Skip to content

प्रत्येकवेळी आयुष्य मनासारखे होऊ शकत नाही.

प्रत्येकवेळी आयुष्य मनासारखे होऊ शकत नाही.


सोनाली जे.


हा खूप मोठा विषय आहे.. बाळ लहान असताना रडले की त्याला दुध किंवा काही तरी खायला प्यायला मिळणार ही बाळाची psychology का बरे पक्की होते? कारण त्याच्या मनासारखे होत असते आणि त्याला हे समजते की आता आपल्याकडे कोणी तरी लक्ष देईल आणि खायला प्यायला देईल..

बाळ थोडे मोठे होते , एखादी गोष्ट मिळविण्याकरिता ते हट्टीपणा करायला लागते. हात पाय आपटणे, जमिनीवर झोकून देणे अशा गोष्टी करायला लागते. किंवा त्याला असे वाटले की आपल्याकडे कोणी लक्षदेत नाही तर ते इतरांनी attention द्यावे म्हणून रडेल ..आरडा ओरडा करेल..पण त्याचा हट्टीपणा कमी व्हावा म्हणून प्रत्येक वेळी त्याला पाहिजे ती गोष्ट त्याला देत नाहीत..त्याला म्हणेल ती गोष्ट द्यायची सवय लावत नाहीत.

त्याहून थोडे मोठे झाले की चांगले वाईट याची जाणीव होवू लागते..त्यातूनच इतरांकडे एखादी असलेली गोष्ट आपल्याकडे नाही याची जाणीव होते..त्याकरिता हट्ट सुरू होतो.पण त्या गोष्टी किंवा हट्ट एखादे वेळेस आई वडील पूर्ण करू शकतील . पण प्रत्येकवेळी आपल्या मनासारखं होत असते का ? खेळ खेळताना प्रत्येक वेळी आपल्याला पाहिजे तेच खेळ आपले मित्र प्रत्येकवेळी खेळतात का? नाही ना!! कधी तरी आपल्या मनासारखे कधी त्यांच्या मनासारखे खेळ आपण खेळतो च ना!!

आपण आयुष्यात एक ध्येय ठरवितो पण ते पूर्ण करू शकतोच का ?? बरेचदा आपल्याला काही तरी वेगळे करायचे असते आणि काही तरी वेगळे होत असते.

आताचे च उदाहरण बघुयात की.. Corona सारख्या या pandemic परिस्थिती मध्ये मुलांना शाळेत जायचे आहे, भरपूर अभ्यास करायचा आहे. मित्र मैत्रिणी , teacher यांच्या बरोबरची धमाल मस्ती अनुभवायची आहे.नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत..पण मुले त्यांच्या या इच्छा शंभर टक्के सध्या पूर्ण करू शकतात का?? नाही ना!!

या गोष्टी ते परत काही काळाने ..एखाद्या वर्षाने जेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईल तेव्हा नक्कीच करू शकतात पण आता ते शक्य आहे का.? नाही ना !!आता प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होवूच शकत नाही..

आज मी उत्साहाने दोघी जुन्या मैत्रिणी नी ठरविले भेटायचे, भेटण्याची ठिकाणी पोहचले पण अचानक तिचा फोन आला अग मी तुला भेटायला च येत होते पण गाडी अचानक बंद पडली आणि दुचाकी वाटेत कुठे लावणार आणि कसे येणार आणि तरी तुला दिलेल्या वेळेत पोहचणार नाही म्हणून मी फोन केला आपण नंतर कधी तरी भेटुयात..झाले म्हणजे आपण ठरविले एक होते आणि झाले वेगळेच. किंवा असेही होवू शकते की मैत्रिणी ला surprise द्यायचे म्हणून आपण तिच्या घरी गेलो आणि ती कुलूप लावून बाहेर गेली असेल.

परिक्षेकरीता खूप अभ्यास केला पण जो अभ्यास केला होता त्याच्या बाहेरचे प्रश्न आले तर ? आपण उत्तरे लिहू शकतो का??

इंटरव्ह्यू दिला आणि आपल्याला वाटते की मला सगळे आले त्यांनी जे विचारले ते म्हणजे आपली निवड होणार याची खात्री ही वाटत होती पण अचानक समजते की आपली निवड झाली नाही..कारणे अनेक असू शकतात.जसे आपल्यापेक्षा जास्त अनुभवी , शिक्षण असलेला योग्य candidate interview commitee ने निवडला तर आपण काय करू शकतो का?? नाही ना !!

लग्न म्हणले की स्थळ बघणे आले त्यातून मुलगा मुलगी भेटणे आले..मुलीला मुलगा खूप आवडला ,पसंत ही पडला पण मुलाला मुलगी नाही पसंत पडली तर ? असे नाही ना की तुम्हाला पसंत म्हणजे त्याची पसंत पण तीच असली पाहिजे ?? ही गोष्ट तुमच्या मनासारखी नाही पण समोरच्या ची पसंत ही महत्वाची ना कारण आयुष्याचा प्रश्न आहे हा..

निवडणुकी मध्ये समजा मला खात्री आहे की मी निवडून येणारच..मी खूप मदत केली लोकांना, ते मला कायम विचारतात..कधी गरज पडली की फोन करतात त्यांच्या करिता अनेक सेवा , सुविधा उपलब्ध करून देते मी ..मीच बहुमतांनी जिंकणार अशी खात्री असेल तरी मी हरले का हरले? का माझ्या मनासारखं झाले नाही? कारण मतदारांनी मत दिले नाही म्हणूनच ना . मत देणे ही त्यांची जबाबदारी होती तशी मदत करणे आणि अपेक्षा ठेवणे आपली जबाबदारी.

माझ्या मित्राने गाडी घेतली, बंगला बांधला मला ही वाटले अरे मी पण घेणार…पण ही इच्छा पूर्ण कधी होवू शकेल जेव्हा तुम्ही त्याकरिता प्रयत्न करणं सुरू कराल..त्याकरिता आर्थिक नियोजन कराल तेव्हा..जर तुमची तेवढी कुवत किंवा क्षमता नसेल तर तुम्ही ते कधीच पूर्ण करू शकणार नाही..

आपण ज्या समाजात राहतो तिथले ही काही नियम , कायदे आहेत..ते पाळावे लागतात..इतरांची मते ही विचारात घावी लागतात..समजा एखादा लग्न झालेला पुरुष मला खूप आवडतो किंवा एखाद्या लग्न झालेल्या पुरुषाला मी खूप आवडते ..आणि लग्न करायचे ठरविले किंवा तसेच समाजात ..समाज म्हणजे आजूबाजूचे आणि नातेवाईक ही आलेच त्यांच्या सोबत राहायचे ठरविले तर कायदा आणि समाज या गोष्टींना मान्यता देईल का ?? नाही ना !!!!

याउलट माझ्याकडे सगळे आहे पैसा आहे , बंगला आहे दागदागिने आहेत , घरी सगळी चांगली जपणारी माणसे आहेत ..अतिशय आनंदात आयुष्य सुरु आहे ..आणि अचानक मला दुर्धर आजाराने पछाडले आणि मी कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त आहे समजा शेवटची स्टेज doctrb, औषधे ही काही करू शकणार नाहीत असे डॉक्टरांनी सांगितले..

कोणतेच इलाज होवू शकणार नाहीत असे जर सांगितले आणि काही दिवसाचा सोबती ..मृत्यू हाच शेवट…आणि मी म्हणले नाही नाही मला जगायचेच आहे..अट्टाहास केला तरी ते शक्य आहे का??

म्हणजेच काय ज्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत त्या करिता आपण नेहमीच प्रयत्न करावेत..किंवा काही ध्येय गाठण्याकरिता मेहनत करावी..पण ते आपल्या मनासारखे होईलच हे गृहीत धरू नये..

अगदी मिशन मंगल मध्ये सुरुवातीला खात्रीने मोहीम यशस्वी होणार च म्हणून satelite सोडला जातो..पण मध्येच येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे मिशन abbort करावे लागते…म्हणजे एव्हढे सगळे सायंटिस्ट त्यांनी मेहनत घेतलेली ..आता पाठविलेले यान मोहीम यशस्वी होणार असे वाटत असताना पुढच्या काही क्षणांत मिशन abbort करावे लागले..

तसेच दुसऱ्यांदा तयारी पूर्ण असताना पावसाळी हवे मुळे वेळेत लाँच करू शकले नाहीत पण वेळ आली तेव्हा पाठविले ना…तसेच चांद्रयान २ मधले विक्रम आता पोहचणार आणि आपली मोहीम फत्ते होणार असे दिसत असतानाच काही अंतर बाकी असताना विक्रम चा संपर्क तुटला..म्हणजे अगदी पूर्ण होत आलेली मोहीम ही अचानक अयशस्वी झाली…शास्त्रज्ञ त्यांनी केलेली तयारी..घेतली गेलेली मेहनत आणि अगदी पहिले छायाचित्र ही आले असताना आता मोहीम फत्ते झाली म्हणत असतांना अचानक संपर्क तुटून मोहीम अयशस्वी झाली.. म्हणजे कित्येक वेळा आपण ठरवितो त्यापेक्षा आयुष्यात खूप काही वेगळे होते..

३ idiots मध्ये फरहान ही फोटो ग्राफी करायची ठरवितो पण आई वडील म्हणतात म्हणून इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतो त्यात rancho सारखा खूप चांगला मित्र भेटतो मदत करतो म्हणून त्याची इच्छा पूर्ण होवू शकली..पण प्रत्येकाची पूर्ण होतेच असे नाही ना..

प्रयत्न करायचे , इच्छा ठेवायची आणि त्यातून जर आयुष्य आपल्या मनासारखे नाही जगू शकलो किंवा गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तरी हार मानायची नाही. आहे ती गोष्ट मनाने accept करायची…खंबीर आणि तटस्थ राहायचे आणि हार ही किंवा मनाविरुध्द झालेल्या गोष्टी ही स्वीकार करायच्या. जसे मिशन मंगल मध्ये मिशन abbort झाले, करावे लागले.. तरी अक्षय खन्ना लाडू खातो ..तेव्हा पत्रकारही विचारतात की या प्रसंगातही तुम्ही लाडू खात आहात ? . तेव्हा तो म्हणतो की लड्डू पे कहा लिखा है की वोह failure पे नहीं खातें..
म्हणजेच की जी परिस्थिती असेल ती accept करण्याची तयारी पाहिजे.

आयुष्यातल्या ज्या गोष्टी मनासारख्या घडल्या आहेत त्याचां आनंद तर मानाच किंवा ज्या आपल्या मनसारख्या नाही घडत त्या accept करा.त्यामुळे आपली मानसिकता कंट्रोल मध्ये राहील..नाही तर राग , चिंता , भीती ,आणि डिप्रेशन सारख्या मानसिक अवस्थ्याना आपणहून आमंत्रण दिल्यासारखेच..

आपल्या मनाची तयारी किंवा मानसिकता अशीच तयार करा की प्रत्येकवेळी आयुष्य मनासारखे होऊ शकत नाही.
वेळ, परिस्थिती, वातावरण, व्यक्ती , स्थळ या सगळ्यांवर आणि इतर ही काही कारणे असतील त्यावर ठरते की ती गोष्ट कशी घडणार..त्यामुळे आपल्या कडून जेवढे बेस्ट करता येईल ते करायचे त्यातून नाहीच झाले मनासारखे तर जे आहे ते स्वीकारून पुढे जात राहायचे.

जीवन गाणे गातच रहावे झाले गेले विसरुनी जावे पुढे पुढे चालावे.
सुनील गावस्कर यांनी म्हणले आहेच या दूनिये मध्ये थांबायाला वेळ कोणाला…हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला..त्यामुळे पुढे जो कोणता चेंडू येईल त्याला bat ने टोला मारत जा..कधी बॉल जवळच्या अंतरावर जाईल..तर कधी टोला एव्हढा जोराचा असेल की हवेतून ग्राउंड पार करून एकदम सिक्सर च..

मनासारखे होणे न होणे आपल्या हातात नाही ..आपल्या हातात आहे ते प्रयत्न करणे..प्रयत्न करत रहा.. आयुष्यात जे आहे त्याकडे positively बघत जा..जे नाही त्याची खंत किंवा दुःख करू नका..आयुष्य एकदाच मिळते.. फुलपाखरासारखे मुक्तपणे जगा..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!