या या वळणावर एकट्यानेच लढायचं असतं.
विजयाची शर्यत चालू असतांना मधेच थांबून पाहायचं नसतं.

सरते शेवटी आयुष्यात कुणी कुणाचं नसतं.
आपणच आपला आधार बनून आयुष्य जगायचं असतं.
जीवन हे एक कोड आहे ते ज्याचं त्यानेच सोडवायचं असतं.
सरते शेवटी आयुष्यात कुणी कुणाचं नसतं.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “प्रेम टिकवणं जमत नसेल तर कोणाच्याही आयुष्यात शिरू नका.”

  1. Pravin Shingole

    Khupch sudar lekh ahe
    Mala khup aawadala
    Yache khup gambhir parinam dusaravr hotat.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!