प्रत्येकाची वेळ बदलत असते आणि परिस्थिती कायम सारखी राहत नाही.
मिनल वरपे
गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही आणि एकदा मिळालेली संधी ही पुन्हा पुन्हा मिळणार नाही या विचाराने आपण आहेत तिथेच अडकून राहतो. पण हे जरी खरं असेल तरी फक्त विचार करून स्तब्ध राहिल्याने हातात काहीच मिळणार नाही.
आपले प्रयत्न आपल्याला कायम प्रेरणा देत असतात. मग जरी वेळ गेलेली असेल किंवा हातातील संधी निघून गेली असेल तरी प्रयत्न हे कायम आपल्यासोबत असतात.
मी आता काय करू.. आता तर काहीच करता येणार नाही.. आता काय उपयोग … असे प्रश्न आपल्याला कायम प्रयत्नांपासून दूर ठेवतात. म्हणून कायम स्वतःला प्रेरणा द्यायची असेल तर शक्य असेल तेवढे प्रयत्न करण्याचा आपला स्वभाव ठेवायचा.
म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी असते तसेच केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे असे आपल्याला बढावा देणारे विचार कायम आपल्यासोबत आपण ठेवायला हवेत.आणि फक्त असे विचार करून शांत नाही बसायचं तर ते कृतीत उतरवले तरच त्याचा उपयोग आपल्याला होणार.
हे विचार प्रत्येक व्यक्तीला लागू होतात मग ते शिक्षणासाठी असो, नोकरी करताना असो अथवा संसारात असो कारण आपण शिकताना अभ्यासात अपयश मिळालं की, नोकरी करताना आपल्याकडून काही चूक झाल्यावर किंवा एखाद काम जमत नसेल तर तसेच संसारात आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडताना अशी स्थिती निर्माण होते.
कुठेतरी जास्त विचार करून आपण मनात आणि डोक्यात विचारांची घुसमट करतो आणि त्यावेळी मला पुढे काही जमणार नाही असा विचार करून हात वर करतो.पण अशावेळी आपल्या मनाशी प्रयत्नांना कधीच सोडायच नाही हे पक्कं झालं की आपल्याला कुठेच हताश वाटणार नाही.
गेलेली वेळ आणि संधी जरी पुन्हा मिळत नसेल तर गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा हातात असलेली वेळ आणि संधी गमावू नका.ही वेळ आणि संधी गेली म्हणून समोर असलेली वेळ आणि संधी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर पुन्हा प्रयत्नांची जोड देऊन नव्याने उभ राहायच.
प्रत्येकाची वेळ बदलत असते आणि परिस्थिती कायम सारखी राहत नाही. आपण हे नेहमी ऐकलं आहे आणि असे व्यक्तिमत्त्व सुद्धा पाहिले आहेत पण हे तेव्हाच शक्य असते जेव्हा आपण हातातले प्रयत्न करायचं कधीच सोडत नाही.

Online Counseling साठी !
लेख कसा वाटला नक्की सांगा. तसेच आपल्यालाही लिखाणाची आवड असल्यास आणि ते लिखाण साहित्य ‘आपलं मानसशास्त्र’ च्या संकेतस्थळावर प्रकाशित व्हावे असे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com या जीमेल आयडीवर मेल करा.
तुम्ही पाठवत असलेले लिखाण साहित्य यापूर्वी कोणत्याही सोशल मीडियावर प्रकाशित झालेले नसावे. लिखाणाची फर्स्ट कॉपी च आपल्याला मेल करायची आहे. योग्य दखल घेऊन प्रकाशित केले जातील.

