Skip to content

प्रेम आणि मैत्री यांमधला फरक समजून घेऊया…

मनातले माझ्या – निरपेक्ष मैत्री


सौ .सुप्रिया हळबे (पुरोहित)

ठाणे


बाळ जन्माला येते तेव्हा नकळत त्या बाळाची नाळ आईशी जोडली जाते आणि त्याच वेळी अनेक हक्काची नाती तयार होतात.
पण काही नाती ही रक्ताच्या नात्या पेक्षाही श्रेष्ठ असतात किंवा ती श्रेष्ठ ठरतात. प्रत्येक टप्प्यावर अनेक माणसे भेटतात काही आयुष्यभराची साथ देतात तर काही लगेच निघून जातात.

पण आयुष्याच्या कुठल्यातरी एका वळणावर आपल्याला अशी एक तरी व्यक्ती नक्की भेटतेच जिच्याशी आपण खूप मनातलं अगदी खोलवरच सारं काही शेअर करतो , व्यक्त होतो. मग तो मित्र असो की मैत्रीण किंवा कुणी नातेवाईक.

पण हे मात्र नक्की , की त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणंच खूप अनमोल असतं.अगदी साध्या साध्या गोष्टी ही सांगताना आपण खूप आनंदी असतो.आणि तो आनंद आपल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो. कारण ती व्यक्ती फक्त आपलं ऐकत असते, नव्हे तर आपल्याला मनापासून समजून घेत असते.

अनेकदा आपला नुसता आवाज ऐकुन ही तिला कळतं की आपल्या मनात नक्की काय आणि का चालू आहे. ती व्यक्ती मनकवडी होऊन जाते. कित्येक गोष्टी आपल्या शांत रहण्यातून देखील उमगतात तिला.

अश्या ह्या समजुतीच्या संभाषणात कसलाच स्वार्थ नसतो ना असते भेटण्याची गरज ….असते ती आपुलकी आणि आधार..ती मैत्री, ती आपुलकी समजून घ्यायचा डोळस पणा मात्र समोरच्या कडे असावा लागतो. जर ह्याचा चुकीचा अर्थ काढला गेला तर मग मात्र सगळचं चुकत जात. विचारांची प्रगल्भता असल्याशिवाय ही मैत्री समजणं तसं कठीणच.

जिथे ओढ लावणारी माणसे आहेत तिथे मनाची पावले नकळत वळतात. जर मुक्या प्राण्यांनाही माणूस लळा लावू शकतो तर मग माणसाची काय कथा. प्रत्येक व्यक्तीला , स्वतःला समजून घेणारे, प्रेमाने बोलणारे , समजावून सांगणारे अगदी वेळप्रसंगी हक्काने ओरडणारे सुध्दा कुणीतरी हवे असते.

ती व्यक्ती आपल्या साठी आहे, नुसती ही भावनाच खूप गोड असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या व्यक्तीचं आपल्याबरोबर असणंच खूप खास असतं. ह्या मैत्रीला नसतं बंधन वयाचं, नसतं बंधन नात्याच्या नावाचं, नसतो त्यात लिंगभेद, नसतो जातीभेद. सर्व भावनांच्या, विचारांच्या, इच्छा अपेक्षांच्या पल्याड गेलेली असते ही मैत्री.

पण हीच मैत्री जरका स्त्री आणि पुरूष यांच्यातील असेल तर मात्र समाजाच्या विचित्र नजरांना सामोरे जावे लागते.

पूर्वीपासूनच स्त्री पुरुषाकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे, मुळात तो बदलायला हवा. मैत्री कुठल्याही वयात कुणाबरोबर ही कधीही होऊ शकते. मग दोघांचे लग्न झालेले असो किंवा नसो. मैत्रीला वयाचे बंधन नसते. आणि प्रत्येक स्त्रीकडे समोरच्या व्यक्तीला पारखायची एक वेगळीच दृष्टी असते.

आणि म्हणूनच स्त्री प्रत्येक भेटीत किंवा प्रत्येक फोनवरच्या संभाषणात समोरच्या व्यक्तीला पारखत असते. या मैत्रीत प्रेम असतं पण ते निखळ मैत्रीचं असतं…इतर कोणत्याही भावना त्यात नसतात..आणि हे दोघांकडून असतं म्हणूनच ही निरपेक्ष मैत्री खरी असते.

खरंतर आपण त्या व्यक्तीच्या प्रेमातच पडलेले असतो. ह्या प्रेमाला नसते भेटीची आस , नसते शारीरिक ओढ…..असतो भावनिक आणि मानसिक आधार. ही तर असते फक्तं निरपेक्ष निखळ मैत्री.

म्हणूनच मला खरंच मनापासून वाटतं की …

प्रेम आणि मैत्री ह्यात फरक तरी काय..
तू माझा अन् मी तुझ्या साठी स्पेशल
आणखी हवयं तरी काय?



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “प्रेम आणि मैत्री यांमधला फरक समजून घेऊया…”

  1. सुंदरच..अगदी थोडक्यात बरेच काही..!!
    मैत्री आणि प्रेमात बऱ्याच अंशी संभ्रम हा दिसून येतो..मात्र या बाबतीत आवर्जून एक शंका विचाराविशी वाटते, वरील मजकुरात आपण मैत्री आणि प्रेमाची अगदी सुंदर व्याख्या केलेली आहे मात्र त्यात असही mention केलेलं आहे की मैत्री ही निरपेक्ष असते त्यात कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते ना शारीरिक ना इतरत्र..! पण यदाकदाचित अश्या नात्यांमध्ये शारीरिक अथवा मानसिक आधाराची गरज पूर्ती झाली व काही संबंध अस्तित्वात आले, तर अश्या नात्यांचे काय नामकरण करावे..? बऱ्याचदा याला प्रेमाच्या अलीकडे आणि मैत्रीच्या पलिकडे म्हणून संबोधले जाते..!
    तसेच सध्या ट्रेण्ड मध्ये असलेली कॉन्सेप्ट म्हणजे friends with benefits ..! अश्या मैत्रीला काय म्हणावे..!!?

  2. अरविंद joshi

    खूप chan लिहिले आहे. पण समाजामध्ये अजून तेव्हडी चांगली दृष्टी आलेली नाही. कारण मी दररोज हे अनुभवात आहे..

  3. Very perfect explanation in difference between love and friendship.Best?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!