प्रसंग कसाही असो.. आपला तोल जाऊ देऊ नका!!
सौ. मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
हे जीवन, जगणं खुप सुंदर आहे, परंतु विना खाचखळग्यांचे, संकटांशिवाय, दुःखाशिवाय, संघर्षाशिवाय, अडचणींशिवाय आपले आयुष्य नाहीच…..!!
माणूस हा भाव -भावनांनी युक्त आहे , फिलिंग…. हो… कोणी हास्य जोक केला तर कसं गालावर हसू येतं, तसंच कोणी जवळचं आपल्याला सोडून गेलं, तर न राहून सुद्धा आपोआप डोळे भरून येतात,हे आपल्या सर्वांसोबतच होते, पण आयुष्याची यात्रा मात्र कुठेच आणि कुणासाठी थांबत नसते , ती निरंतर सुरूच असते …….
आपल्या अगोदर ही होती, आपल्या बरोबर आहे ,आणि आपण नसताना सुद्धा राहील……
आपल्या प्रत्येका सोबत अनेक प्रसंग घडत असतात ,मग त्यात काही चांगले आणि काही वाईट असतील , प्रत्येक घडणाऱ्या घटनेला प्रसंगाला प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने सोडवण्याचा, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो, परंतु काही जण छोट्या छोट्या प्रसंगातसुद्धा हलून जातात , त्यांना काय करावं काहीच कळत नाही,
खरं म्हणजे काही जीवघेणे प्रसंग असतात, ज्या व्यक्तीला आपल्या क्षमतांवरचा किंवा स्वतःवरचा ताबा सुटतो, व्यक्तीचे वर्तन पहिल्यासारखे नसते, खरं म्हणजे कोविडच्या काळात अनेक जण हादरून गेलेतं, काहींना तरं आपली नोकरी गमवावी लागली, आपली रोजची भाकरी गेल्याचं दुःख ,
काहींनी आपली जवळची जिवाभावाची माणसं गमावली, माझ्या मैत्रिण वरती दुःखाचा डोंगर कोसळला, लग्नाला दोन वर्ष होत नाही, तोपर्यंतच काळाने घात केला, आणि साथीदाराचा हात कायमचाचं सुटला…..
हेच काय पण तिच्या सारखी कितीतरी लोक की ज्यांच्या दुःखाची भरपाई होणं कठीण आहे , अशा परिस्थितीत सुद्धा तीने स्वतःला सावरून घेतलेय, आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करतेय…..,
म्हणायला खरंच खूप सोप आहे, की प्रसंग कसाही असला तरी, आपला तोल जाऊ देऊ नका…. परंतु ते पचवायला तितकच उवघड आहे…..
हे आयुष्य आहे चढ-उतार येणारच आहे, दुःख आहे, अश्रू येतील, दुःखा नंतर सुखाची श्रावणी सुद्धा फुलेलं….. पण प्रसंग कितीही कठीण असला डोळ्यातून पाणी वाहायला लागलं, वाहू द्या ….काय फरक पडतो… मी तरं म्हणेलं… खूप रडून घ्यावे, जेव्हा रडावसं वाटेल तेव्हा ….
पण त्यातचं अडकून राहू नये, त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा…. कारण दुःख कितीही मोठं असलं तरी तुमचं तुम्हालाच भोगावं लागणारं आहे, त्यात कुणीही वाटेकरी नसतोचं….,
आणि हो सावरायचं शिकलों, तरचं जगायचं शिकणारं….
कुठल्याही परिस्थितीत घटनेत प्रसंगात वाहवत जाऊ नका, प्रत्येक प्रसंगातून काहीतरी धडा घ्या….. शिका….. आणि पुढे चालत राहा…..
” क्यू की चलती का नाम है जिंदगी “”
थांबला तो संपला….! याप्रमाणे आपली अवस्था होता कामा नये, अगोदर कठीण वाटेलं एकदा जमलं की जमलंचं मग….
कारण ज्याप्रमाणे दोरीवर चालणारी मुलगी पहिल्यांदा जेव्हा तिने प्रयत्न केले असतील, कितीदा पडली असेल, लागलं असेल ,पण पोटाच्या भुकेसाठी ती तितक्याच वेळा पुन्हा नव्याने उभी राहिली असेल….
तिच्या प्रमाणे आपल्याला आपला स्वतःच्या मनाचा बॅलेन्स सांभाळायचा आहे ,बऱ्याच वेळा आपण स्वतः निराश होतो, आपल्याच विचारात कुठेतरी मग्न असतो, वास्तवाचं भान नसतं, स्वतःवरती स्वतःच्या भावनांचा कुठलंचं तारतम्य आपल्याला नसतं ….
आपला रिमोट कंट्रोल कायम आपल्या हातात असू द्या… कारण तोल गेल्यानंतर काही लोक त्यांच्या फायद्यासाठी तुम्हाला जसं नाचवायचं तसं नाचवू शकतात ….अशांपासून वाचायचं असेल तर आपला तोल सांभाळा…..
1 – एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या ,हे काही आपल्याच आयुष्यात घडतेयं, असं नाही ,प्रत्येक जण आपापल्या दुःखाला पेलत असतो आणि त्या संकटावर मात करून आपल्याला पुढे निघायचंय…
2 – घडून गेलेल्या प्रसंगात आपल्या हातात काहीच नव्हतं, यापेक्षा आपल्या हातात काय आहे, आपण काय करू शकतो, यावर आवर्जून लक्ष देण्याचा प्रयत्न केला पाहिजे…
3 – फार वर्षांपूर्वी घडून गेलेला एखादा प्रसंग त्याचा आपण आता किती त्रास करून घ्यायचा आणि त्यातून स्वतःला कसं बाहेर आणायचं हे सर्वस्वी आपल्या हातात असते ,कोणीही तुम्हाला फक्त मार्गदर्शन करू शकते, पण त्यावर काम मात्र तुम्हालाच करावे लागेल….
4 -एखादा प्रसंग वास्तवाचे असे चटके देऊन जातो, की आपण काही केल्या तो कधीच विसरू शकत नाही ,तुम्ही जितकं त्या प्रसंगाला विसरण्याचा प्रयत्न करणारं तो प्रसंग तितकाच आठवणार म्हणून विसरण्याचा प्रयत्न करू नका बघा नक्की त्याचा विसर पडेल….
5 – जर काही प्रसंग पेलवतचं नसतीलं, तर जवळच्या विश्वासू व्यक्तींची नक्की मदत घ्या.. पण त्यावर निर्णय मात्र तुम्ही स्वतः घ्या… डोकं शांत ठेवा, ध्यान करा, आपल्या हृदयावर हात ठेवा, आणि सांगा स्वतःला
“फुल हो ,या काँटे हो,
हर रास्ता नापना है, मेरे दोस्त, खुशी हो या गम मिलकर कदम बढाना है…..!”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


