पुरुषांमधील अंतर्स्त्री..
मधुश्री देशपांडे गानू
वर्षानुवर्षं समाजमान्य परंपरेनुसार स्त्री-पुरुष अशी एक विशिष्ट विभागणी करण्यात आली आहे. म्हणजे ठराविक कामं स्त्रियांनीच करायची, ठराविक काम पुरुषांनीच करायची. पुरुषांनाच जमतात, असे ठोकताळे चालत आलेले आहेत.
पण आता काळानुसार त्यात बदल होत आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये काही पुरुष गुण असतात तसेच पुरुषांमध्येही स्त्री गुण असतात. स्त्रियांमधील पुरुषांचे गुण म्हणजे धाडसीपणा , करारीपणा , प्रसंगानुसार कठोरपणा इ. हे आता हळूहळू समाज मान्य करू लागला आहे.
जवळजवळ सर्वच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आता स्त्रिया अत्यंत यशस्वीपणे सहज वावरू लागल्या आहेत. पण स्त्रियांची नैसर्गिक भावनिक उत्स्फूर्तता , नाजूक भावना व्यक्त करण्याची स्त्रियांची ताकद , काही नाजूक कामे स्त्रियाच खूप छान हाताळतात असा असणारा गैरसमज हा अजूनही आहे.
म्हणजे स्त्रिया बदलत आहेत हे समाजाला मान्य आहे. समाज मान्य करतोय पण पुरुषाच्या बाबतीत मात्र समाज अजूनही मागासलेलाच आहे. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही नाजूक हळव्या भावना असतात पण अजूनही पुरुष मोकळेपणाने मनातल्या भावना बोलू शकत नाहीत.
स्त्री इतके सहज व्यक्त होऊ शकत नाहीत. संसाराचा गाडा रेटताना , आयुष्य जबाबदारीने पेलताना पुरुषालाही अनेक प्रकारचे ताण असतात. त्यालाही कधीतरी मनसोक्त रडावसं वाटत असेल पण केवळ मी “पुरुष” आहे या मानसिकतेने ते मोकळेपणी रडू सुद्धा शकत नाहीत.
कारण लहानपणापासूनच आपण त्यांच्या मनावर बिंबवले असतं “अरे काय बायकांसारखं रडतोस? पुरुष ना तू”. अशा कितीतरी आवडी-निवडी असतील पुरुषांच्या स्वयंपाक करणे असेल, घर स्वच्छ ठेवण्याची आवड असेल ,अगदी स्वयंपाक घर लावण्याची सुद्धा आवड असते पण केवळ पुरुष या एका बिरुदाखाली छोट्या छोट्या आवडणाऱ्या गोष्टी ही ते करू शकत नाहीत.
अगदी सहज बायकासुद्धा आपल्या नवऱ्याला “तुम्हाला काय कळतं यातलं?” असंच सहज म्हणतात.
काल महिला दिन झाला त्यानिमित्ताने पुरुषातील ही अंतर्स्त्री मला विशेष जाणवली. पुरुषांनीही मोकळेपणाने व्यक्त होणे गरजेचं आहे. त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य यावर अवलंबून आहे. पण हे लक्षात घेतलं जात नाही. लगेच एखाद्या पुरुषाला बायल्या म्हणून हिणवलं जातं.
हे चूक आहे. स्त्रियांमधील बदल ज्या सहजतेने समाजाने मान्य केले तसाच स्त्री-पुरुष असा भेद न करता एक माणूस म्हणून दोघांकडेही पाहिलं जावं तरच असे दिन साजरे करण्यातही काही अर्थ आहे, असं मला वाटतं.
हे माझं वैयक्तिक मत आहे. सगळ्यांनाच पटलं असेल असा माझा आग्रह नाही. हे व्हायला हवं असं मात्र मला मनापासून वाटतं. मग समाज आणखी निकोप होईल अशी मला आशा आहे.
बस इतकंच…….



मी खटाव तालुक्यात जय पवार खूप मी खूप भावनिक परिस्थिती आहे मला माझे खूप मित्र अचानक आठवतात मलाच रडल्यासारखा होतं काय काही अशा असतात की त्यांच्यावर आपला जीव बसलेला असतो आणि त्यांच्या शिवाय करमत नाही पण त्याला त्याचं काही घेणंदेणं नसतं मला मनासारखे मित्र कधीच भेटले नाहीत माझ्यासारखा मला मित्र कधीच भेटला नाही कुणाला युग होत आहे तर कुणाला अटीट्युड म्हणतात की मित्रांशिवाय आयुष्य आहे म्हणजेच मित्रांशी व आयुष्य कळत नाही आणि मी त्याच धुंदीत आहे एकटा आहे मी एकटा तुम्हाला खरं सांगू का माझा फ्रेंड ओमकार आणि मी जय पवार ओंकार मला खूप फ्रेंड आवडतो पण त्याला त्याचं काही की नाही
मन माझं म्हणते तुम्ही माझ्या भावना समजल्या असत या छोट्याशा आयुष्याला नक्की उत्तर द्या हो