प्रेमाच्या अपेक्षेपेक्षा स्वतःवर असं प्रेम करा की सकारात्मक माणसांचा गोतावळा तयार झाला पाहिजे.
सौ. मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
“किसी को प्रेम देना सबसे बडा उपहार है,
और किसी का प्रेम पाना सबसे बडा सन्मान है…””
या विश्वामध्ये सर्वात सुंदर जर काही असेल तर ते आहे, प्रेम हो प्रेमच ,….प्रेम हे नाही वस्तू आहे, नाही कुठली गोष्ट आहे ,प्रेम हा मनाचा भाव आहे, ज्याच्या जोरावर आपण जगातली कुठलीही गोष्ट जिंकू शकतो प्रेमाच्या जोरावर व्यक्ती संपूर्ण संसार जिंकू शकतो …..परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आधी स्वतः वरती प्रेम करू…
कारण बघा जर आपण कुठली वस्तू खरेदी केली आणि जर ती दुसऱ्या व्यक्तीला नाही आवडली तर आपल्या मनात त्या वस्तू वरती असलेले प्रेम नाहीसे होते मानवी स्वभावानुसार व्यक्ती दुसऱ्यांच्या वस्तूचे खूप कौतुक करतो आणि नेहमी दुसऱ्या कडून अपेक्षा ठेवतो माझ्यावरती सर्वांनी प्रेम करावे दुसऱ्याकडून कौतुक व्हावे अशी अपेक्षा ठेवल्या जातात….
आणि कधीकधी अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र निराशेच्या गर्तेत माणूस सापडतो आजकालच्या जनरेशनचा विचार केला तर हल्ली असे बघायला मिळते मी त्या मुलीवर मी ईतके प्रेम करतो तिनेसुद्धा माझ्यावरती प्रेम करावे अशी माफक अपेक्षा बाळगली जाते… खरे तर आपण कोणाला आपल्यावरती प्रेम करायला जबरदस्ती करूच नये…
यामागे कारण तसे खूप विशेष आहे प्रेम म्हणजे कोणी काही भेटवस्तू देणे, डिनर ला घेऊन जाणे ,किंवा कोणाची भेट घेणे, हे मुळीच नाही कारण हल्लीच्या प्रेमामध्ये असे बघायला मिळते की प्रेम कमी आणि अपेक्षांचे ओझेचं जास्त झालेत, त्यामुळे अपेक्षांचे ओझे पेलेनासे झाले की लगेच ब्रेकअप, डिवोज सर्रास केले जातात ….प्रत्येकात गुण आहेत, तसेचं दोष सुद्धा आहेतच परिपूर्ण असे आपण स्वतः सुद्धा नाही….
आमचे शिक्षक नेहमी म्हणायचे सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका… मग तुम्ही कसेही का असेना दिसायला म्हणा किंवा अन्य काही जेव्हा आपणच आपल्यावर ती प्रेम करू लागतो तेव्हा इतरही आपल्याला स्वीकारु लागतात आणि जर का कोणी तुमच्या प्रेमात असेल आणि तुमच्या कडून प्रेमाची अपेक्षा करत असेल आणि समजा त्या प्रेमाला पुढचे काही भविष्यचं नसेल ,तर त्या व्यक्तीने केलेल्या अपेक्षा या निवड अवास्तव आहेत…. त्याचे काही अस्तित्वतच नसेल ….
एकतर्फी प्रेमाची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही….. आणि मित्रांनो जर खरं सांगायचं झालं तर मी असं नक्कीच म्हणेल की जर कुणाचे प्रेम मिळवण्यासाठी आपल्याला जिवाचा आटापिटा करावा लागत असेल…. तर त्या प्रेमाला अर्थ तरी काय …??
कारण प्रेम मागुन मिळाले असते… तर प्रत्येकाने मागितलेचं असते …..प्रेम ही मागून मिळवण्याची गोष्ट अजिबात नाही ते तर कमवावे लागते…. आपल्या स्वभावाने आणि आपल्या विचाराने ,आपल्या निस्वार्थ भावनेने निस्सीम भक्ती ने प्रेम ही एक प्रकारची भक्तीचं आहे ज्याला त्या भक्तीमध्ये रमता आले म्हणजे… स्वतःच्या प्रेमात बुडता आले तो इतरांकडून प्रेमाची अपेक्षा न करता सुद्धा त्याला सर्वांकडून भरभरून प्रेम मिळते…..
आणि स्वतः सोबत व्यक्ती इतरांना ही त्या सकारात्मक वातावरणात एकजूट करून आपल्या आजूबाजूला आणि जिथे जिथे जाणारं तिथे तिथे सकारात्मक माणसांचा गोतावळा तयार करू लागतो …बघा मित्रहो माणसाला माणूस म्हणून जगताना एकमेकांकडून खूप सार्या अपेक्षा असतात किंबहुना स्वतःला सुद्धा स्वतःकडून खूप अपेक्षा असतात परंतु प्रत्येक वेळेस आपल्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण होतीलचं असे नाही ….मुळात आपल्याला दुःख व्यक्तिचे होते असे नाही त्या व्यक्तीने आपल्या अपेक्षा सारखे काही केले नाही याचे दुःख होते….
मित्रांनो तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की कुठली व्यक्ती जेव्हा आपल्या सोबत बोलत असते, संवाद साधते तेव्हा आपल्या शरीराच्या भाषेवरून त्या व्यक्तीला अनेक संदेश पोहोचतात ,तसेच आपण सुद्धा त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून त्या व्यक्तीविषयी अंदाज लावतो जर कोणी रागात बोलले तर त्या व्यक्तीविषयी आपल्याला रागाची भावना वाटणार किंवा जाऊदे ही व्यक्ती रागातच बोल बोलते त्याच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा व्यर्थ आहे, असे काहीसे मित्रांनो कदाचित तुम्हाला असे वाटू शकते की यांना काय लागते लिहायला प्रत्यक्ष त्याचे परिणाम वेगळे असतात.
परंतु विश्वास ठेवा मित्रहो, ज्या वेळेस तुम्ही सकारात्मक असतात त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक वातावरण तयार होत जाते आणि तुम्ही जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा तुमच्या बोलण्यातून सकारात्मक विचारच बाहेर पडतात, आणि सृष्टीचा नियम आहे जे तुम्ही दुसऱ्यांना देणारं तेचं तुम्हाला परत मिळते….
सर्वात अगोदर हे जीवन आपले आहे ,आपण स्वतःला भरभरून प्रेम दिले पाहिजे, इतके दिले पाहिजे की आपल्यालाच आपल्या प्रेमाचे कौतुक करावेसे वाटले पाहिजे ,तुम्हाला सांगते आपण आपल्या प्रेमाला दुजोरा नाही दिला पाहिजे ,त्याला कायम कवटाळलं पाहिजे ,कारण आपल्या अस्तित्वाची किनार सुरू होते ते आपल्यावर स्वतःच्या असलेल्या प्रेमा पासूनच कारण इतरांच्या प्रेमात धोका होऊ शकतो पण आपल्या प्रेमात आपण स्वतःचं स्वतःच्या प्रेमाला कधीच संपणार नाही….
“” प्यार हैं एक पहेली ,
जब बन जाये अपनी सहेली,
प्यार दो ऊसकों इतना,
सहेली बनकर सुलझायेंगी प्यार की वो पहेली….!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



अप्रतिम
बोलण्यासाठी काही शब्दचं नाही असा लेख तुम्ही लिहिला आहे
Great
एक नंबर आहे लेख…वास्तव अगदी