Skip to content

प्रत्येक गोष्ट पर्सनली घ्याल तर डिप्रेशन च्या गोळ्या खायची वेळ येईल.

प्रत्येक गोष्ट पर्सनली घ्याल तर डिप्रेशन च्या गोळ्या खायची वेळ येईल.


सोनाली जे


Depression म्हणजे काय तर उदासिनता . आणि उदासिनता म्हणजे काय की एखाद्या गोष्टीत आशा राहत नाही.. आजकाल खूप सहज वापरला जातो हा निराशा किंवा depression शब्द..

पण खरेच आज तुम्हाला सगळ्यांनाच याविषयी जागे करावेसे वाटते.. डिप्रेशन नैराश्य किंवा उदासीनता आज काल 10 ते 25 टक्के लोक या मानसिक आजाराने त्रस्त आहेत. कारणे अनेक आहेत .जसे जीवघेणी स्पर्धा ,आर्थिक टंचाई, एकमेकांशी बिघडलेले नातेसंबंध ,त्यामुळे आलेला दुरावा स्वतःला कमी लेखणे ,नापास होणे , असफलता, धंद्यामध्ये नुकसान, पती-पत्नीचे न पटणे, घटस्फोट मुलांची प्रगती न होणे, शारीरिक आजार अशी बरीच कारणे नैराश्य घेण्याकरता कारणीभूत आहेत.

काही वेळेस प्रत्येक गोष्ट पर्सनली घेतल्यामुळे डिप्रेशन चा सामना करावा लागतो. सध्या corona किंवा pandemic situation मुळे खूप चांगले मित्र-मैत्रिणी प्रियकर-प्रेयसी यांच्यात भेट न होणे , एकत्र न येणे या गोष्टी घडत आहेत. मैत्रिणी भेटले तरी अभ्यास आणि इतरही गोष्टींवर भरपूर चर्चा होत असते , मार्ग निघत असतात ,वेगवेगळे माहिती समजत असते ,काही सोल्युशन्स निघत असतात , काहीच नाही तर नुसते भेटण्याने एक कप कॉफी घेतली तरी किंवा सोबत असणे ही खूप काही देवून जाते..एक मानसिक आधार शांतता, आनंद देवून जात असतो.

सध्या प्रियकर आणि प्रेयसी यांची खूपच बिकट अवस्था..पूर्वी रोज भेटणारे, प्रेमाचे बोलणे , कुठे तरी एकत्र भटकणे , एखादा movie असेल , शॉपिंग असेल, वाढदिवस celebrations असतील किंवा प्रेमाचा हलका स्पर्श असेल..दोघांच्यात खूप घट्ट नाते , जवळीक निर्माण करत असे..दिवसभर होणारे फोनवर बोलणे , आत्ता घरी सगळेच असतात त्यामुळे तेही मोकळेपणाने बोलणे होत नाही..भेटणे तर दूरच.

अर्थात ही परिस्थितीजन्य स्थिती आहे पण रोज भेटण्याची सवय , बोलणे , बघणे , सोबत असणे आणि प्रेमाच्या गप्पा गोष्टी सोबत इतर ही गोष्टींवर आपेपणाने बोलणे या सगळ्या गोष्टी पासून दुरावले आहेत हे त्यात मुली या जास्तच भावना प्रधान असतात. त्यामुळं ही परिस्थिती मनापासून स्वीकारू शकत नाहीत त्यातून निराशा , उदासीनता येत चालली आहे..आणि दोघांमधले अंतर सहन होत नाही..दुरावा सहन होत नाही..

मुलांचे कसे होते ते कशात ना कशात बिझी असतात..किंवा जरी भावनिक असतील तरी ते मुलींच्या एव्हढे त्यातच त्यात गुंतून पडून , सतत त्याच विचारात राहत नाहीत..आहे ती situation accept करण्याची त्यांची तयारी असते..आणि याउलट मुली accept करत नाहीत आणि सगळा स्वत: चाच दोष असे वाटत राहते..आपलेच प्रेम आहे त्याच्यावर , आपल्याला च गरज , त्याला काहीच फरक पडत नाही , आपण राहू शकत नाही त्याच्याशिवाय तो मुलगाच त्याला काही भावनाच नाहीत …

इतके काय चुकून बोलताना कोणत्या मुलीचा त्याच्याकडून उल्लेख झाला तरी आपण महत्वाचे नाहीच असे विचार आणि निराशा निर्माण होते त्यांच्यात मग अगदी आपलेच चुकले आप्पण प्रेमात पडलो पासून आता पुढचे ही विचार डोक्यात येतात की परिस्थिती अशीच राहिली तर आपली भेट पण नाही होणार आणि अजून दुरावा. पण तो राहू शकतो आपण नाही .

या गोष्टीपासून ते सगळे आपलेच दोष त्यात घरात ही कोणाशी मोकळेपणाने बोलू शकत नाही ते समजू ही शकत नाही कोणी , मग जेवणावर राग , जेवायचे नाही, सतत विचारात राहायचे, शांत शांत एकटे किंवा अबोला , उदासीन ,काही करायचा ही उत्साह नाही. यातून खूप डिप्रेशन येवून मानसोपचार तजज्ञांमार्फत योग्य उपचार पद्धती तर कधी भावनांवर नियंत्रण राहण्याकरिता , निराशा दूर होण्याकरिता किंवा उत्साह येण्याकरीता डिप्रेशन वर गोळ्या घेण्याची वेळ येते कधी थेरपी ..त्याचमुळे आपणच आपल्या भावनांचा आवेग नियंत्रित केला पाहिजे..परिस्थिती कोणती ही असो ती स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे.

पाच वर्ष एकत्र आलेली सुखदा आणि स्वप्निल लग्नाच्या आणा भाका सगळे होवून शारीरिक संबंध ही आणि अचानक स्वप्नील ला कामासाठी परदेशी जावे लागले ..लवकर परत येईल सांगून गेलेला स्वप्नील पुढे प्रोजेक्ट करिता त्याचे तिथे राहणे गरजेचे पडले..

सुरुवातीला रोज फोन करणारा स्वप्नील कधी वेळ मिळेल तेव्हा फोन करू लागला , तो तिकडे कामात बिझी पण इकडे सुखदा रिकामी , ती सतत त्याच्या विचारात , फोन ची सतत वाट , मेसेज ची वाट त्याची वाट बघू लागली..मेसेज पाठवून बघितला नाही पण ऑनलाईन आला तरी मग आपला मेसेज बघितला नाही म्हणून आधी त्याच्यावर चिडचिड मग स्वतः वर , आणि reply नाही आला की निराश होवू लागली.उदासीन राहू लागली त्यात स्वप्नील एक वर्ष येणारच नाही असे समजल्यावर अजून जास्त खचली ..

आणि सहा महिन्यांवर आलेले लग्न ही होवू शकणार नाही हे स्वप्नील ने क्लिअर केल्यावर आणि त्यानंतर ही कधी करता येईल हे सांगता येत नाही म्हणल्या नंतर सुखदा अलिप्त राहू लागली..एकटी राहू लागली ..स्वतः त्याच्यात एव्हढे मनाने गुंतलो , त्यापूढे जावून शरीराने ही गुंतलो म्हणून स्वतः ला दोष देवू लागली.

कोणत्या तरी विचारात सतत हरवलेली सुखदा कशातच रस घेईना, बाहेर पडलो तर लोक आपल्याकडे कसे बघतील हे मनाचे खेळ त्रास देवू लागले आणि ती एकलकोंडी होवू लागली शेवटी सुखदा ची जवळची मैत्रीण जी सुखदा आणि स्वप्निल मधल्या प्रत्येक गोष्टीची साक्षीदार होती तिने तिला डॉक्टरांकडे नेले काही दिवस तिला डिप्रेशन दूर होण्याकरिता गोळ्या ही दिल्या पण त्यांचा सल्ला , मार्गदर्शन यातून सुखदा बाहेर ही पडली आणि एक वर्ष झाल्यावर स्वप्नील परदेशातून आल्यावर लग्न ही केले त्याने तिच्या सोबत पण मधल्या या कठीण काळात स्वप्नील पासून दूर राहताना , किंवा स्वतः वरच दोष घेवून ती खूप विचित्र मानसिक अवस्थेतून गेली..

थोडक्यात सांगायचे तर परिस्थिती बदलत असते …ती थांबली आहे आता हाच शेवट असे गृहीत धरून निराश होवू नका. माझ्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज second year ची सुरुवातीपासून अतिशय हुशार विद्यार्थिनी , ९० टक्क्या पेक्षा कायम जास्त मार्क्स मिळविणारी एक मुलगी suicide attempt केलेल्या मुलीची केस आली होती..तिची आई तिच्यापेक्षा जास्त हायपर झालेली.

आईला बाहेर बसायला सांगितले ..मुलीशी अगदी सहज गप्पा मारतो तसे सुरुवात केली ..सुरुवातीला कशालाच प्रतिसाद नाही ..त्या एका भेटीत एकच सांगितले उद्या आलीस की माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायच आहेस जमिनीकडे नाही. काही ही बोलली नाही तरी मी शांतपणे बाकी गोष्टी , कॉलेज याविषयी बोलले जाताना काही motivational tips आणि दोन motivational videos बघायला दिले..उद्या येणार का हो म्हणाली जावू दिले..

दुसरे दिवशी आल्यावर लगेच सांगितले तिने की motivational videos छान होते..आदले दिवशी जाताना तिला सांगितले होते उद्या येताना छान आवरून ये..जे आवडते ते ड्रेस घाल..केस आवडतात तसे बांध ..सोड..मस्त आवर आणि आरशात बघ आणि मग बघ किती सुंदर दिसतेस ते..तिने तसेच केले खूप छान आवरून फ्रेश मुड मध्ये आली.छान दिसते आहेस फ्रेश, सुंदर असे म्हणल्यावर मग अजून खुश..

हळूहळू बोलते केले ..निराश होण्याचे कारण काय ..टोकाची भूमिका का घेतली विचारले..तर सांगितले की दोन विषयांचे paper अवघड गेले. इंजिनीअरिंग मी माझ्या आवडीने निवडले आहे , आई वडील यांची कोणतीच जबरदस्ती नव्हती..पण पेपर अवघड गेले म्हणून निराश झाले आणि आत्महत्या प्रयत्न..

पेपर अवघड गेले हेच कारण का अजून काही याची खात्री करून मग निराशा का आली? काय विचार केले ?

तेव्हा तिने सांगितले मी नोट्स सुधा व्यवस्थित काढल्या होत्या पण मला त्या वाचायला वेळच मिळाला नाही आणि पेपर अवघड गेल्यावर मी नापास होणार आणि माझ्या बरोबरचे पुढे जाणार मी मागे राहणार याची चिंता वाटली , निराश झाले कोणतेच मार्ग नाहीत म्हणून sucide प्रयत्न केला म्हणली ..एका डॉक्टरनी तिला औषधे देवू सांगितले ..हुशार असल्यामुळे तिने औषधे त्याचे परिणाम drowsiness वाचल्यामुळे औषधे घेणार नाही म्हणून मग तिची आई सल्ला आणि मार्गदर्शन घेण्याकरिता घेवून आली.

ही मुलगी स्वतः ला दोष देत होती..मी एवढी. हुशार आणि अभ्यास करणारी बाकी कोणत्या activity नाहीत सतत अभ्यास करणारी ..आणि मला पेपर अवघड गेले , लोक काय म्हणतील, माझे मित्र मैत्रिणी काय म्हणतील , नातेवाईक , सगळे मी नापास झाले तर नावे ठेवतील ..मी माझ्या आवडीने ही बाजू निवडली म्हणून हसतील पण हे विचार तिने केले होते..त्यावर तिला मार्गदर्शन केले..लोक काय म्हणतील , आपले बरोबरचे पुढे जातील हे विचार सोडून दे..तू कुठे कमी नाहीस हे लक्षात घे..कोणाकडे ही लक्ष देवू नको..

एक वर्ष गेले म्हणून काही आयुष्याचे नुकसान नाही…आपण काही रेस मधले घोडे नाही ..सतत पहिले च यायचे..आज बरोबर असणारे उद्या कोण कुठे असतील माहिती पण नसते अनेकदा.स्वतः ला दोष देणे सोडून दे..होवून गेले त्या गोष्टींचे विचार सोडून दे त्यातून चांगले बघ..नोट्स तयार आहेत अभ्यासाला चांगला वेळ मिळाला आहे मस्त अभ्यास कर ..बिनधास्त दे परीक्षा. तिच्या मधली जिद्द तिला जागे करत गेले..

अजून काही स्वतचं बरे वाईट करून घेण्याच्या आधी…औषधांच्या मार्गाकडे वळण्यापूर्वी तिला केलेले योग्य मार्गदर्शन आज तिला अतिशय उपयोगी पडत आहे .परत ती जिद्दीने उभी राहिली .सगळे विषय तर सोडविले च पण बाकी activity पण सुरू केल्या..जसे ट्रेकिंग आवडते , cooking, जिम , कॉलेज ची representative आहे आज ती.नुसता अभ्यास नाही तर आता आवडत्या गोष्टींना वेळ देवून अभ्यास उत्साहाने करून पुढे यशस्वी वाटचाल करते आहे.

असेच एक उदाहरण जॉइंट फॅमिली सासू,दोन जावा सगळे एकत्र, एकच स्वैपाकघर रोज सकाळी मोठी सून कशावरून तरी कटकट करीत असे..मग स्वैपाक घराची खिडकी च का उघडली पासून आदले दिवशी चे शिळे का उरले पासून गेट चे कुलूप च का नाही काढले अशा असंख्य कुरबुरी.. धाकटी सून रोज ऐकून घेत असे..

भावनिक असल्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतः वरच घेत असे..जसे ती आपल्याला च बोलते आहे..मग आपण असे करायला नको होते किंवा असे करायला..काही केले तरी त्याउलट च कसे असते मोठीचे असे असंख्य विचार…सासू बाई कशातच नसत..पण एक बाहेर गेली की तिच्याविरुद्ध हिच्याकडे बोलत ..मग अजूनच त्रास .

रोज सकाळ झाली की मोठीच्या चिडचिड करण्यातून धाकटी निराश होवू लागली..शांत होवू लागली..सहन करू लागली..प्रत्येक गोष्ट आपणच केली पाहिजे आपलीच जबाबदारी असे समजून बारीक सारीक गोष्टी पासून मोठ्या गोष्टी ही करू लागली तरी मोठी चे वागणे तसेच.. धाकटी मात्र मग स्वतः ला दोष देवू लागली.

प्रत्येक गोष्ट पर्सनलि घेवू लागली. पण हे रोजचे ताण सहन होईना .रोज दिवसाच्या सुरुवाती पासून वाद नकोत म्हणून ऐकून घेवून सगळे दोष आपलेच ही समजूत करून घेवून घेवून आंतरिक त्रास सुरू झाला..मन उदास ..निराश ..आपलेच चुकते आपल्याला काही च जमत नाही म्हणून डिप्रेशन मध्ये जावू लागली पण तिच्या मैत्रिणी मुळे यातून बाहेर पडली ..

मैत्रीण योगा ,प्राणायाम शिकविते रोज थोडा वेळ हिच्या सोबत घालवून तिलाही आपल्यासोबत योगा , प्राणायाम या सोबत काही चांगले विचार ही सांगत असे..मोठीच्य स्वभावाचा तू का परिणाम होवू देते तुझ्यावर असे सांगून मार्गदर्शन करून तिला या सगळ्या negative विचारातून बाहेर काढले.

असे बरेचदा अनेक लोकांच्या बाबतीत घडते ..जे मैत्री किंवा नातेसंबंध बिघडले तरी स्वतः वरच घेत असतात त्यातून डिप्रेशन कधी तरी गोळ्या घ्याव्या लागतात पण

जेव्हा कधी असे निराश व्हाल तेव्हा कायम स्वतः दोषी समजू नका..नाण्याला दोन बाजू असतात..तसेच टाळी एका हाताने वाजत नाही..सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवा..विचार ..thoughts, कृती..action, संकल्पना, स्वप्ने, कल्पना imaginations, अपेक्षा ..expectations , acceptance.. स्वीकार, आणि अनुभव experience या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करा..

सर्वगुण संपन्न कोणीच नसतो ..प्रत्येकात काही गुण दोष , उणिवा असतातच ..यात सतत आपल्यावर गोष्टी घेण्याची ही गरज नसते.आणि आपल्यावर आल्या तरी त्याला खंबीरपणे तोंड देणे , त्यातून मार्ग पर्याय शोधणे गरजेचे..नाहीतर मानसिक आजारांचे लेबल लगेच लावले जाते..

भावना , विचार , परिस्थिती , व्यक्ती या सगळ्यां सोबत समायोजन ,, नियंत्रण गरजेचे असते..आणि सकारात्मक सगळ्यात महत्वाचे, आशावादी असणे गरजेचे असते..आशावादी असाल , जगण्याची प्रबळ इच्छाही मरणाच्या दारातून परत घेवून येईल तुम्हाला .याउलट निराशाच बाळगत राहिलात तर आहेत त्या opportunities दिसणार पण नाहीत..आणि नवीन मिळणार पण नाहीत .

आशावाद ..जसे उद्या आपण हे करणार ठरवितो..उद्या फ्रेंडशिप डे सगळ्या मैत्रिणी भेटुयात त्याचे प्लॅन्स ठरविता हा. आशावाद..जगण्याची उमेद कायम वाढविणारा…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “प्रत्येक गोष्ट पर्सनली घ्याल तर डिप्रेशन च्या गोळ्या खायची वेळ येईल.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!